-->
'ट्राय'ला सर्मथ नेतृत्व

'ट्राय'ला सर्मथ नेतृत्व

 Published on 19 May-2012 PRATIMA
प्रसाद केरकर
<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>टेलिकॉम उद्योगावर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी अँथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या अध्यक्षपदी राहुल खुल्लर यांची केलेली नियुक्ती ते निश्चितच सार्थ ठरवतील यात काहीच शंका नाही. सध्या देशातील टेलिकॉम उद्योग एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने 122 लायसन्स रद्द केली आहेत. तसेच टू जी प्रकरणी जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत ते पाहता टेलिकॉम उद्योगापुढे अनेक नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत. 
आ पल्या देशात टेलिकॉमचे एकच सर्कल करणे, एसटीडी व रोमिंग रद्द करणे इत्यादी अनेक आव्हाने त्याचबरोबर टेलिकॉम सेवा ग्राहकाभिमुख करणे अशी अनेक महत्त्वाची कामे खुल्लर यांच्यापुढे असतील. या आव्हानांकडे खुल्लर कसा मुकाबला करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 
1975 च्या आयएएस कॅडरचे असलेले खुल्लर हे एक शिस्तप्रिय व स्वच्छ अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या प्रतिमेमुळेच 'ट्राय'च्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. कारण सध्याच्या या काळात टेलिकॉम उद्योगाला कडवी शिस्त लावणाराच अधिकारी पाहिजे आहे. खुल्लर यांनी आपल्या नोकरीत अनेक जबाबदारीच्या पदांवर कामे केली आहेत. 1991-93 या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांचे स्वीय सचिव म्हणून काम केले आहे. त्याअगोदर 1985 ते 90 या काळात ते पंतप्रधानांच्या कार्यालयातील मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्याचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांच्यासमवेत त्यांनी काही काळ काम केले आहे. मध्यंतरी काही काळ त्यांनी सरकारी नोकरीतून ब्रेक घेतला आणि ते मनिलातील एशियन डेव्हलपमेंट बँकेत भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले. आपली मुलगी त्या वेळी विदेशात शिक्षण घेत असल्याने आपण तेथे जाणे पसंत केले होते, असे त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले होते. 
मनिलातून ते देशात पुन्हा आले आणि त्या वेळी दिल्ली सरकारमध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे विक्रीकर खात्याचा भार देण्यात आला. 'व्हॅट' पद्धतीतवर लक्ष ठेवण्याची प्रामुख्याने जबाबदारी सोपवण्यात आली. 2004 मध्ये ते व्यापार मंत्रालयात सचिवपदी दाखल झाले. त्या वेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नियुक्ती पंतप्रधानपदी नुकतीच झाली होती. पंतप्रधानांशी त्यांचे जवळचे संबंध असूनही पीएमओच्या आघाडीच्या शिलेदारात त्यांचा काही समावेश नव्हता. नंतर काही वर्षांनी मात्र पंतप्रधानांच्या खास र्मजीतल्या व विश्वासातील अधिकार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होऊ लागला. दोहा येथे झालेल्या व्यापार चर्चेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 
भारताची भूमिका त्यांनी दोहा चर्चेत ठासून मांडली. व्यापार सचिव असताना त्यांनी जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया तसेच आशियाई देशांशी मुक्त व्यापाराची चर्चा यशस्वी केली. या देशांशी झालेल्या करारात त्यांचा मोलाचा वाटा होता. 
1953 मध्ये जन्मलेल्या खुल्लर यांना हिंदी, इंग्रजी, पंजाबी व मल्याळम अशा चार भाषा येतात. गेल्या वर्षी वित्त सचिव अशोक चावला निवृत्त झाल्यावर त्यांचे या पदासाठी नाव चर्चेत जोरात होते. मात्र, त्यांची या पदी वर्णी लागली नाही. त्यानंतर त्यांना सरकारने ब्रुसेल्सच्या राजदूतपदी नियुक्ती करण्याची सरकारच्या वतीने ऑफर देण्यात आली होती; परंतु त्यांनी ही ऑफर झिडकारली होती. आता मात्र त्यांनी ट्रायचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "'ट्राय'ला सर्मथ नेतृत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel