-->
डिमॅटमध्ये सोनेखरेदी लाभाची

डिमॅटमध्ये सोनेखरेदी लाभाची


डिमॅटमध्ये सोनेखरेदी लाभाची
प्रसाद केरकर, मुंबई
ज्यावेळी अस्थिरता निर्माण होते त्यावेळी गुंतवणूकदार आपल्या आयुष्यात स्थिरता यावी यासाठी निश्चित लाभ देणारे गुंतवणुकीचे मार्ग शोधत असतो. कमी लाभ मिळाले तरी चालतील परंतु आपली गुंतवणूक शाबूत राहिली पाहिजे, अशी त्याची मन:स्थिती असते. अशा स्थितीत सोन्यातील गुंतवणूक स्वाभाविकरीत्या वाढते. कारण सोने हे निश्चित लाभ देणारे तसेच त्याचे कधीही पैशात रूपांतर करता येईल असे एक साधन आहे.

आपल्याकडे पूर्वापार सोन्यातल्या गुंतवणुकीकडे अशाच नजरेतून पाहिले जाते. त्यात तथ्यही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे सोन्यातली गुंतवणूक ही गरिबांपासून र्शीमंतांपर्यंत अशा सर्व थरात केली जाते. एखादा गरीब शेतकर्‍याच्या हातात पीक विकून पैसा आल्यावर थोडे फार का होईना तो सोने खरेदी करतो. कारण त्याला माहीत असते की, हेच सोने अपल्याला कठीण काळात मदतकारक ठरणार आहे. शहरी मध्यमवर्गीयांचेही तसेच आहे. ज्यावेळी त्याच्या हातात अतिरिक्त पैसे येतात, त्यावेळी त्याचा कल सोने घेण्याकडेच असतो. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्याची असलेली तरलता आणि निश्चितपणे मिळत जाणारा लाभ. सरासरी विचार करता गेल्या पाच वर्षात सोन्याच्या गुंतवणुकीने 20 टक्क्यांहून जास्त लाभ दिले आहेत. समभाग वा म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीपेक्षा ते कमी असतीलही. मात्र म्युच्युअल फंड असो वा समभागातील गुंतवणूक त्यात जी वधघट होत असते त्यातुलनेत सोन्यातील गुंतवणूक ही निश्चित लाभ देणारी ठरली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास दहा वर्षांपूर्वी जर तुम्ही रिलायन्स ग्रोथ या म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला बावीस पटीने म्हणजे 22 लाख रुपये लाभ मिळाला असता. मात्र ही सर्वाधिक लाभ देणारी योजना आहे. अन्य म्युच्युअल फंडांच्या योजनांत सरासरी दहा पटीने लाभ झाला आहे. तर सोन्यातील गुंतवणूक सात पटीने वाढली. चांदीतील गुंतवणूक नऊ पटीने वाढली. गेल्या वर्षात चांदीने जोरदार भरारी घेतल्यावर आता त्याची जागा सोन्याने घेतली आहे. सध्या व्याजाचे दर वाढले असताना मुदत ठेवींचे दर दहा टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहेत. अशा वेळी मुदत ठेवी देखील हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र ठेवींवरील हे व्याज कायम राहणार नाही. त्याउलट सोन्यातील गुंतवणूक ही निश्चितच सतत वाढत जाणारी ठरली आहे.

सोन्याची गुंतवणूक येत्या काही काळात फायदेशीर ठरणार का, असा सवाल आज अनेकांपुढे आहे. यावर उत्तर एकच आहे-होय. निश्चितच सोन्याच्या किमती वाढत जातील. याला अनेक कारणे आहेत. एक सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका व युरोपातील आर्थिक अस्थैर्य एवढय़ात संपणारे नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांचा कल सोन्याच्या खरेदीकडे वाढणार आहे. सध्या सोन्याची मागणी व पुरवठा यात असलेली तफावत लक्षात घेता सोन्याची किंमत वाढतच जाणार हे नक्की. त्याचबरोबर भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. कदाचित येत्या वर्षात चीन आपल्याला यात मागे टाकेल असा अंदाज आहे. चीनने जरी आपल्याला सोने खरेदीत मागे टाकले तरीही याचा अर्थ एकच आहे, सोन्याची मागणी वाढत जात आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमती वाढत जाणार हे नक्की. सोने कोणत्या ‘फॉर्म’मध्ये खरेदी करणे योग्य ठरेल? सोने खरेदी करताना त्याची ‘डिलिव्हरी’ घेतल्यास ते सांभाळणे ही एक मोठी जोखीम ठरते. त्यामुळे अशा स्थितीत सोने हे ‘डिमॅट’मध्ये खरेदी केल्यास फायदेशीर ठरते. कारण यामागे सोने सांभाळण्याच्या अडचणीतून मुक्तता मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोने कधीही गरज पडल्यास विकून त्यातून नफा कमविणे सोपे जाते. त्यामुळे सोन्यात डोळे झाकून गुंतवणूक करा आणि निश्चिंत व्हा..

0 Response to "डिमॅटमध्ये सोनेखरेदी लाभाची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel