-->
ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेच्या दिशेने..

ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेच्या दिशेने..

 ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेच्या दिशेने.. 
Published on 24 Oct-2011 ARTHPRAVA
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने गेल्या दोन दशकात कात टाकून ग्राहकाभिमुख दिशेने वाटचाल सुरू केली आहे. संमिर्श अर्थव्यवस्थेकडून आपण मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत असताना झालेला हा एक महत्त्वाचा बदल आहे. आपल्याकडे उदारीकरणाचे युग सुरू झाल्यापासून मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढली. या काळात मध्यमवर्गीयांचे उत्पन्नही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे हा मध्यमवर्गीय जास्त प्रमाणात खर्च करू लागला आहे. पूर्वी आपल्याकडील मध्यमवर्गीयांची खर्च करण्याची आर्थिक कुवतच नव्हती. मात्र, उदारीकरणाचा मोठा फायदा या वर्गाला मिळाला आहे. 25 कोटीहून जास्त एवढय़ा मोठय़ा संख्येने असलेल्या या मध्यमवर्गीयांनी बाजारपेठेवर आपले वर्चस्व स्थापन केले आहे. त्यांच्या या मागणीमुळेच बाजारपेठांमधील वस्तूंच्या किमती ठरू लागल्या आहेत, असे मत जागतिक पातळीवरील नामवंत सल्लागार कंपनी ‘मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटने’ व्यक्त केले आहे. 
याचा परिणाम म्हणून गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्या टी.टी.के. प्रेस्टिज लि., सिंफनी लि., तळवळकर बेटर फिटनेस व्हॅल्यू, व्ही-गार्ड इंडस्ट्रिज लि., हॉॅकिन्स कुकर्स लि., हिताची होम अँड लाइफ सोल्यूशन्स यांना याचा मोठा फायदा होणार आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत किमती 1990 ते 2009 या काळात जवळजवळ पाच पटींनी वाढल्या. पुढील दहा वर्षांत आणखी पाच पटींनी वाढण्याची शक्यता आहे. आपल्या देशात जसे शहरीकरण वाढत जाईल तसे मध्यमवर्गीयांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत जाणार आहे. त्यामुळे जसा मध्यमवर्गीय वाढत जाईल तशी मागणी वाढल्याने महागाईचा आलेखही चढता असेल. 
संयुक्त राष्ट्र संघाने भारतातील नागरीकरणासंबंधी तयार केलेल्या एका अहवालानुसार, 2010 मध्ये भारतातील नागरीकरण 30 टक्क्यांनी वाढेल, तर त्यापुढील दहा वर्षांत या वाढीचा वेग 40 टक्क्यांवर जाईल. त्यामुळे देशात नागरी भागात राहणार्‍यांची संख्या 62 टक्क्यावरून वाढून 69 टक्क्यांवर जाईल, तर मध्यमवर्गीयांची लोकसंख्या 12 पटीने वाढून 58 कोटींवर जाईल. एकूण लोकसंख्येच्या 41 टक्के ही मध्यमवर्गीयांची लोकसंख्या असेल. 2039 पर्यंत लोकांचे दरडोई उत्पन्न 18 पटीने वाढण्याचा अंदाज आहे. वाढते नागरिकीकरण, तरुणांची मोठी संख्या, लोकांची वाढत जाणारी क्रयशक्ती यामुळे ग्राहकांची खर्च करण्याची कुवत वाढत जाणार आहे. गृहोपयोगी वस्तू, आरोग्याची निगा राखणारे क्षेत्र व दूरसंचार उपकरणे यांना मोठी मागणी असेल. ही स्थिती केवळ शहरातीलच नसेल तर ग्रामीण भागातीलही असेल. कारण तेथेही लोकांची क्रयशक्ती वाढत जाईल. मात्र, शहरी लोकांच्या तुलनेत त्याचा वेग कमी असेल, असे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. 
आपल्याकडे एकीकडे गरिबी मोठय़ा प्रमाणावर असताना दुसरीकडे मध्यमवर्गीयांचा उदय हा बाजारपेठांना लाभदायक ठरला आहे. संपूर्ण युरोपात वा अमेरिकेत जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या आपल्याकडे मध्यमवर्गीयांची आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचा विचार करता ही एक मोठी बाजारपेठ ठरावी.

 प्रसाद केरकर

0 Response to "ग्राहकाभिमुख अर्थव्यवस्थेच्या दिशेने.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel