संपादकीय पान शुक्रवार दि. ४ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
लखनौचा नबाब यावेळी कोण?
--------------------------------
उत्तरप्रदेशातील लखनौ शहर म्हटले म्हणजे तेथील पूर्वी असलेल्या नबाबांचे शान, शौकतच्या किस्से डोळ्यापुढे येतात. नबाबांचे राज्य खालसा झाले असले तरी नबाबांचा येथे असलेला प्रभाव काही कमी झालेला नाही. मुस्लिम बहुसंख्या असलेल्या या शहरातून अटलबिहारी वाजपेयी तब्बल पाच वेळा निवडून आले होते. वायपेयी येथील मुस्लिमांची मने उर्दु भाषेत बोलून जिंकत असत. त्यामुळे येथून पाच वेळा निवडून आल्याने ते इथले खरे नबाब झाले होते. यावेळी भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंग हे याच मतदारसंघातून आपले नशिब आजमावित आहेत. प्रत्येक सभेच्या सुरुवातीला त्यांना वाजपेयींची आठवण काढूनच राजनाथसिंग यांना भाषणाची सुरुवात करावी लागत आहे. राजनाथसिंग यांच्या विरोधात कॉँग्रेसच्या रिटा बहुगुणा व आम आदमी पक्षाचे उमेदवार व प्रसिध्द कलाकार जावेद जाफरी हे लढत आहेत. देशातील महत्वाची लढत म्हणून ओळखल्या गेलेल्या या मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे. जावेद जाफरी यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाल्यावर येथील लढतीत आणखीनच रंग भरला आहे. खरे तर जाफरी यांचा लखनौशी काडीमात्र संबंध नाही. यापूर्वी ते कधी या मतदारसंघात आलेले देखील नाहीत.फक्त ते मुस्लिम असल्याने येथील त्यांचे पारडे जड झाले आहे. तब्बल १८.५ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात ४.५ लाख मतदार हे मुस्लिम आहेत. त्यातील एक लाख हे शिया आहेत. २..५ लाख मतदार हे ब्राह्मण, २.५ लाख वाणी व दोन लाख मतदार हे मागासवर्गीय आहेत. त्याशिवाय १.२५ लाख कायस्थ, १.२५ दलित, ६० हजार ठाकूर मतदार आहेत. तसा हा मतदारसंघ मुस्लिमबहुल असला तरीही हिंदू वस्ती जास्त आहे.असे असले तरीही या मतदारसंघात मुस्लिमांची मते ही निर्णायक ठरतात. २००९ साली येथून भाजपाचे लालजी टंडन हे विजयी झाले होते. त्यांना २,०४,०२८ मते पडली होती. तर रिटा बहुगुणा या कॉँग्रेसच्या उमेदवाराला १,६३,१२७ तर बहुजन समाज पक्षाच्या अखिलेश दास गुप्ता यांना १,३३,६१० मते तर समाजवादी पक्षाच्या नसिफा अली यांना ६१,४५७ मते मिळाली होती. मुस्लिम मते निर्णायक असली तरीही येथून फार क्वचितच मुस्लिम उमेदवार विजयी झाला आहे. यावेळी राजनाथसिंग यांच्या विरोधात आम आदमी पक्ष वगळता कुणीही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. आम आदमीने दिलेला जावेद जाफरी हा मुस्लिम उमेदवार असला तरीही ते शिया समुदायाचे आहेत. त्यादृष्टीने येथे फक्त एक लाखच शिया आहेत. सुन्नी मुस्लिम जाफरीला मते देणार नाहीत, त्यामुळे आपची जादू इकडे चालणे कठीण आहे. शियांनी आजवर आपली मते भाजपाच्या पदरात टाकली आहेत. यावेळी ही मते कोणाला मिळणार यावर उमेदवाराचे भवितव्य ठरेल. जाफरी यांच्या मागे त्यांच्या सेलिब्रेटी दर्ज्यामुळे तरुण मागे लागले आहेत मात्र त्यापैती किती जणांचे मते पडतील हे सांगता येत नाही. भाजपाचा आणखी एक मतदार हा ठाकूर आहे. राजनाथसिंग यांनी लखनौ शहर अत्याधुनिक करण्याचे व बायोटेक सिटी करण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु या शहराचा कसा कायापालट करणार याची कसलीही योजना राजनाथसिंग यांच्याकडे नाही. परंतु सध्या आश्वासनांची खैरात लखनौवासियांवर सुरु आहे. यावेळी लखनौचा नबाब कोण होणार राजनाथसिंग की जावेद जाफ़ऱी? याचे उत्तर शोधायला अजून बराच वेळ आहे.
----------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा