-->
आखिर सोना है सदा के लिए

आखिर सोना है सदा के लिए

 आखिर सोना है सदा के लिए 
[ प्रसाद केरकर, मुंबई] Published on 19 Dec-2011 ARTHPRAVA
सोन्यातली गुंतवणूक ही गेल्या काही वर्षांत मोठी आकर्षक ठरली आहे. प्रामुख्याने गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या किमतीने जी उसळी मारली आहे ती पाहता सोने ग्राहकाला चांगलेच मालामाल करून सोडणार असेच सध्यातरी दिसते. त्यामुळे पुढच्या दहा वर्षांत सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 1 लाख रुपयांच्या घरात जाणार, असे वर्तवलेले भविष्य खरे ठरू शकते. 
‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’च्या नियामक मंडळाचे संचालक अनिल वाघाडकर यांच्या सांगण्यानुसार, सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी सेन्सेक्सच्या विरुद्ध दिशेने सोन्याच्या किमती जायच्या, असे बोलले जायचे. त्यानंतर सोन्याची किंमत डॉलर-कच्चे तेल यांच्यांशी जोडली गेली. मात्र, गेल्या काही वर्षांत सोने एकतर्फी वाढतच आहे. वर्षात फक्त पाच-दहा टक्क्यांनीच घसरते, असा अनुभव आहे. भविष्यातसुद्धा सोन्याची ही वाटचाल अशीच सुरू राहील, असा विश्वास वाघाडकर व्यक्त करतात. 
सोन्याच्या किमती किती वाढणार? याबाबत कोणताही अंदाज व्यक्त करणे कठीण असले तरीही सोन्याची मागणी व पुरवठा यात केवळ आपल्याकडेच नाही तर जगात तुटवडा आहे. हा तुटवडा सध्यातरी भरून निघणारा नाही. त्यामुळे अर्थशास्त्राच्या साध्या नियमानुसार, सोन्याच्या किमती मागणीमुळे वाढतच जातील. त्याचबरोबर ज्या वेळी जगात आर्थिक अस्थिरता येते त्या वेळी गुंतवणूकदाराचा कल हा सोन्याची खरेदी करण्याच्या दृष्टीने सुरू होतो. सध्या जगाचा कल हा सोने खरेदी करण्याकडे वाढला आहे. सोन्याकडे एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक व कधीही त्याचे पैशात रूपांतर करणारे साधन म्हणून पाहिले जाते. सोन्याची खरेदी ही प्रत्येक आर्थिक गटातील लोकांमध्ये केली जाते. त्यामुळे आपल्याकडे दरवर्षी चारशे टनांहून जास्त खरेदी होते. आशियाई देशात भारत व चीन या दोनच देशांत सोन्याची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. त्याउलट विकसित देशांत सोने खरेदीचा ध्यास सर्वसामान्यांना नाही. तेथे आर्थिक स्थैर्यासाठी विविध सरकारेच सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडेही तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने सुमारे 400 टन सोन्याची खरेदी केली होती. या सर्व घटकांमुळे सोन्याचा ग्राहक वाढत जातो आणि पर्यायाने सोन्याच्या किमती वाढत जातात. आपल्यासारख्या विकसनशील देशात सोन्याची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. गेल्या दोन दशकांत सोन्याच्या ग्राहकांच्या मागण्याही बदलत गेल्या. याबाबत आठवणी सांगताना वाघारकर म्हणाले की, पूर्वीच्या काळी सोन्याच्या दागिन्यांचे ठरावीक पॅटर्न असायचे. अनेकदा चित्रे पाहून ग्राहक सोन्याचा दागिना ठरवत असे आणि नंतर त्याला दागिन्यांची डिलिव्हरी दिली जाई. आता मात्र ग्राहकांची याबाबत ‘चव’ बदलली आहे. आता ग्राहकांना तयार दागिने पाहून निवडण्याकडे कल वाढला. एखाद्याला डिझाइन आवडले नाही तर तो ग्राहक दुसर्‍या दुकानात जातो. पूर्वी अशी स्थिती नव्हती. एकूणच सोन्याच्या बाजारपेठेने जशी किमतीची भरारी घेतली आहे तसे त्यात बरेच बदलही झाले आहेत, असे मत वाघारकर यांनी व्यक्त केले.
वर्ष किंमत रुपये 

1925 18.75 

1932 23.06 

1939 31.75 

1943 51.05 

1947 88.62 

1951 98.05 

1954 77.75 

1959 102.56 

1963 97.00 

1965 71.75 

1968 162.00 

1972 202.00 

1976 532.00 

1979 937.00 

वर्ष किंमत रुपये 

1981 1700.00 

1982 1645.00 

1987 2570.00 

1900 3200.00 

1992 4334.00 

1996 5160.00 

1998 4045.00 

2001 4300.00 

2004 5850.00 

2005 7000.00 

2007 10800.00 

2009 14500.00 

2010 18500.00 

2011 29000.00

0 Response to "आखिर सोना है सदा के लिए"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel