-->
आयात कचर्‍याची

आयात कचर्‍याची

संपादकीय पान बुधवार दि. 14 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आयात कचर्‍याची
कचर्‍याची विल्हेवाट कशी लावायची? ही अनेक देशांची सगळ्यात मोठी समस्या बनली असताना स्वीडन या युरोपातील देश चक्क कचरा आयात करीत आहे. कुणालाही याचे आश्‍चर्य वाटेल, परंतु ही वस्तुस्थीती आहे. स्वीडन कचर्‍याचा पुनर्वापर करून त्यापासून उर्जानिर्मिती करतो. ही उर्जा थंडीत घरे उबदार ठेवण्यासाठी वापरली जाते. स्वीडन आपल्या गरजेच्या अर्ध्याधिक विजेची निर्मिती ही टाकाऊ पदार्थांचा वापर करून करतो. स्वीडनने आपल्या नागरिकांना कचरा कमी करण्यासाटी प्रबोधन केले आहे. त्यातूनही जो कचरा निर्माण होतो त्यापासून वीज निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे जिवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात कर लावणार्‍या काही मोजक्या देशांपैकी स्वीडन एक आहे. कचर्‍याच्या पुनर्वापरावर या देशाने इतक्या मोठा भर दिला आहे की या देशात जितका कचरा तयार होतो त्यापैकी फक्त एकच टक्का कचरा जमीनीत पुरला जातो. बाकी कचर्‍याचा पुनर्वापर केला जातो. सध्या स्वीडनमध्येच कचर्‍याची मर्यादीत निर्मिती होते, त्यामुळे आता त्यांच्यावर उर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी कचरा आयात करण्याची पाळी आली आहे. स्वीडनकडून आपल्यासारख्या विकसनशील देशाने धडा घेण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे भरपूर कचरा आहे मात्र आपल्याकडे त्यापासून उर्जा निर्मिती करण्याचे प्रकल्प उभारलेले नाहीत. अर्थात तसे करण्यासाठी ज्या भविष्यातील योजना आखाव्या लागतील त्याची आखणी नाही. मुंबईसारख्या मोठ्या महानगरात दररोजचा अब्जावधी टन कचरा तयार होतो. मात्र ते केवळ डंपिंग ग्राऊंडवर टाकून आपण रोगांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत असतो. कचर्‍याची विल्हेवाट योग्यरित्या लावणे व त्यापासून उर्जा निर्मितीचे प्रयोग आपल्याकडे होतच नाहीत, ही मोठी दुदैवी बाब आहे. स्वीडनकडे त्यांनी या प्रश्‍नांचा योग्यरित्या नियोजन करुन प्रश्‍न सोडविला आहे. मात्र आपल्या देशात याची स्थीती नेमकी उलटी आहे. आपण केवळ महानगरेच नाहीत तर नव्याने वाढलेल्या अनेक लहान, मध्यम शहरात कचर्‍याचा मोठा प्रश्‍न आहे. नुकत्याच निवडणुका झालेल्य नगरपालिकेतील प्रत्येक शहरात कचर्‍याचा ज्वलंत प्रश्‍न आहे. मात्र यातील कुणीही कचर्‍यापासून वीज निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला नाही. स्वीडनसारख्या एका लहान देशाने हे शक्य करुन दाखविले तर आपण का करु शकत नाही अशी खंत आहे.

0 Response to "आयात कचर्‍याची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel