भाजपाला दणका
शुक्रवार दि. 10 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
भाजपाला दणका
राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुाकंमध्ये भाजपाला जबरदस्त दणका बसला असून महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणली आहे. सहा पैकी केवळ एका जिल्हा परिषदेवर भाजपला विजय मिळविता आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूरात जबरदस्त धक्का बसला आहे. नागपूर मध्ये 41 जागा जिंकून महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर होईपर्ंयत भाजपाच्या गोटात आपणच जिकणार असा आव होता. मात्र पाच जिल्ह्यात भाजपाला जबरदस्त दणका बसला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यात भाजपाच्या विरोधी कौल लागल्याने आता सत्ता जाताच भाजपाविरोधी फासे राज्यात पडू लागल्याचे स्पष्ट आता दिसत आहे. पालघर मध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीला 30 तर भाजपाला 12 जागा मिळाल्या आहेत. पालघर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 12 जागांवर विजय प्राप्त करता आला आहे. 13 जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. धुळ्यात भाजपाने आपला गड राखला आहे. धुळ्यात भाजपाला 39 महाराष्ट्र विकास आघाडीला 14 जागा मिळाल्या आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेतील 56 जागांपैकी भाजपाला 23 तर महाराष्ट्र विकास आघाडीला 33 जागा मिळाल्या आहेत. वाशिम जिल्हा परिषदेतही भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. या ठिकाणी भाजपाला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाराष्ट्र विकास आघाडीला 27 जागांवर विजय मिळवता आला आहे. आघाडीच्या उमेदवारांना 15 तर अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. अकोल्यातील जिल्हा परिषद आपल्याकडे ठेवण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला यश आले आहे. या ठिकाणी एकूण 53 जागांपैकी वंचित बहुजन आघाडीला 22 भाजपाला 7, महाराष्ट्र विकास आघाडीला 20 जागा मिळाल्या आहेत तर अपक्षांना 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. भारिप-बहुजन महासंघाने अकोला जिल्हा परिषदेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या जिल्ह्यात 4 आमदार आणि खासदार तथा केंद्रीय मंत्री असणार्या भाजपचा मात्र दारुण पराभव झाला. तर, शिवसेनेनेही मुसंडी मारत दुसर्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या निवडणुकीत भारिपने 18 आयात उमेदवार दिले होते. तरीही पक्षांतर्गत बंडखोरी डावलून भारिप विजयी झाला आहे. भारिप बहुजन महासंघाचे तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे हे कान्हेरी गटातून पराभूत झाले आहे. निवडून येण्याची शक्यता कमी असलेले ज्ञानेश्वर सुलताने मात्र विजयी झाले आहेत. शिवसेनेपासून दूर गेलेले आणि भारिप बहुजन महासंघासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धावून जाणारे चंद्रशेखर पांडेही यावेळी भारिपच्या तिकीटवर निवडून आले आहे. भाजप या निवडणुकीत हवे तसे यश मिळवू शकलेला नाही. विशेष म्हणजे, दगडपारवा येथील भाजपच्या उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. तिथेही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2014च्या निवडणुकीत शिवसेना 8 जागांवर विजयी झाली होती. यावर्षी मुसंडी मारत 13 जागांवर सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवारही स्वबळावर निवडून आले आहेत. भाजपाचा दारुण पराभव झाला असतानाही आपल्या या निवडणउकीत सर्वाधिक जागा आल्या अशी आकडेवारी दाखवत गिरा तोभी टांग उपर या म्हणीप्रमाणे वर्तन केले आहे. भाजपाने आपल्या प्रसिद्दी पत्रकात सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत एकूण 332 जागांपैकी 106 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचा दावा केला आहे. भाजपाने दिलेली ही आकडेवारी काही खोटी नाही हे वास्तव असले तरी बहुमताच्या राजकारणात ही आकडेवारी फोल ठरते. पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने बहुमत गमावले आहे, हे वास्तव आहे व ते काही स्वीकाराव.ास भाजपा तयार नाही. एकूण जाागंचा विचार करता भाजपाला सर्वाधिक 106 जागा मिळाल्या तर काँग्रेस (एकूण 70 जागा), राष्ट्रवादी काँग्रेस (46) व शिवसेना (49) अशी आकडेवारी आहे. पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला 194 जागा तर काँग्रेस (145 जागा), शिवसेना (117) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (80) असे बलाबल आहे. अर्थात महाविकास आघाडीचा विजयाचा घोडा चौखूर उधळू लागला आहे, हेच ही आकडेवारी दाखविते. भाजपाच्या विरोधात जर हे पक्ष उभे राहिले तर भाजपाचा पराभव करणे काही अवघड नाही, हेच या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. यातून भाजपाचा भ्रमाचा भोपळा आता फूटू लागला आहे. राज्यात झालेली ही महाविकास आघाडीची मोट आता स्थानिक स्वराज्य पातळीवर आपली मोहोर उमटवू लागली आहे, असाच या निकालांचा अर्थ आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "भाजपाला दणका"
टिप्पणी पोस्ट करा