जगभरातील कमोडिटी एक्स्चेंज
जगभरातील कमोडिटी एक्स्चेंज Published on 09 Jan-2012 ARTHPRAVA 2010 मध्ये जगातील कमोडिटींचे व्यवहार सुमारे 380 अब्ज डॉलर झाले होते, असा एक अंदाज आहे. चीन आणि भारत हे दोन असे आहेत की येथे हे व्यवहार गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढले आहेत. चीनमध्ये कमोडिटींचे व्यवहार गेल्या वर्षी सुमारे 60 टक्क्यांनी वाढले. भारतात 2003 मध्ये देशपातळीवरील ऑनलाइन कमोडिटी एक्स्चेंजचा प्रारंभ झाला. |
प्रसाद केरकर, मुंबई |
| आपल्याकडे भारतात कमोडिटी एक्स्चेंज ही संकल्पना नवीन असली तरी जगातील अनेक देशांत चांगलीच रुजली आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट) हे जगातील पहिले स्थापन केलेले पहिले कमोडिटी एक्स्चेंज. 1848 मध्ये व्यापारासाठी मध्यवर्ती एक केंद्र असावे यासाठी शिकागोतील व्यापार्यांनी याची स्थापना केली. पहिले चार वर्षे एका पिठाच्या दुकानात याचा कारभार चालत असे. या केंद्रामुळे शेतकर्यांना आपला माल विकण्यासाठी एक हक्काची बाजारपेठ मिळाली. कारण त्यापूर्वी अनेकदा शिकागोला पाठविलेल्या मालाला कुणाकडून योग्य उठाव न मिळाल्याने त्याची नासाडी होई. मालाच्या वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने शेतकरीही अखेरीस हा माल तलावात बुडवीत. हळूहळू या कमोडिटी एक्स्चेंजने आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जगात कमोडिटींचे व्यवहार करण्यासाठी बाजार सुरू झाले. जगात जी आघाडीची एक्स्चेंज म्हणून ओळखली जातात त्यात न्यूयॉर्क मेटल एक्स्चेंज (नायमेक्स), डालियन कमोडिटी एक्स्चेंज (डीसीई), शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड (सीबॉट), टोकियो कमोडिटी एक्स्चेंज (टोकॉम), लंडन मेटल एक्स्चेंज (एलएमई), शांघाय फ्युचर्स एक्स्चेंज (एसएचएफई), इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज (आईस), सेंट्रल जपान कमोडिटी एक्स्चेंज (सी-कॉम), न्यूयॉर्क बोर्ड ऑफ ट्रेड (नायबॉट), टोकियो ग्रेन एक्स्चेंज (टीजीई), झेंगझू कमोडिटी एक्स्चेंज (झेडसीई) यांचा समावेश होतो. जगभरात या एक्स्चेंजबरोबरच अनेक बाजारात कमोडिटींचे व्यवहार होतात. 2010 मध्ये जगातील कमोडिटींचे व्यवहार सुमारे 380 अब्ज डॉलर झाले होते, असा एक अंदाज आहे. चीन आणि भारत हे दोन असे आहेत की येथे हे व्यवहार गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढले आहेत. चीनमध्ये कमोडिटींचे व्यवहार गेल्या वर्षी सुमारे 60 टक्क्यांनी वाढले. भारतात 2003 मध्ये देशपातळीवरील ऑनलाइन कमोडिटी एक्स्चेंजचा प्रारंभ झाला. मल्टिकमोडिटी एक्स्चेंज (एम.सी.एक्स.) हे त्यातील सर्वात मोठे एक्स्चेंज आहे. येथे होणार्या कमोडिटीजच्या व्यवहारापैकी सोने व सोयाबीन यांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीशी जोडलेल्या आहेत. आपल्याकडेही आता शेअर बाजाराप्रमाणे विविध कमोडिटींचे व्यवहार या बाजारात होत आहेत. हे व्यवहार कसे होतात हे आपण टप्प्याटप्प्याने पाहू. Prasadkerkar73@gmail.com |


0 Response to "जगभरातील कमोडिटी एक्स्चेंज"
टिप्पणी पोस्ट करा