मध्य - पश्चिम रेल्वेची षष्ट्यब्दी
मध्य - पश्चिम रेल्वेची षष्ट्यब्दी
Published on 13 Nov-2011 CANVAS
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम व मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची साठ वर्षे गेल्याच आठवड्यात पूर्ण केली. दररोज सुमारे 69 लाख प्रवाशांची वाहतूक करणारी ही उपनगरीय रेल्वे 5 नोव्हेंबर 1951 रोजी अधिकृतरीत्या स्थापन झाली. त्यापूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली रेल्वे मुंबई (त्या वेळचे बोरीबंदर) ते ठाणेदरम्यान धावली होती. मात्र, भारतीय रेल्वेच्या स्थापनेनंतर जी. आय. पी. (ग्रेट इंडियन पेनिनस्युलर) रेल्वेच्या काही भागाला निजाम, सिंदिया आणि धवलपूर स्टेट रेल्वेचा भाग जोडून 5 नोव्हेंबर 51 रोजी मध्य रेल्वे स्थापन करण्यात आली. त्याच वेळी पश्चिम रेल्वेही स्थापण्यात आली. अशा प्रकारे मुख्य रेल्वेचाच भाग असला तरीही साठ वर्षांपूर्वी मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेमुळे त्यांचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले.
गेल्या सहा दशकात पश्चिम व मध्य रेल्वेचा कारभार चांगलाच विस्तारला. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेमुळे मुंबई हे सात बंदरांचे मिळून असलेले शहर चांगलेच भरभराटीला आले. रेल्वेमुळे उद्योगधंदे आले. देशाच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी लोक येऊ लागले. मुंबईच्या विकासाला यातूनच हातभार लागला. म्हणता म्हणता या शहराची लोकसंख्याही एक कोटींवर गेली. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला मुंबई आपल्यात सामावून घेऊ लागली. मुंबई जशी पेडर रोडवर राहणार्या र्शीमंतांची, त्याहून ती कष्टकर्यांची म्हणून सर्वांना परिचित झाली. साठ वर्षांपूर्वी मध्ये रेल्वेचे प्रवासी उत्पन्न 18.64 कोटी रुपये होते. ते आता 20-11 साली 3079.25 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्या वेळी मुंबईत दिवसाला 519 उपनगरी फेर्या चालवल्या जायच्या. त्या आता 1,573 वर पोचल्या आहेत. एवढय़ा फेर्या असूनही मुंबईची लोकसंख्या पाहता उपनगरीय रेल्वे नेहमी तुडुंब भरलेल्या असतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणारी मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातील एकमेव आहे. नऊ डब्यांपासून सुरू झालेल्या या उपनगरीय रेल्वेचे डबे आता 12 वर गेले आहेत. आता दादर-विरार अशी एक प्रायोगिक तत्त्वावर 15 डब्यांची रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. तसेच दोन वर्षांपासून र्जमन बनावटीच्या अत्याधुनिक व हवेशीर डब्यांमुळे उपनगरीय रेल्वेचा प्रवास गर्दी कायम असली तरी आता काहीसा सुखकारक होऊ लागला आहे. पश्चिम, मध्य व त्या जोडीला हार्बर लाईन्स अशा तीन प्रमुख मार्गांनी अख्खी मुंबई जोडली गेली आहे. नवी मुंबई हे जुळे शहर गेल्या वीस वर्षांत विकसित झाल्यावर मुंबईचा विस्तार झाला आणि तेथेही रेल्वे पोचली. 26 जुलै 2006 साली झालेल्या तुफान पावसात उपनगरीय रेल्वे तब्बल दीड दिवस बंद होती. हाच काय तो अपवाद. अन्यथा गेली साठ वर्षे काही अपवादात्मक घटना वगळता उपनगरीय रेल्वे दररोज आपली सेवा चोखपणे बजावत आहे.
गेल्या तीन दशकांत मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र त्या तुलनेत उपनगरी सेवेचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे या सेवेवर फार मोठा ताण आला आणि उपनगरी सेवा म्हणजे धावणारी ‘छळछावणीच’ ठरली. असे असले तरी खिशाला परवडणारी व कमीत कमी वेळेत चाकरमान्याला कार्यालयात पोचवणारी उत्तम सेवा म्हणून रेल्वेला काही पर्याय नाही. गेल्या दोन दशकांत रेल्वेचा विस्तार करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आपल्याकडील राजकारण्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस हलाखीचा होऊ लागला. मात्र 99 मध्ये राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय यांनी संयुक्तपणे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि मुंबईच्या वाहतूक विकासाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक बँकेचेही अर्थसाहाय्य लाभले.
सध्याची रेल्वेची वाहतूक सुधारत असताना मेट्रो, मोनो रेल्वे तसेच रेल्वे लाईन्सवरून जाणारा ‘एलिव्हेटेड रेल्वे’ प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली. यामुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. उपनगरी रेल्वेसाठी नवीन हवेशीर डबे आणून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी सुमारे 1900 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि मुंबईकरांनी या नवीन डब्यांचे मोठय़ा उत्साहाने स्वागत केले. गेल्या साठ वर्षांत उपनगरीय रेल्वेने मोठे बदल स्वीकारले असले तरी मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता ज्या झपाट्याने सुधारणा व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. दरवर्षी मुंबईत रेल्वे ट्रॅक ओलांडताना सुमारे चार हजार प्रवासी मृत्युमुखी पडतात, यावरून लोकलचा प्रवास किती धोकादायक आहे ते समजते. सध्या उपनगरीय प्रवास कितीही त्रासदायक ठरला तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात स्वस्तात व झपाट्याने प्रवास करण्याचे एकमेव साधन हे रेल्वेच आहे. पुढील दशकात उपनगरीय रेल्वेसाठी आखलेले सर्व प्रकल्प मार्गी लागले तर मुंबईकरांचा प्रवास सुखकारक होईल. सध्या रेल्वे आपल्या वयाची साठी पार करत असताना मुंबईकर त्या सुदिनाकडेच डोळे लावून आहे. Prasadkerkar73@gmail.com
Published on 13 Nov-2011 CANVAS
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम व मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची साठ वर्षे गेल्याच आठवड्यात पूर्ण केली. दररोज सुमारे 69 लाख प्रवाशांची वाहतूक करणारी ही उपनगरीय रेल्वे 5 नोव्हेंबर 1951 रोजी अधिकृतरीत्या स्थापन झाली. त्यापूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी देशातील पहिली रेल्वे मुंबई (त्या वेळचे बोरीबंदर) ते ठाणेदरम्यान धावली होती. मात्र, भारतीय रेल्वेच्या स्थापनेनंतर जी. आय. पी. (ग्रेट इंडियन पेनिनस्युलर) रेल्वेच्या काही भागाला निजाम, सिंदिया आणि धवलपूर स्टेट रेल्वेचा भाग जोडून 5 नोव्हेंबर 51 रोजी मध्य रेल्वे स्थापन करण्यात आली. त्याच वेळी पश्चिम रेल्वेही स्थापण्यात आली. अशा प्रकारे मुख्य रेल्वेचाच भाग असला तरीही साठ वर्षांपूर्वी मध्य व पश्चिम रेल्वेच्या स्थापनेमुळे त्यांचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले.
गेल्या सहा दशकात पश्चिम व मध्य रेल्वेचा कारभार चांगलाच विस्तारला. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेमुळे मुंबई हे सात बंदरांचे मिळून असलेले शहर चांगलेच भरभराटीला आले. रेल्वेमुळे उद्योगधंदे आले. देशाच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी लोक येऊ लागले. मुंबईच्या विकासाला यातूनच हातभार लागला. म्हणता म्हणता या शहराची लोकसंख्याही एक कोटींवर गेली. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला मुंबई आपल्यात सामावून घेऊ लागली. मुंबई जशी पेडर रोडवर राहणार्या र्शीमंतांची, त्याहून ती कष्टकर्यांची म्हणून सर्वांना परिचित झाली. साठ वर्षांपूर्वी मध्ये रेल्वेचे प्रवासी उत्पन्न 18.64 कोटी रुपये होते. ते आता 20-11 साली 3079.25 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्या वेळी मुंबईत दिवसाला 519 उपनगरी फेर्या चालवल्या जायच्या. त्या आता 1,573 वर पोचल्या आहेत. एवढय़ा फेर्या असूनही मुंबईची लोकसंख्या पाहता उपनगरीय रेल्वे नेहमी तुडुंब भरलेल्या असतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणारी मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातील एकमेव आहे. नऊ डब्यांपासून सुरू झालेल्या या उपनगरीय रेल्वेचे डबे आता 12 वर गेले आहेत. आता दादर-विरार अशी एक प्रायोगिक तत्त्वावर 15 डब्यांची रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. तसेच दोन वर्षांपासून र्जमन बनावटीच्या अत्याधुनिक व हवेशीर डब्यांमुळे उपनगरीय रेल्वेचा प्रवास गर्दी कायम असली तरी आता काहीसा सुखकारक होऊ लागला आहे. पश्चिम, मध्य व त्या जोडीला हार्बर लाईन्स अशा तीन प्रमुख मार्गांनी अख्खी मुंबई जोडली गेली आहे. नवी मुंबई हे जुळे शहर गेल्या वीस वर्षांत विकसित झाल्यावर मुंबईचा विस्तार झाला आणि तेथेही रेल्वे पोचली. 26 जुलै 2006 साली झालेल्या तुफान पावसात उपनगरीय रेल्वे तब्बल दीड दिवस बंद होती. हाच काय तो अपवाद. अन्यथा गेली साठ वर्षे काही अपवादात्मक घटना वगळता उपनगरीय रेल्वे दररोज आपली सेवा चोखपणे बजावत आहे.
गेल्या तीन दशकांत मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र त्या तुलनेत उपनगरी सेवेचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे या सेवेवर फार मोठा ताण आला आणि उपनगरी सेवा म्हणजे धावणारी ‘छळछावणीच’ ठरली. असे असले तरी खिशाला परवडणारी व कमीत कमी वेळेत चाकरमान्याला कार्यालयात पोचवणारी उत्तम सेवा म्हणून रेल्वेला काही पर्याय नाही. गेल्या दोन दशकांत रेल्वेचा विस्तार करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आपल्याकडील राजकारण्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस हलाखीचा होऊ लागला. मात्र 99 मध्ये राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय यांनी संयुक्तपणे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि मुंबईच्या वाहतूक विकासाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक बँकेचेही अर्थसाहाय्य लाभले.
0 Response to "मध्य - पश्चिम रेल्वेची षष्ट्यब्दी"
टिप्पणी पोस्ट करा