-->
मुरब्बी राजकारणी, विदेशी धोरणविश्लेषक, अर्थतज्ज्ञ

मुरब्बी राजकारणी, विदेशी धोरणविश्लेषक, अर्थतज्ज्ञ

 मुरब्बी राजकारणी, विदेशी धोरणविश्लेषक, अर्थतज्ज्ञ

 Published on 22 Oct-2011 PRATIMA
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजवर नेहमी राज्यसभेवर निवडून जाणारे प्रणवदा गेल्या वेळी जांगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर बायपास झाली त्यावेळी पंतप्रधानपदाचा कार्यभार त्यांच्याकडेच होता. तेव्हापासून प्रणवदांना मत्रिमंडळात दुसरे स्थान मिळाले आहे. सुरुवातीला परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिल्यावर त्यांच्याकडे अर्थमंत्रिपद आले. तीन वर्षांपूर्वी आलेल्या मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यात त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. सरकारला आता अर्थसंकल्पाची चाहूल लागली आहे. अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी बुधवारी झालेल्या आर्थिक संपादकांच्या बैठकीपासून अर्थसंकल्पावरील विचारविनिमय सुरू केला आहे. आर्थिक संपादकांच्या पाठोपाठ आता अर्थमंत्र्यांनी उद्योजक, विविध उद्योजकीय संघटना यांच्याशी चर्चा सुरू करतील. अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पाची ही तयारी काही नवीन नाही. एक मुरलेले राजकारणी, आर्थिक विषयाचे अभ्यासक, विदेशी राजकारणाचे विश्लेषक, मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ अनुभवी मंत्री अशी मुखर्जी यांची ख्याती आहे. 11 डिसेंबर 1935 रोजी जन्मलेले मुखर्जी हे एक कॉँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून जसे सर्वांना परिचित आहेत तसेच ते एक कुशल प्रशासक म्हणूनही त्यांचा दिल्ली दरबारी दबदबा आहे. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी इतिहास व राजकीय विज्ञान या विषयात एम. ए. केल्यावर कायद्यातील पदवी संपादन केली. गेल्या वर्षी याच विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली एक शालेय शिक्षक म्हणून केली. त्यानंतर काही काळ ते पत्रकार होते. निखिल भारत बांगला साहित्य संमेलनाचे काही काळ अध्यक्ष होते. सुरुवातीला त्यांनी अशा प्रकारे शिक्षक व पत्रकार म्हणून काम केल्यावर त्यांचा खरा पिंड राजकारणाचा असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील कॉँग्रेसच्या चळवळीत ते सक्रिय झाले. 1952-64 या काळात ते पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्य होते. 1969 मध्ये त्यांची सर्वात प्रथम राज्यसभेवर नियुक्ती झाली. 1975, 1981, 1993 व 1999 या वर्षी त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. 1973 मध्ये त्यांचा सर्वात प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात औद्योगिक विकास उपमंत्री म्हणून समावेश झाला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते एक विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. यातून त्यांना बढती मिळाली आणि 1982 मध्ये सर्वात प्रथम अर्थमंत्री झाले. संमिर्श अर्थव्यवस्थेचा काळ होता आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. रिलायन्सच्या धीरुभाई अंबांनीना झुकते माप दिल्याचा त्यांच्यावर आरोपही झाला होता. मात्र, त्यांनी या टीकेचा कधीच विचार केला नाही. 1984 मध्ये त्यांना जगातील उत्कृष्ट अर्थमंत्र्यांचा पुरस्कार ‘युरोमनी’ या मासिकातर्फे देण्यात आला. प्रणवदा अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहनसिंग त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. त्यानंतर त्यांनी कॉँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रीय समाजवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. 1989 मध्ये त्यांचा राजीव गांधीशी समझोता झाल्यावर त्यांचा पक्ष कॉँग्रेसमध्ये विलिन झाला. 
Prasadkerkar73@gmail.com

0 Response to "मुरब्बी राजकारणी, विदेशी धोरणविश्लेषक, अर्थतज्ज्ञ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel