-->
संपादकीय पान मंगळवार दि. १ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
पहा... मुख्यमंत्रीपदी असूनही गरीब!
--------------------------------
सध्या देशातील सर्व राजकारण केवळ पैशावर चालते असे सर्वत्र बोलले जाते. कारण सध्याच्या निवडणुकीच्या काळात केवळ पैसाच दिसतो आहे. प्रत्येक उमेदवार आपला विजय व्हावा यासाठी धनशक्तीच्या जोरावर जास्तीत जास्त पैसा खर्च करण्यात समाधान मानत आहे. परंतु धनशक्तीच्या जीवावर निवडणुकीत यश मिळविता येत नाही हे वेळोेवेळी सिध्द झाले आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्याच्या डोक्यावर तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. मात्र तटकरेंसारख्या एका मंत्र्यांची मालमत्ता ही २५ हजार कोटी रुपये आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यातल्या बेहिशेबी मालमत्ता ठेवून असलेल्या डझनभर मंत्र्यांची मालमत्ता जप्त केली तरी राज्याच्या डोक्यावरचे कर्ज उतरु शकते. आता हा सर्व बेहिशेबी पैसा निवडणुकीच्या काळात बाहेर येणार आहे. मात्र अशा प्रकारे वारेमाप खर्च केला तरी विजयी होता येतेच असे नाही. मध्यंतरी खारघर या श्रीमंत ग्रामपंचायतीतील निवडणुकीत २०० कोटी रुपये मालमत्ता असलेली एक उमेदवार उभी होती. या उमेदवाराने करोडो रुपयांचा पैशाचा चुडारा आपण विजयी होण्यासाठी केला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही हे आपण पाहिले आहे. म्हणजेच पैसा प्रत्येक निवडणुकीत कामास येतोच असे नाही. सध्या आपण एकेक उमेदवारांच्या मालमत्तांवर नजर मारल्यास एक स्पष्ट जाणवते की, यांनी एवढा पैसा कमविला कसा? परंतु प्रदीर्घ काळ मंत्रीपदी राहूनही पैसे पदरात नसलेला या देशात एखादा मंत्री आहे का? असा सवालही आपल्या मनात येतो. होय असे देशात एक मुख्यमंत्री आहेत. ते खरोखरीच गरीब आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे त्यांचे नाव. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिकदा हे गेले १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर आहेत. परंतु त्यांच्या नावे कोणतीही मालमत्ता नाही. ते ज्या घरात राहातात ते भाड्याचे आहे. त्यांची पत्नी ही शाळेत शिक्षिका आहे तिच्या पगारावर त्यांचा घरखर्च चालतो. त्यांना मुख्यमंत्री म्हणून जो पगार मिळतो तो सर्व पगार ते पक्षाला देणगी म्हणून देतात व पक्षाकडून स्वत:च्या खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये घेतात. त्यांचे व पत्नीच्या नावाने बँक खाते आहे आमि त्यात जे पैसे शिल्लक आहेत (ते देखील काही हजार रुपयात आहेत) तीच त्यांची मालमत्ता. त्रिपुरातील मार्क्सवाद्यांचे सरकार केवळ सरकार यांच्या प्रामाणिकपणाच्या प्रतिमेवर चालले आहे. मार्क्सवाद्यांना केरळ, पश्‍चिम बंगाल या त्याचे लाल अड्डे असलेल्या राज्यातही सपाटून मार खावा लागला आहे किंवा सत्ता गमवावी लागली आहे. मात्र त्रिपुरात सरकार यांची लोकप्रियता एवढी जबरदस्त आहे की, त्यांचे सरकार पाडण्याची हिंमत कोणत्याही अन्य पक्षात नाही. २०१३ साली झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत तर केवळ त्यांच्या या स्वच्छ प्रतिमेमुळे मार्क्सवाद्यांना ६०पैकी ५० जागांवर विजय प्राप्त करता आला. सद्या आप भ्रष्टाचाराच्या मुद्यावर देशात निवडणूक लढवित आहे. मात्र त्रिपुरातील मुख्यमंत्र्यांनी खरे तर देशातील सर्वच राजकारण्यांपुढे एक आदर्श घालून दिला आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री असूनही कसे साधेपणाने व भ्रष्टाचारमुक्त जीवन कसे जगता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात आपल्याप्रमणे अन्य वागावे असा माणिकदांचा काही आग्रह नसतो. आपण मुख्यमंत्रीपदी असू किंवा नसू आपण आपले आयुष्य असेच जगणार, मुख्यमंत्री झाल्याने आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. सध्याच्या थैलीच्या राजकारणात एक नवा आदशर्र् माणिक सरकार यांनी सर्व राजकारण्यांपुढे घालून दिला आहे.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel