संपादकीय पान मंगळवार दि. १ एप्रिल २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
तटकरेंच्या मालमत्तेचे स्त्रोत्र काय?
--------------------------
जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात सुुमारे २५ हजार कोटी रुपयांची माया जमविल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. भाई जयंत पाटील यांनी केल्याच्या घटनेला आता ७२ तास उलटून गेले आहेत. मात्र सुनिल तटकरे यांनी या आरोपाचे अजूनही खंडण केलेले नाही किंवा त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी दररोज सभा घेत असतानाही तटकरेंनी मात्र मौन का बाळगले आहे, याचे रायगडवासिय मतदारांना कोडे पडले आहे. या आरोपाला तटकरेसाहेब उत्तरे देऊ शकत नाहीत, कारण त्यांनी जी अवैध माया जमा केली आहे त्याच ते हिशेब देणारच कसे? यापूर्वी तटकरेंनी खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत माझ्या मालकीच्या ३५ कंपन्या आहेत हे मान्य केले होते. मात्र त्याचा सर्व कारभार माझा मुलगा पाहतो. त्यामुळे मला त्या व्यवहारांची माहिती नाही. माझा मुलगाच ते सर्व व्यवहार पाहतो असे सांगून आरोपाच्या प्रश्नाला बगल दिली होती. मराठी माणूस उद्योगधंदा करुन पैसा कमवित असेल तर त्याचा कोणत्याही मराठी मनास अभिमानच वाटेल. मराठी लोक खरे तर उद्योग-व्यवसायात येत नाहीत ही अनेकांची खंत असते. परंतु तटकरेंसारखा उद्योग मात्र मराठी माणसाने कर नये असे आम्हाला वाटते. यामुळे मराठी माणसास अभिमान नव्हे तर लाजेने मान खाली घालावी लागत आहे. तटकरेंच्या मुलाचे वय १८ पूर्ण झाल्यावर त्याच्या नावावर कंपन्या स्थापन होऊन त्या कंपन्या अचानकपणे करोडोंचे व्यवहार कशा करु लागल्या हा प्रश्न आहे. तटकरेंच्या मुलाचा असा कोणता व्यवसाय आहे की जो त्यांना करोडो रुपये मिळवून देतो आहे? मागे एकदा तटकरेम्हणाले होते की, माझा दुधाचा धंदा आहे. पण त्यांचा दुधाचा धंदा कुठे दिसत नाही. या धंद्याव्दारे जर तटकरे पैसा कमवित असतील तर तेवढ्या त्यांच्याकडे गायी, म्हशी असल्या पाहिजेत. त्यांना सांभाळणारे तबेले असले पाहिजेत. आम्हाला हे सर्व कुठे दिसत नाही. मतदारांनीच याचा शोध द्यावा व धो-धो पैसा देणार्या या गाई-म्हशी कोणत्या आहेत ते उघड करावे. त्याव्दारे अनेक मराठी तरुण त्यांच्यापासून धडा घेऊन गाई-म्हशींची पैदास करुन करोडो रुपये मिळवितील. दुधाचा धंदा सुध्दा ऐवढा सोपा नाही. परंतु तटकरेंकडे सरकारी योजनांतून पैसा लाटणारी दुभती गाय मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दुधाचा धंदा ऐवढा नफ्यात आला आहे. अर्थातच हा जनतेचा पैसा आहे आणि त्याचा जाब हा याच निवडणुकीत द्यावाच लागणार आहे. कोणीही उद्योग करुन जरुर पैसा कमवावा. परंतु सरकारी योजनांतून लाटलेला पैसा हा जनतेचा आहे आणि त्यातून जमविलेल्या मएालमत्तेचा हिशेब तटकरेंना द्यावा लागणार आहे. आता निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर करावयाच्या मालमत्ता विषयीच्या प्रतिज्ञापत्रातच किती मालमत्ता दाखवितात त्याची कसोटी लागणार आहे. प्रामाणिकपणे कष्टाने मिळविलेला पैसा दाखविणे हे केव्हाही सोपे असते. उदाहरण द्यावयाचे झाल्यास आय.टी. उद्योगातील पहिल्या पिढीचे उद्योजक नंदन निलकिणी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता ७७०० कोटी रुपये असल्याचे दाखविली आहे. यातील त्यांची ८० टक्के मालमत्ता ही इन्फोसिस या कंपनीतील समभागात आहे. अशा प्रकारचे पारदर्शक वव्यवहार तटकरे दाखवू शकतील काय, हाच सवाल आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्या मालमत्तेसंबंधी जे प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे असते त्यात आपल्या मालमत्तेचे बाजारमूल्य सादर करावयाचे असते. मात्र शेअर बाजारात नोंद नसलेल्या कंपन्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य हे दर्शनीमूल्याने दाखविले जाते. खरे तर कंपनी शेअर बाजारात नोंद नसली तरीही त्याचे पुस्तकी मूल्यानुसार किती मालमत्ता होते ते दाखविले गेले पाहिजे. कारण तटकरे यांच्या सर्व कंपन्या या प्रायव्हेट लिमिटेड आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांचे बाजारमूल्य नसते. मात्र त्यांचे पुस्तकी मूल्य दाखविता येऊ शकते. तसेच या कंपन्यातील जी गुंतवणूक केली त्या पैशाचे उगमस्थान काय आहे किंवा त्याचे स्त्रोत्र काय आहे हे दाखविणे आवश्यक आहे. कारण हा पैसा आला कसा? त्याचे दरवर्षीचे उत्पन्न काय? कोणत्या उद्योगातून हा पैसा कमविला? हे दाखविणे ावश्यक ठरते. तटकरे हे सर्व दाखवू शकणार नाहीत. कारण त्यांच्या पैशाचे उगमस्थान हे भ्रष्टाचार हाच आहे. त्यांनी आपली मालमत्ता कशाही प्रकारे दाखविली तरी तटकरे हे अडचणीत येणार आहेत. तसेच तटकरे उमेदवारी अर्जात मासमत्ता व गुन्हेगारी विषयी जर अपुरी माहिती सादर केल्यास किंवा एखादी माहिती लपवून ठेवल्यास सदर अर्ज लगेचच फेटाळून लावण्याचा अधिकार निवडणूक अधिकार्याला आहे, असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उमेदवाराची पूर्ण माहिती मिळणे हा मतदाराचा हक्क आहे. जर उमेदवाराने माहीती पूर्ण भरुन न दिल्यास मतदाराच्या हक्काचे उंल्लंघन होते. त्यामुळे या निकालाचा आधार घेतल्यास तटकरेच नव्हे कोणत्याही उमेदवारास आपली कोणतीही माहिती लपविता येणार नाही. त्यामुळे तटकरेसाहेब तुम्हाला तुमची सर्व मालमत्ता मतदारांपुढे उघड करावीच लागेल. तसेच जर तुम्ही कोणताही मालमत्ता लपविल्याचे आढल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाणार आहे हे लक्षात घ्यावे.
--------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा