-->
कारणे पराभवाची

कारणे पराभवाची

गुरुवार दि. 13 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कारणे पराभवाची 
पाच पैकी तीन राज्यात पराभव झाल्यावर भाजपाच्या कार्यालयात सन्नाटा पसरला होता. तसे होणे अपेशीतच होते. कारण भाजपाचा विजया बाबत एवढा आत्मविश्‍वास होता की पराभव स्वीकारणे त्यांना जड जाते आहे. विजयाबाबत कोणीही आशावादी असणे यात काही चूक नाही. परंतु लोकांना गृहीत धरण्याचा फाजिल आत्मविश्‍वास असू नये. सत्ता आली की त्या भोवती अनेक हितसंबंधी येतात. यातून कार्यकर्ते दूर सारले जातात, जनतेला गृहीत धरण्याची मनोवृत्ती सुरु होते. एजंट, कंञाटदार यांचे मोहोळ मंञ्यांभोवती तयार होते. यातच पराभवाची नांदी सुरु होते. यापूर्वी काँग्रेसचे असेच झाले होते. आता भाजपचे झाले. सत्ता आली की सत्ताधार्यांचे पतंग हवेत उडू लागतात. मग जनता निवडणुकीत या पतंगाचा मतपेटीव्दारे दोर कापते. नंतर या राजकारण्यांचे पाय अचानक जमिनीवर येतात. नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्याकडे सत्ता आल्यापासून एक प्रकारे मग्रुरी आल्यासारखे दिसत होते. आपल्या देशाचा इतिहास-भूगोल विसरुन आपण करु तेच खरे अशा थाटात ते वागू लागले होते. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विधवेसंदर्भात केलेले विधान हे तर मग्रुरीची परिसीमा होती. सोनिया गांधींचे पती हे गोळ्या झेलून हुतात्मा झाले आहेत, याचे त्यांना भान राहिले नाही. आपल्याकडील जनतेला विधवा, शहिदांच्या सदर्भात बोललेले सहन करीत नाही. मग बोलणार्‍या व्यक्तीची कितीही लोकप्रियता असो. त्याला माफी नाही. मोदींना आपल्या सत्ताकारणाचा एवढा गर्व झाला की, त्यांनी टिका करताना आपण कोणावर व कशी टिका करीत आहोत याचे भान राखले नाही. भाजपा अध्यश अमित शहा यांनी देखील सत्तेत आल्यावर काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली. ही देखील त्यांची मग्रुरी व लोकशाहिविरोधी घोषणा होती. कारण आपल्याकडे लोकशाहीत प्रबळ विरोधी पश अपेशित आहे. विरोधी पशाला संपविण्याची त्यांची घोषणा ही तर हुकूमशाहीचे द्योतक होते. काँग्रेस पशाला स्वातंञ्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला कीतीही मान्य नसला तरी फुसला जाऊ शकत नाही. काँग्रेसच्या सत्ताकरणात जरुर चुका झाल्या असल्या तरी त्यांना या देशातून संपविता येणार नाही. या देशात आपली विचारधारा मांडण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे. काँग्रेसने सत्तेत असताना हिंदुत्वाच्या विचारसारणीच्या लोकांना कधीच विरोध केला नाही किंवा त्यांच्यावर बंधने आणली नाहीत. मग भाजपा सत्तेत आल्यावर काँग्रेसला संपविण्याची भाषा का करतो? यामागे केवळ सत्तेची गुरमीच म्हटली पाहिजे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे देखील पंतप्रधान होते परंतु त्यांनी असा कधी विचार केला नाही. मोदी-शहा यांच्या जोडीने देशात हुकूमशाहीसारखी स्थिती निर्माण केली. आणीबाणी इंदिरा  गांधींनी कितीही चांगल्या हेतूने आणली असली तरी जनतेला ती अन्यायकारक वाटली, त्यामुळे त्यांना जनतेने आपला हिसका दाखविला. परंतु लगेचच केवळ दोन वर्षातच सत्तास्थानी बसविले. जनतेचे प्रेम व रोष लोकशाहीत असे असते. आता पुढील पन्नास वर्षे राज्य करण्याचा मनोदय जाहिर करणे म्हणजेच जनतेला गृहीत धरण्याचा  हा प्रकार आहे. ज्या मोदींना प्रेमाने सत्तेत आणले तीच जनता लाथाडू शकते हे विसरता कामा नये. या देशात तब्बल तीन दशकानंतर जनतेने एकाच पशाला बहुमताने निवडून दिले होते. तो विश्‍वास आता मोदींनी गमावला आहे. केवळ गुंड, कंञाटदार यांना सोबत ठेऊन लोकांची केली जात नाहीत. अशा प्रकारे एखादी निवडणूक जिंकता येऊ शकेलही, परंतु कायम हे राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. माञ या संदर्भात काँग्रेस अध्यश राहूल गांधी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्यावर गेली चार वर्षे होत असलेली अवहेलना, टिकेचा भडीमार, सोशल मिडियावरील ट्ोलिंग यातून स्वत:ला सावरीत त्यांनी कधीही तोल ढळू दिलेला नाही. एका निश्‍चयाने काम केले. लोकांचे म्हणणे ते शांतपणे एैकून घेतात व त्यानंतर आपले विचार मांडतात. हा त्यांचा मोठा गूण आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपले नेतृत्व कौशल्य सिध्द करुन दाखविले आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील अशा प्रकारे विरोधकांची टिका सहन करावी लागली होती. परंतु त्यातून तालासुलाखून त्यांचे नेतृत्व सिध्द झाले होते. आज राहूल गांधी यांच्या नेतृत्वाच्या  निमित्ताने याची आठवण यावी. विरोधकांनी गेल्या वर्षी सरकारवर मांडलेल्या अविश्‍वास ठरावाच्या वेळी राहूल गांधींनी जे आक्रमक, संवेदनाश्कम व सकारात्मक गूण दाखविणारे भाषण केले होते. त्याचवेळी त्यांच्यातले नेतृत्वगूण झळाळले होते. मोदी-शहा यांच्यात आपणच हुशार, ग्रेट आहोत हे सांगण्याची चढाओढ असते. परंतु त्यांची भाषणे टी.व्ही.वर लागली की लोक चँनेल बदलतात अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. ही स्थीती त्यांनी स्वत:वर ओढावून घेतली आहे. पंतप्रधानांनी सर्व पशीयांना सोबत घेऊन जात देशाचे नेतृत्व केल  पाहिजे. परंतु मोदी तिकडे कमी पडतात. कारण त्यांना दुसर्‍यांचे एैकायचे नसते व आपले तेच खरे हे सांगायचे असते. त्यांच्या या स्वभावामुळेच घात झाला आहे व भविष्यातही होणार आहे. आता त्यांना जनतेला गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा द्यावयाचा आहे. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता किती केली ते दाखवायचे आहे. यावेळी मोदी व भाजपला त्या आधारावर जनता मते देणार आहे. याची त्यांनी जाण ठेवावी.
----------------------------------------------------------

0 Response to "कारणे पराभवाची "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel