परिपक्व मतदार...
शनिवार दि. 26 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
परिपक्व मतदार...
आपल्याकडील मतदार मोठा शहाणा झाला आहे. सात दशकांच्या काळानंतर आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. मतदाराला गृहीत धरुन कोणालाच यापुढे जाता येणार नाही. कारण आता मतदार परिपक्व झाला आहे, हेच या निकालाचे विश्लेषण केल्यास आपल्याला दिसेल. यावेळच्या विधानसभा निवडणुका एकतर्फीच होतील अशी हवा युतीने केली होती. परंतु त्यांची ही केवळ हवाच राहिली आणि त्यांचे हे स्वप्न मुसळधार पावसात वाहून गेले. सत्ताधार्यांना जसा या मतदारांनी आवर घातला तसेच विरोधी पक्षांनाही बळ दिले. यातून मतदाराची परिपक्वता जाणवते. मात्र अजूनही सत्ताधार्यांना सत्तेवरुन हिसकावून लावण्याची मानसिकता मतदाराची झालेली नाही. अर्थात त्यांनी पुढील पाच वर्षात चांगली समाधानकारक कामगिरी केली नाही तर पुढच्या वेळी मतदार हिसका दाखवतील यात काही शंका नाही. यासाठीच त्यांनी यावेळी विरोधी पक्षांना चंगलेच बळ दिले आहे. भाजपने सत्ता राखली, पण मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. मुक्यमंत्री फडणवीस यांचा एक हाती नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न फसला, हे अर्थात योग्यच झाले. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिआत्मविश्वासातील हवा मतदारांनी काढून टाकली. एवढेच कशाला भाजपाचे ब्रँड असलेले नरेंद्र मोदी व अमित शहांच्या सभा होऊनही काही भागात अपयश आले. भाजपात जी मेगाभरती झाली त्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली व त्याचाही फटका त्यांना बसला. मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या नेत्यांमुळे निष्ठावंतांमधील नाराजीमुळे जागांत घट झाली. भाजपशी युती करूनही शिवसेनेच्या जागा घटल्या आहेत. याचा अर्थ युतीत सुसंवाद नव्हता. युतीत शिवसेनेचेही असेच झाले. भाजपापुढे अति झुकल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली. शिवसेनेने 2019 मध्ये भाजपशी पुन्हा युती करून शंभरावर जागा मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मतदारांनी सुरुंग लावला. आता भाजपला शिवसेनेची जास्त गरज असल्याने गेल्या 5 वर्षांत मिळालेल्या दुय्यम वागणूकीचा बदला घेण्याचे व सत्तेत स्वत:चे महत्त्व वाढवून घेण्याचे सेनेचे प्रयत्न असतील. निदान उध्दव ठाकरेंनी निदान तसे संकेत दिले आहेत. सक्षम विरोधी पक्षाची पोकळी राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांच्या प्रयत्नाने भरून निघाली. 2014 च्या निवडणुकीनंतर सक्षम विरोधी पक्षाची महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाल्याने सत्ताधारी भाजप- शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला होता. त्यातच अनेक दिग्गज नेते भाजप- सेनेत गेल्याने राष्ट्रवादी पक्षात मरगळ आली होती. मात्र, या काळात खचून न जाता 79 वर्षीय पक्षाध्यक्ष शरद पवारांनी एकहाती किल्ला लढवत खर्या अर्थाने विरोधी पक्षांची जागा सत्ताधार्यांना दाखवून दिली. त्यामुळे गयाराम नेत्यांनाही चपराक बसली व पक्षाला ऊर्जितावस्था मिळाली. राष्ट्रवादीचे जे यापूर्वी 41 आमदार होते, ती संख्या आता 55 पोहोचून सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी ुदयास आला. शरद पवार यांनी एकहाती प्रचार यंत्रणा सांभाळली. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांनी शेतकरी, बेरोजगारांचे, महिलांचे प्रश्न प्रचारात मांडल्याने लोकांना जवळीक निर्माण झाली. यापूर्वी सरकारच्या मागे पूर्णपणे गेलेला मराठा, धनगर समाज आपल्याकडे खेचण्यात पवारांना यश आले. कॉँग्रेसच्या नेतृत्वपदाची धुरा बाळासाहेब थोरातांकडे असली तरी कॉँग्रेसकडे खणखणीत नेतृत्वाचा अभाव होता. युद्दात लढायला सज्जा होण्याअगोदरच कॉँग्रेसने तलवारी टाकल्या असल्यासारखी स्थिती होती. मात्र सरकारविरोधी वातावरण असल्याने तसेच शरद पवारांच्या झंझावती दौर्यामुळे कॉँग्रेसला फायदा झाला. भाजपाने काँग्रेसच्या दिग्गजांना आपापल्याच मतदारसंघात अडकून ठेवल्याने कॉँग्रेसचे बहतांशी नेते आपल्या मतदारसंघातून बाहेर पडू शकले नव्हते. केंद्रीय नेतृत्वातील राहूल गांधींच्या तीन सभा वघळता अन्य कोणीही नेते पारसे प्रचार दौर्यात जळकले नाहीत. असे असले तरीही पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात जागा वाढवणे काँग्रेसला शक्य झाले. आता सक्षम नेतृत्व नसतानाही 44 जागा मिळविणे शक्य झाले. याचा अर्थ जर कॉँग्रेसने आक्रमकरित्या ही निवडणूक लढविली असती तर आणखी काही वेगळे चित्र दिसू शकले असते. खरे तर पक्षांतर वाढल्याने कार्यकर्ते गलितगात्र झाले होते, मात्र राष्ट्रवादीशी मैत्रीचा फायदा कॉँग्रेसला मिळाला. दलित- मुस्लिम मते खेचण्यात अपयश आले असले तरीही पवारांना मोठेपणा दिल्याचा फायदा कॉँग्रेसला झाला. राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे प्रचाराचे मैदान गाजवले, या वेळी त्यांचा रोख हा सक्षम विरोधी पक्षाची सत्ता देण्याचा होता. परंतु यावेळीही त्यांचा हा फंडा काही काम करु शकला नाही. शेवटी त्यांना एकाच जागेवर समादान मानावे लागले. लोकसभेला आघाडीच्या 12 जागांवर नुकसान करणार्या प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधानसभेतही फारसा प्रभाव टाकू शकली नाही. त्यांची राज्यभरात नुसतीच चर्चा झाली, मात्र एकही जागा निवडून आणणे या आघाडीला शक्य झाले नाही. त्यांची एमआयएमशीही असलेली युती तुटली. दलित, मुस्लिम बौद्ध मतांवर या वेळी वंचितची मात्रा चाललेली दिसली नाही. एमआयएमला यवेळी आपले संख्याबळ कायम राकण्यात यश आले. शेकापला रायगडात अपयश आले असले तरी त्यांनी नांदेडमध्ये आपले खाते खोलले. मतदार हा राजा आहे, त्याच्या मर्जीनुसारच चालणार हे पुन्हा एकवार सिद्द झाले.
--------------------------------------------------------------

0 Response to "परिपक्व मतदार..."
टिप्पणी पोस्ट करा