-->
गणेश पांडेवर कारवाई करा

गणेश पांडेवर कारवाई करा

संपादकीय पान शुक्रवार दि. १ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गणेश पांडेवर कारवाई करा
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याच्यावर असलेल्या विनयभांगाच्या तक्रारीबाबत अखेर सरकारने धीमे गतीने पावले उचलण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण महिला आयोगाकडे सोपविल्याची घोषणा केली आहे. गणेश पांडे ही घटना घडल्यानंतर जवळपास पाच दिवस गायबच होता. शेवटी तो बुधवारी पत्रकारांसमोर आला व आपण निर्दोष असल्याचा त्याने दावा केला. जर गणेश पांडे निर्दोष होता तर एवढे दिवस का गप्प होता? जर निर्दोष आहे तर त्याची चौकशी पोलिसांमार्फत का केली जात नाही, असा देखील प्रश्‍न आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी चौकशीसाठी पक्षाची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विधानपरिषद सदस्य माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आमदार मनिषा चौधरी आणि प्रदेश महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष आमदार स्मिता वाघ यांचा समावेश आहे. ही समिती सर्व संबंधितांशी चर्चा करून व वस्तुस्थितीची माहिती घेऊन प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करेल. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर ४ ते ६ मार्च रोजी मथुरा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी मुंबईतून युवा मोर्चाचे कार्यकर्ते मथुरेला गेले होते. त्या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष गणेश पांडे याने युवा मोर्चाच्या सहकारी युवतीचा विनयभंग केला. पीडित युवतीने मुंबई भाजपा अध्यक्षांना एक पत्र लिहून शिबिरात जे घडले ते सविस्तरपणे लिहून त्याद्वारे तिच्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे गणेश पांडे तिच्या रूमबाहेर मोठ्या आवाजात अश्लिल चित्रफीत सुरू केली होती. नंतर त्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. शिवाय त्याआधी ट्रेनमधून जातानाही हा पदाधिकारी अश्लील चित्रफीत मोठ्या आवाजात पाहात होता, असे या पीडित तरुणीचे म्हणणे आहे. गणेश पांडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाचा कट्टर समर्थक आहे. १९९८ पासून तो भाजपचा वॉर्ड अध्यक्ष आहे. २००७ ते २०१० पर्यंत उत्तर-मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष होता. २०१३ मध्ये मुंबईचा उपाध्यक्ष होता. २०१३ मध्येच भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष बनला. सहकारी महिलेने विनयभंग केल्याचा आरोपानंतर भाजपाने मुंबई भाजयुमोची कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. गणेश पांडे याच्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत हे सिध्द त्यानेच करणे चुकीचे आहे. पोलिसांनी यासंबंधी चौकशी करुन त्याला क्लिन चिट दिली असती तर एकवेळ आपण समजू शकलो असतो. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे पांडे याच्यावर रितसर गुन्हा नोंदवून त्याची चौकशी होण्याची गरज आहे. सरकार अशा प्रकारे पांडेला का वाचवू पाहात आहे, असा देखील प्रश्‍न उपस्थित होतो. पांडेने जर काही चुकीचे केले असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "गणेश पांडेवर कारवाई करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel