-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ४ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
तटकरेंच्या मालमत्तेचे गौडगंबाल
-----------------------------------
राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी बुधवारी सादर केलेल्या उमेदवारी अर्जातील मालमत्ताविषयी प्रतिज्ञापत्रावर नजर मारल्यास त्यांची दाखविलेल्या मालमत्तेपेक्षा कितीतरी पट जास्त मालमत्ता असल्याचे कुणीही सांगेल. तटकरेंची मालमत्ता ही त्यांनी यावेळी सुमारे दहा कोटी रुपये दाखविली आहे. २००९ सालच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली जी मालमत्ता दाखविली होती त्यापेक्षा यावेळी साडे तीन पटीने वाढ झाली आहे. त्याहून गंमतीची बाब म्हणजे तटकरे ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा नेत्या सोनिया गांधी यांची मालमत्ता देखील तटकरेंपेक्षा कमी आहे. अर्थात मालमत्ता ही अन्य कुणाशी तुलनात्मकदृष्ट्या पाहणे अयोग्य ठरेल. कारण मालमत्ता ही प्रत्येकाला वडिलोपार्जित किंवा स्वत: कमविलेली अशा स्वरुपात मिळत असते. वडिलोपार्जित मालमत्ता किती येईल हा नशिबाचा भाग झाला. मात्र स्वकष्टीत मालमत्ता हा मात्र अभ्यासाचा विषय ठरावा. प्रामुख्याने एखादी व्यक्ती जर एक दशकाहून जास्त काळ लाल दिव्याच्या गाडीतून फिरत असेल तर तिची मालमत्ता ही कशी आली याचा शोध घेणे महत्वाचा म्हणजे सार्वजनिक हिताची बाब पाहता महत्वाचे ठरते. कारण तटकरेंनी आपली मालमत्ता ही जरुर दाखविली आहे, मात्र ती कशी कमविली त्याच मूळ स्रोत्र काही सांगितलेला नाही. त्याचबरोबर अविवाहीत मुलगी जर असेल तर तिचा समावेश देखील अवलंबून असलेल्या व्यकितींमध्ये दाखविली जाते. मात्र तटकरेंनी आपल्या अविवाहीत कन्येचा समावेश आपल्यावर अवलंबून असलेल्यामध्ये दाखविलेला नाही. मुलाचे लग्न झालेले असल्याने तत्याचे कुटुंब हे वेगळ ेदाखविणे कायद्यातील तरतुदीला धरुन आहे. हे आपण एकवेळ मान्य करु. मात्र अविवाहीत मुलीच्या बाबतीत तटकरेंनी कोणत्या कायद्याचा किसा पाडला हे रायगडवासियांना समजले पाहिजे. त्याचबरोबर तटकरेंनी ३५ कंपन्या स्थापन केल्या होत्या. सुरुवातील ते त्यातील बहुतांशी कंपन्यांवर संचालक होते. मात्र नंतर त्यांनी संचालकपदाचा राजीनामा देऊन (बहुदा त्यांच्या सल्लागारांच्या सल्यानुसार) मुलाला व सुनेला संचालक दाखवून त्या कंपन्यांशी आपला काहीच संबंध नाही असे दाखविणे म्हणजे केवळ बनावच आहे. सरकारला आपली मालमत्ता लपविण्यासाठी केलेला हा एक उत्तम फार्स ठरावा. परंतु फार काळ हा फार्स तटकरेसाहेब वठवू शकणार नाहीत. लालूप्रसाद यादव याने देखील चारा घोटाळ्यात आपण अडकणार नाही याची खात्री पटवूनच आपण भ्रष्ट नाही असे गावभर सांगित असे. परंतु लालूवरील आरोप हे सिध्द झालेच आणि जेलची हवा लालूला खावीच लागली. त्याचप्रमाणे तटकरे यांचे देखील असेच आहे. त्यांचे देखील भिंग आज ना उद्या फुटणार आहे. त्यांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता तीन कोटी ८४ लाख ९६ हजार ८३३ रुपये, जंगम मालमत्ता दोन कोटी ६० लाख ०१ हजार ३७५ रुपये, तर वारसाप्राप्त मालमत्ता तीन कोटी ७४ लाख ०५ हजार ८३३ रुपये व इतर मालमत्ता अशी एकूण १० कोटी १९ लाख ४ हजार ४१ इतकी असल्याचे मालमत्ता असल्याचे दाखवले आहे. तटकरेंच्या शेअर्समधील गुंतवणुकीचा आढावा घेतला असता चंबल फर्टीलायझर्सचे एक हजार शेअर्स असून, त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ४० हजार ४०० रुपये, रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडचे ४० शेअर्स असून, त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ५ हजार १६० रुपये, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे ८० शेअर्स त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ७३ हजार २९२ रुपये, रिलायन्स कॅपिटल व्हेंचर लिमिटेडचे ४० शेअर्स बाजारभावाप्रमाणे त्यांची किंमत १३ हजार ८०० रुपये, रिलायन्स पॉवर लिमिटेडचे १० शेअर्स त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत ६८० रुपये इतकी आहे. गेल्या वेळी तटकरेंच्या नावे मोटार नव्हती. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या नावे २९ लाख १ हजार ६०३ रुपये किंमतीची होंन्डा सीआरव्ही २.४ ही कार दाखविली आहे. सोन्याचे दागिने ३ लाख ४५ हजार रुपये, शेती मालाच्या उत्पन्नाची येणी ७ लाख ९५ हजार १२५ रुपये, मूदत ठेवीवरील व्याज अंदाजे १४ लाख ८ हजार ६८० रुपये, आयुर्विमा रुपये ४७ लाख ३६ हजार ५५० रुपये, मुंबई येथील ऍक्सीस बँकेच्या बचत खात्यात १ लाख १० हजार ६८५ रुपये, रोहा येथील वरसगांव बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बचत खात्यात ७६ हजार ९६२ रुपये, मुदत ठेवी ५० लाख व २० लाख रुपये अलिबागमधील बँक ऑफ इंडियाच्या खात्यात १ हजार रुपये, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुंबईमध्ये बचतखात्यात २० लाख १६ हजार १४१.८४ रुपये, मुदत ठेवी ४५ लाख व २० लाख रुपये अशी एकूण २ कोटी ६० लाख ०१ हजार ३७५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्याशिवाय स्थावर मालमत्ता २ कोटी २६ लाख १७ हजार ४७० रुपये असून, त्यात रोहा येथील दुरटोली व गौळवाडी येथे सामाईक जागा आहे. तटकरेंची मालमत्ता सुमारे २० हजार कोटी रुपयाहून जास्त असल्याचा अंदाज आहे. मात्र ती सर्व बेनामीत किंवा त्यांच्या चिरंजीव संचालक असलेल्या कंपन्यात आहे. परंतु आता एखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रकात अपुरी माहिती दिल्यास किंवा लपवाछपवी केली असल्याचे आढळल्यास ते अर्ज बाद करण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत असा निकाल सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. तटकरेंना अर्ज या दोन्हींबाबींचा विचार करता फेटाळला जाऊ शकतो, याची आम्ही त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel