बदलते जग, बदलते तंत्रज्ञान
रविवार दि. 05 डिसेंबर 2020 च्या अंकासाठी चिंतन -
-----------------------------------------------
बदलते जग, बदलते तंत्रज्ञान
-------------------------------------------
नवीन वर्षाचे म्हणजे 2020 चे स्वागत दरवर्षी प्रमाणे यंदाही जगभरात मोठ्या जल्लोषात झाले आहे. गेले वर्षे हे विविध राजकीय, आर्थिक, सामाजिक घटनांनी ठासून भरलेले होते. याच घटना आता चालू वर्षातही आपल्या भोवती पडछायेप्रमाणे राहाणार आहेत. नव्या सहस्रकातील विसाव्या वर्षात आता पदार्पण झाले आहे. जग झपाट्याने बदलत आहे. आपणही बदलत आहोत हे सत्य आहे. स्वातंत्र्यानंतर आपण आता सात दशके पाहिली, या काळात विकास झालाच नाही असे बोलता येणार नाही. परंतु आपल्याकडील लोकसंख्या व आर्थिक विषमतेची दरी पाहता विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत हे वास्तव आहे. सध्याचे जग हे फार झपाट्याने बदलत चालले आहे. सध्याचा बदलाचा हा वेग कुणी जर गाठला नाही तर त्याला स्पर्धेत टिकाव धरणे कठीण जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या काळात जर टिकाव धरायचा असेल तर त्याला आपल्यात काळानुरुप बदल करावे लागणार आहेत. जुने ते सोने असे म्हणून जर जुने तंत्रज्ञान आपण कवटाळून बसतो तर त्यातून आपली वाटचाल शून्याकडे जाईल. आपल्याकडे बैलगाडी जाऊन मोटारी आल्या, रेल्वे आली, विमाने आली, त्याचबरोबर तंत्रज्ञानही झपाट्याने बदलत गेले. साहेबाने पहिली रेल्वे व्ही.टी. ते ठाणा अशी सुरु केली त्यावेळी बिन बैलांची ही गाडी पाहाण्यासाठी लोकांनी ही गर्दी केली होती. हळूहळू या रेल्वेचेही आकर्षण संपले. एकेकाळी आपल्या दारात मोटार असणे हे मोठे श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. आता मात्र मध्यमवर्गीयांच्या दारात एक नव्हे तर दोन दोन मोटारी दिसतात. असा काळ झपाट्याने बदलत चालला आहे. तंत्रज्ञानही अशाच झपाट्याने बदलत चालले आहे. टाईपरायटरचेही कार्य असेच संपले. एकेकाळी टाईपरायटर शिकणे ही किमान गरज होती. मात्र संगणकाने टाईपरायटरवर गदा आणली व संगणक शिकणे ही आता किमान गरज ठरु लागली. पंधरा-वीस वर्षापूर्वी मोबाईल आले त्यावेळी अजून काही वर्षांनी प्रत्येकाच्या हातातील हे खेळणे होईल असे कुणालाही वाटले नव्हते. मोबाईल येण्याच्या अगोदर पेजर आले होते. हे पेजर कधी आले आणि कधी संपुष्टात आले हे समजलेच नाही. मोबाईलमध्ये गेल्या पंधरा वर्षात झपाट्याने बदल झाले. सुरुवातीला वॉकिटॉकी असणारा मोबाईल आता काही ग्रॅम वजनाचा झाला आहे. अशा प्रकारे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले आहे. याहू ही इंटरनेट काळात सुरु झालेली पहिली कंपनी मागे पडली आहे. म्हणजे त्यांनी काळाच्या ओघात आपल्यात बदल न केल्यामुळे या कंपनीला अन्य कंपनीत विलीन व्हावे लागले. फेसबुकचा उदय होण्यापूर्वी ऑर्कुट ही सोशल साईट अस्तित्वात होती. तरुण पिढी आता ऑर्कुट हे नाव विसरली देखील. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड या विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या जेरी यांग डेव्हिड फिलो यांनी 1995 मध्ये याहू पोर्टल विकसित केले. इलेक्ट्रॉनिक मेल, बातम्या, क्रीडा अशा प्रकारच्या सुविधा आपल्या वापरकर्त्यांना पुरवणार्या याहूचा बोलबाला एकेकाळी सर्वत्र होता. हळूहळू एक स्वतंत्र कंपनी म्हणून याहूने बस्तान बसवले आणि अल्पावधीत इंटरनेट जगतात आपला दराराही निर्माण केला. त्यापाठून आलेल्या जीमेलने त्यांच्यापुढे जबरदस्त मजल मारली. जीमेलने आपल्यात अनेक बदल केले. ग्राहकांना नवीन सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर फेसबुकचा जन्म झाला होता, त्यामुळे सोशल नेटर्किर्ंगचे युग सुरु झाले. सर्वसामान्यांसाठी व्यक्त होण्यासाठी एक नवीन व्यासपीठ तयार झाले. यातून जनमानसातील कौल उभा करण्यापर्यंत या माध्यमाची मजल पोहोचली. मात्र अशा या पार्श्वभूमीवर जीमेनले आपले अस्तित्व केवळ टिकविले नाही तर चांगलीच भरारी घेतली. तर दुसरीकडे याहूची पडझड सुरु झाली. अशा स्थीतीत त्यांना आपले अस्तित्व संपविण्यापेक्षा अन्य एखाद्या कंपनीत विलीन होणे अर्थातच सोयिस्कर वाटत होते. वेब सर्फिंगच्या युगात गुगलने फार मोठी भरारी घेतली हे वास्तव मान्य केलेच पाहिजे. याहू या स्पर्धेत प्रचंड मागे पडली. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत टिकणे कठीण होत होते. याहूचे अवतारकार्य संपले असले तरीही याहूने जो इतिहास निर्माण केला त्याची निश्चितच दखल इतिहासात घेतली जाणार आहे. याहूपासून सध्याच्या काळात या क्षेत्रातील कंपन्यांनी धडा घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ऑर्कुट, याहू पाठोपाठ आता व्टिटरचा क्रमांक लागणार की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण ट्विटरची स्थापना झाल्यापासून कंपनीने प्रथमच महसुलात सर्वाधिक कमी वाढ नोंदविली असून, सोशल मीडियाचे जग वेगाने विस्तारत असताना ट्विटर मात्र मागे पडू लागल्याची चिन्हे आहेत. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया सेवा वेगाने आपली पावले या क्षेत्रात रोवू लागल्या आहेत. याचवेळी व्टिटरला आपले यूजर्स वाढविण्यासाठी धडपड करण्यासाबेत जाहिरातदारांचे मन जिंकण्याचेही प्रयत्न करावे लागत आहेत. व्टिटरचे महिन्याचे सरासरी सक्रिय यूजर्स 313 दशलक्षांवर गेले आहेत. पहिल्या तिमाहीत सरासरी सक्रिय यूजर्स 310 दशलक्ष होते. वर्षाच्या सुरवातीला ट्विटरने दीर्घकालीन धोरण आखले आहे. यात प्रमुख पाच क्षेत्रे विस्तारासाठी निवडण्यात आली आहेत. या ट्विटरची मुख्य सेवा, लाइव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग, व्हिडिओंची सुरक्षा आणि विकास, संकेतस्थळांची निर्मिती व प्रभाव याबाबींचा समावेश आहे. सध्याच्या स्पर्धेच्या ट्विटरच्या पुढील वाटचालीची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. यासाठी ट्विटरने या आठवड्यात एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यात थेट बातम्या, नव्या घडामोडी, चालू घडामोडींवरील तज्ञांची चर्चा या बाबींचा समावेश होता. मात्र व्टिटरला मोठी स्पर्धा करावी लागत आहे. यावर आता ही कंपनी मात करणार की याहूच्या मार्गाने जाणार असा सवाल आहे. भविष्याचा काळा हा सोशल मिडियाचा आहे. यात फेसबुक, व्टीटर, व्हॉटस्अॅप हे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व त्यानंतर झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत सोशल मिडियाने महत्वाची भूमिका बजावली. गेल्या वेळच्या निवडणुकीपासून निवडणुकीच्या प्रचार तंत्रात बदल झाला आहे. सोशल मिडिया आता अग्रभागी आला आहे. या बदलाला सामोरे जाण्याची तयारी अनेक पक्षांनी घेतली आहे. त्याचे त्यांना सकारात्मक परिणामही दिसले. हे बदलते तंत्रज्ञान आता स्वीकारण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. दोन दशकांपूर्वी नवीन सहस्त्रक सुरु झाले. या दोन दशकानंतवर नजर टाकल्यास तंत्रज्ञान झपाट्याने बदललेले दिसते. अन्न, वस्त्र व निवारा या किमान गरजा तर होत्याच, त्या आपण बहुतांशी साध्य केल्या. मात्र आता वीज, पाणी, रस्ते यांच्या जोडीला आता इंटरनेट ही काळाची गरज ठरणार आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे हेच खरे. नवीन वर्षात हा बदल झपाट्याने होणार आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "बदलते जग, बदलते तंत्रज्ञान"
टिप्पणी पोस्ट करा