-->
कडक निर्बंध हवेत

कडक निर्बंध हवेत

1 एप्रिलसाठी अग्रलेख कडक निर्बंध हवेत कोरोना रग्णांचे आकडे पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या मार्च माहिन्याशी तुलना करु लागले आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण शून्यावर येत होते तेखे पुन्हा त्यांची संख्या वाढू लागली आहे. गेले काही दिवस केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील प्रमुख राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथेही कोरोना वाढतच आहे. अनेकदा याविषयी चुकीची माहिती प्रसारत होत असते. ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथे कोरोना नाही असा संदेश सोशल मिडियावर फिरत आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. एकूणच पाहता देशात आता कोरोना पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करु लागला आहे. त्यामुळे राज्याचा विचार करता पुन्हा लॉकडाऊन लादणे गरजेचे वाटू लागले आहे. परंतु सरसकट लॉकडाऊन लादण्यास सर्वांचाच विरोध आहे. प्रामुख्याने जनता आता कुठे ल़ॉकडाऊनमधून सावरु लागली असताना त्यांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक जण उध्दस्थ झाले. लॉडाऊनच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, पगारकपात झाली ते पुन्हा लॉकडाऊनच्या पूर्वकाळातील स्थितीला अजूनही आलेले नाहीत. आज जगाचा विचार करता अनेक भागात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरु झाले आहे. संपूर्ण युरोपात पुन्हा एकदा लॉकडाऊन लादावे लागले आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये जे काही पूर्वरत सुरु होत होते ते सर्व पुन्हा थांबवावे लागले आहे. अमेरिकेतही याहून काही वेगळी स्थिती नाही. अमेरिका व युरोपात तिसरी लाट थडकली आहे. आपल्याकडे तरी निदान अजून तरी दुसरीच लाट आली आहे. विकसीत देशातील जनतेच्या तुलनेत आपल्याकडील जनतेत रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे असेच म्हणावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे लसीकरण सुरु झाल्याने या लाटेचा समर्थपणाने मुकाबला करता येऊ शकेल. सरकारने आता पूर्वी बंद झालेले आयसोशलन सेंटर व ऑक्सीजन बेड आता पुन्हा सुरु केले आहेत. एकंदरीत पाहता आता पुन्हा एकदा एक वर्ष मागे लोटले गेलो आहोत. परंतु आलेल्या परिस्थितीचा मुकाबला समर्थपणाने करावा लागणार आहे. जनताही लॉकडाऊनला वैतागल्याने गेल्या तीन महिन्यात ढिलाई आली होती त्यामुळे आज पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला आहे. जर जनतेने योग्य खबरदारी घेतली असती तर सध्याचे दिवस आले नसते, हे देखील वास्तव नाकारता येणार नाही. सध्याच्या स्थितीत लॉकडाऊन सरकारला व जनतेला असे दोघांनाही परवडणारे नाही. जनतेला घरी बसणे जसे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही तसे सर्व बंद करुन महसूल बुडविणेही सरकारला शक्य नाही. आताच केंद्र व राज्य सरकार कर्जेच्या गर्तेत बुडाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन न करता अनेक निर्बंध लादत आपल्याला देशाचा गाडा हाकावयाचा आहे. तसेच सर्वसामान्य जनतेने खबरदारी घेणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे हे लक्षात घेऊन जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आता पक्षीय हिताचा विचार न करता राज्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. त्यासाठी उगाचच जनतेला भडकाविण्यासाठी बेजबाबदार वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. आता मंदिरे व धार्मिक स्थेळे पुन्हा बंद होणार आहेत. ती उघडण्यासाठी पुन्हा विरोधी पक्षाचे नेते आंदोलने करु शकतात. कोरोना वाढण्यासाठी मुख्य जबाबदार आहे ती म्हणजे गर्दी. ही गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध आणणे गरजेचे ठरणार आहे. जे आवश्यक आहे तेच सुरु ठेवले पाहिजे. सध्याच्या स्थितीत राज्याअंतर्गत वाहतूकच अजून काही सुरु ठेवणे गरजेचे आहे. आन्तरराज्यीय वाहतूक टाळत असताना ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव जास्त आहे ते जिल्हे सिल केले पाहिजेत. गर्दी टाळण्यासाठी थिएटर्स, मॉल, रेस्टॉरंट यांना सद्याच्या काही काळात बंदी घातली पाहिजे. पर्यटन व्यवसाय नुकताच बहरत आला होता, परंतु त्यालाही काही काळ बंद केले पाहिजे. गेल्या काही दिवसात सरकारने चाचण्या वाढविल्या आहेत हे खरे असले तरीही यावेळी लक्षणे कोरोनाची उशीरा दिसत आहेत. त्यामुळे कोरोना ओळखणे आता कठीण जात आहे. पुढील तीन ते चार महिने त्यामुळे आपल्यासाठी फार खाबरदारीचे ठरणार आहेत. सध्या आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. आपल्याकडे सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. अन्य विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या काही लसी खुल्या बाजारात ठेऊन ज्यांची आर्थिक क्षमता लस खरेदी करण्याची आहे त्यांना तो पर्याय खुला करुन दिला पाहिजे. त्याचबरोबर सरकारी पातळीवरील लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग कसा देता येईल याचा केंद्र सरकारने प्राधान्याने विचार केला पाहिजे. आपल्याकडे आता ४० वयोगटाच्या वरील सर्वांसाठी लस घेण्याचा मार्ग खुला झाला आहे परंतु हे केवळ कागदावर करुन भागणार नाही तर त्यासाठी जादा डोस उपलब्ध करुन दिले पाहिजेत. कारण या वयोगटामुळे आपल्याकडे लसीकरण केंद्रावर गर्दी उसळणार आहे. गर्दी उसळली तर तेथे कोरोना वाढण्याचा धोक आहे. त्यामुळे लस घ्यायला गेला आणि कोरोना घेऊन आला असे होता कामा नये. सरकारने लॉकडाऊन घाईघाईने करणार नाही असे म्हटले आहे, त्याचे स्वागतच आहे. परंतु लॉकडाऊन टाळत असताना आता अनेक कडक निर्बंध लादण्याची हीच वेळ आहे. यासाठी विलंब लावता कामा नये.

Related Posts

0 Response to "कडक निर्बंध हवेत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel