-->
थिम गितांचे वॉर / सुबोध भावेही ट्रोल

थिम गितांचे वॉर / सुबोध भावेही ट्रोल

मंगळवार दि. 09 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
थिम गितांचे वॉर
सध्याच्या निवडणुकीत प्रचाराचे तंत्र पूर्णपणे बदलले आहे. गेल्या वेळी पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मिडियाचा प्रचारासाठी आक्रमकरित्या वापर केला व त्याचे त्यांना चांगलेच यश लाभले. त्यावेळी सत्तेत असूनही कॉँग्रेसला या सोशल मिडियाचे महत्व पटले नाही व त्याचा त्यांना फटका सहन करावा लागला. यावेळी देखील अशाच प्रकारे भाजपाने सोशल मिडियावर आक्रमक प्रचार सुरु केला असून त्यांना आता शंभर टक्के प्रतिसाग गेल्या वेळ प्रमाणे नाही हे वास्तव स्वीकारले तरी आज सोशल मिडियात त्यांच्यासारखा आक्रमकपणा अन्य कोणत्याच पक्षाने घेतलेला नाही. कॉँग्रेसला अजूनही याचे महत्व फारसे पटलेले नाही हे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे. आता थिम गितांची रेलचेल भाजपा व कॉँग्रेसमध्ये सुरु झाली आहे. सध्याच्या उन्हाळ्यात भर उन्हात प्रचार करण्यापेक्षा अशा प्रकारे सोशल मिडियाव्दारे तसेच थिम गितांचा वापर करुन आक्रमक प्रचार आता सुरु झाला आहे. काँग्रेसने रविवारी अब होगा न्याय ही नवी घोषणा संगीतम रुपाने जनतेपुढे आणली आहे. काँग्रेसच्या न्यायचा अर्थ किमान उत्पन्न योजना असा आहे. तर भाजपने मतदानाआधी फिर एक बार मोदी सरकार व तीन नवे थीम गीते आणली आहेत. भाजपाच्या प्रचाराच्या केंद्रभागी केवळ मोदीच आहेत खरे तर त्यांनी केलेल्या कामाची जंत्री जनतेपुढे ठेऊन त्या आधारावर मते मागितली पाहिजे होती. परंतु त्यांच्याकडे दाखविण्यासारखे काहीच काम नाही, त्यामुळे त्यांनी मोदींवर भरोसा ठेवीत थिम गिते स्वरबध्द केली आहेत. भाजपची प्रमुख घोषणा मोदी है तो मुमकिन है, ही घोषणा मोदींनी फेब्रुवारी महिन्यातच राजस्थानातील विजय संकल्प रॅलीमध्ये दिली होती. पक्षाने ती निवडणूक प्रचारात आणली. फिर एक बार मोदी सरकार ही घोषणा या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतील अधिवेशनात दिली गेली. मोदींच्या 100 विजय संकल्प सभांमध्ये या घोषणेवर भर देण्यात आला होता. आता पक्षाने तीच मुख्य घोषणा केली. नमो अगेन ही घोषणा जानेवारीत देण्यात आली. तिचा वापर डिजिटल कॅम्पेनमध्ये करण्यात येत आहे. मैं भी चौकीदार ही घोषणा मोदी यांनी 31 मार्चला 29 राज्यांतील 500 जागांवर चौकीदारांशी संवादाच्या वेळी दिली. परंतु या चौकीदाराची फार थट्टा कॉँग्रेसकडून झाल्याने ही आता मागे पडली आहे. वक्त है बदलाव का मार्च मधील दिल्लीत काँग्रेस अधिवेशनात ही घोषणा राहुल गांधी यांनी दिली. पुन्हा आठ विधानसभा निवडणुकांत ती प्रमुख घोषणा ठरली. कॉँग्रेससाठी ही घोषणा फारच फायदेशीर ठरली होती. चौकीदार चोर है ही घोषणा राहुल गांधी यांनी राजस्थान निवडणुकीत दिली होती. आता राहुल सभेच्या प्रारंभी स्वत: चौकीदार चोर है अशी घोषणा देतात. गीतकार जावेद अख्तर यांनी कॉँग्रेससाठी लिहिलेले थीम साँग हां मैं हिंदुस्तान लोकप्रिय होणार असे दिसते. राहुल व प्रियंका यांनी स्वत: अब होगा न्याय कॅम्पेन ठरवले. त्याचे एक डझन व्हिडिओ व जिंगल जारी होतील. एकूणच आता थीम गीतांचे वॉर सुरु झाले आहे.
सुबोध भावेही ट्रोल
कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची पुण्यातील तरुणाईंसोबत गाजलेली मुलाखत अभिनेता सुबोध भावे यांनी घेतली होती. त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीबाबत सोशल मिडियात ट्रोल करण्यात आले. सध्या भाजपा कोणतीही संधी सुटू देत नाही. सुबोध भावे हे उघडपणे कोणत्याही पक्षाचे नाही. एक चांगले कलाकार आहेत. एक अभिनेता म्हणून त्यांनी राहूल गांधींची मुलाखत घेतली होती. परंतु त्यांनी कॉँग्रेस अध्यक्षांची मुलाखत घेतल्याने भाजपाचे लोक खवळले व त्यांनी सोशल मिडियातून भावेंना चांगलेच धारेवर धरले. शेवटी भावे यांना आपली भूमिका स्पष्ट करणे भाग पडले. भाजपाची मंडळी नेहमीच व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासंबंधी टीका करतात. आता सुबोध भावेंचे हे स्वक्तीस्वातंत्र्य नाही का? त्यांनी मुलाखत कोणाची घ्यायची हे ठरविण्याचाही त्यांना अधिकार नाही हे दुर्दैवी आहे. या पार्श्‍वभूमीवर सुबोधने स्पष्टीकरण दिले. मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांत भेदाभेद शिकवत नाहीत. मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो व त्याचा अभिमान आहे. माझ्या सहकार्‍यांचा व उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्‍वास आहे व प्रेम आहे. आजपर्यंत मी मोहन भागवत, शरद पवार, देवेंद्र फडणवीस ,राज ठाकरे, रामदास आठवले या सर्वांना अतिशय प्रेमाने भेटलो. राहुल गांधी यांनाही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्याच आदर व प्रेमांनी भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला. सुबोध भावेंचे हे मनोगत या हिंदुत्ववाद्यांना धडा शिकविणारे आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "थिम गितांचे वॉर / सुबोध भावेही ट्रोल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel