-->
वंध्यत्वावरील नवे तंत्रज्ञान

वंध्यत्वावरील नवे तंत्रज्ञान

 वंध्यत्वावरील नवे तंत्रज्ञान
प्रसाद केरकर 
Published on 18 Nov-2011 KIMAYA
मुंबईसारख्या महानगरातच नव्हे तर अनेक लहान, मोठय़ा शहरांतून सध्या वंध्यत्व हा एक मोठा प्रश्न तरुण जोडप्यांपुढे निर्माण झाला आहे. शहरातील धावपळ, रोजचा कामातील तणाव ही जशी यामागची प्रमुख कारणे आहेत तसे अनेक जोडप्यांमध्ये यासंबंधी काही प्रमाणात दोषही आढळतात. मात्र, अत्याधुनिक शास्त्राने यावरही मात केली असून या वैद्यकीय क्षेत्रात मोठे संशोधन झाले आहे. 
मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूतितज्ज्ञ तसेच वंध्यत्वावर विशेष उपचार करणारे डॉक्टर ऋषिकेश पै व डॉ. नंदिता पाळशेतकर यांनी वंध्यत्वावर मात करण्यासाठी इन्ट्रासायटोटलास्मिक मोफॉलॉजिकली निवडक ‘स्पर्म इंजेक्शन’ शोधून काढले आहे. यामुळे चांगल्या दर्जाचे ‘स्पर्म’ शोधणे सोपे जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकतीच नवी दिल्ली येथे एक मुलगी जन्माला आली आहे. 
यासंबंधी माहिती देताना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलच्या डॉ. नंदिता पाळशेतकर यांनी सांगितले की, आयसीएमआय या पद्धतीत बदल करून आयएमएसआय ही उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे. या पद्धतीत 7000 वेळा सूक्ष्म पद्धतीतून चांगले ‘स्पर्म’ निवडले जातात. ही पद्धती ज्या पुरुषांत अपत्य होण्यात दोष आहेत अशांसाठी चांगली आहे आणि ज्या स्त्रियांची गर्भधारणा होऊ शकली नाही, गर्भपात झालेले आहेत अशांनाही या पद्धतीमुळे चांगले परिणाम मिळू शकतात. 
त्यांनी पुढे सांगितले की, पुरुषांमध्ये अधिक दोष असतात आणि असुरक्षित संभोग, धूम्रपान, अल्कोहोल सेवन व ताणतणाव यामुळे पुरुषांमध्ये दौर्बल्य येते. लीलावती हॉस्पिटलमध्ये आयएमएमआय उपचार पद्धती सुरू केल्यानंतर कित्येकांना गर्भधारणा झाली. अलीकडेच एक व्यक्ती आली होती. तिचे स्पर्म कमजोर असल्याने त्या व्यक्तीच्या बायकोला गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्याचे शुक्रजंतू कमजोर होते. या दांपत्याने आयएमएमआय पद्धतीने उपचार घेतल्यावर त्यांना गर्भधारणा झाली तसेच अपत्यप्राप्तीही झाली. 
आयएमएमआय उपचार पद्धती इस्रायलमधील बेंजामिन बारॉव ऑफ बार लान विद्यापीठात विकसित केली गेली. पुरुषांत असलेल्या दौर्बल्यासाठी ही अतिशय उपयुक्त उपचार पद्धती असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. यात आणखी संशोधन होऊन ही पद्धती नवरा-बायको दोघांनाही उपयोगी ठरेल. 
या उपचार पद्धतीमुळे अनेक दांपत्यांना लाभ होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. वंध्यत्वावर जगातील अनेक रुग्णालयांत मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू आहे. पूर्वी याबाबतचे संशोधन विदेशातच उपलब्ध होई. आता मात्र भारतात याचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. विज्ञानाचा आता फायदा आपल्या सगळ्यांनाच होऊ लागला आहे. पूर्वी या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ र्शीमंतानाच घेता येत असे. आता मध्यमवर्गीयांनाही याचा लाभ घेता येऊ लागला आहे, ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "वंध्यत्वावरील नवे तंत्रज्ञान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel