-->
राहूल- इन अ‍ॅक्शन

राहूल- इन अ‍ॅक्शन

बुधवार दि. 29 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राहूल- इन अ‍ॅक्शन
राहूल गांधी आता सध्या आपल्या विदेशातील दौर्‍यात आक्रमक भाषणे करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार करीत आहेत. त्यांचे जर्मनीतील पहिलेच भाषण जोरदार गाजले. तेथील विद्यार्थ्यांपुढे बोलताना त्यांनी आक्रमकपणाने भारताचे प्रश्‍न मांडले, इतिहास विषद केला, इतिहासातून आपम काय धडे घ्यायचे ते सांगितले व सर्वात महत्वाचे म्हणजे आपण विव्देशाचे राजकारण करीत नाही हे ठासून सांगितले. पंतप्रदान नरेंद्र मोदींवर कदी थेट तर कधी टोमणे मारुन बोचरी टीका ते करीत आहेत. एकूणच राहूल गांधी सध्या इन अ‍ॅक्शन जागतिक मैदानात उतरले आहेत. त्यांचे हे रुप म्हणजे भाजपाने त्यांच्यातील रंगविलेला पप्पू कधीच संपल्याचे द्योतक आहे. भविष्यात आपणच या देशाचे नेतृत्व करण्यास लायक आहोत हे ते दाखवून देत आहेत. त्यांचा हा दौरा बहुतांशी यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल.जागतिक व्यासपीठावर ते नरेंद्र मोदींचा पुरता कचरा करत आहेत. भाजपचे नेतृत्व त्यामुळे हैराण झाले आहे. त्यामुळे संबित पात्रा यांच्यासारखे भाजपाचे आक्रस्ताळी प्रवक्ते हे दररोज राहुल यांच्या दौ़र्‍यावर कडवट भाष्य करत आहेत. भाजपाच्या मते जर राहूल गांधी हे परिपक्व आहेत, पप्पू आहेत तर त्यांच्या दौर्‍याची एवढी दखल त्यांना घ्यायचे कारणच नाही. परंतु राहूल यांच्या टिकेने भाजपा अस्वस्थ आहे. याचे कारण त्यांना पटले आहे की, भविष्यात राहूल म्हणजे गांधी घराणेच आपल्याला धोकादायक ठरणार आहे. आज देशातील प्रसारमाध्यमांवर विशेषतः वृत्तवाहिन्यांवर नरेंद्र मोदी व भाजपाने संपूर्ण नियंत्रण मिळवलेले आहे. त्यामुळेच ब़र्‍यााच वृत्तवाहिन्या राहूल गांधी यांची भाषणे फारच त्रोटक दाखवित आहेत. परंतु त्यांनी जरी राहूल गांधींची भाषणे दाखविली नाहीत तरी व्हॉटससअ‍ॅपवरुन ती फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे जनतेत त्याची चर्चा सुरु आहे. सध्या मोदींना आपल्या गेल्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडावयाचा आहे. मोदींनी दिलेली आश्‍वासने खरोखरीच सत्यात आली का ते जनतेला बघायचे आहे. सध्याच्या घडीला तरी मोदींच्या विरोधात जनमत चालले आहे. येत्या दहा महिन्यात लोसकभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला एकहाती सत्ता मिळणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. मात्र राहूल वगळता कॉग्रेस पक्ष अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे. ही वस्तुस्थिती असली तरीही सर्व विरोधक एकवटल्यास भाजपा सत्तेत येत नाही हे शंभर टक्के सत्य आहे. 2019 मध्ये मोदी परत पंतप्रधान बनणार ही जवळजवळ काळया दगडावरची रेघ आहे, असे 2017 साली सांगणारे अर्थतज्ञ रुचिर शर्मा आता बदलले आहेत. मोदींचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे हे अर्थतज्ञ आहेत. पुढील वषी मोदी परत पंतप्रधान बनण्याची संधी 99 टक्क्यावरून आता 50 टक्के एवढी खाली घसरली आहे असे ते सांगत आहेत. शर्मा यांची आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय अर्थ-राजकारणावरील भाकिते ही लक्षणीय राहिलेली आहेत. विरोधी पक्ष एकत्र येण्यास सुरुवात झाल्याने मोदी दिवसेंदिवस जास्त अडचणीत येऊ लागले आहेत असे शर्मांचे मत आहे. राहुल यांचे हे विदेश दौरे हे ठोशास ठोसा प्रत्युत्तर देण्याकरता फक्त नाहीत, तर राहुल गांधी हे मोदींना एकमेव पर्याय आहेत असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदेश देण्याची रणनीति या दौ़र्‍यामागे आहे. मोदींशी दोन हात करू शकणारा एकमेव भारतीय नेता अशी प्रतिमा करण्यासाठी राहुल यांचा हा दौरा आहे व त्यांचा उपयोग होत आहे असे दिसत आहे. मोदी आणि मोदी समर्थकांच्या तोंडी सदा राहुल यांचेच नाव असते. त्याचा फायदा देखील काँग्रेस अध्यक्षांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौ़र्‍यांंमध्ये स्वतःची प्रतिमा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील एकमेव लोकोत्तर नेता अशी करायचा प्रयत्न केला होता. आता राहूल गांधी या मैदानात उतरल्याने मोदींना एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अन्य कोणत्याच विरोधी पक्षाकडे राहूल गांधींसारखा अशा प्रकारे भाषणे करणारा नेता आज नाही. जे कोणी स्थानिक पक्षांचे नेते आहेत ते जागतिक व्यासपीठावर जाऊन अशा प्रकारे भाषणेे करु शकत नाहीत. उलट नरेंद्र मोदींनी आपल्या परदेश दौ़र्‍यांचा वापर काँग्रेसच्या नावाने खडे फोडण्यात करून पंतप्रधानांनी एक वादग्रस्त पायंडा पाडला. पंतप्रधानपदावरील व्यक्तीस अशा प्रकारे जागतिक व्यासपीठावरुन राजकीय वक्तवे करणे शोभणारे नाही. त्यापेक्षा राहूल गांधींची भाषणे ही आक्रमक असली तीरीही पंतप्रदानांची निंदानालस्ती करणारी नाहीत. त्यांच्या धोरणावर ते टीका करीत आहेत व त्यातून देशाची कोणतीही बदनामी होणार नाही याची ते दखल आवर्जुन घेतात. यातून त्यांच्यातील एक परिपक्व नेता आता दिसू लागला आहे. अशा प्रकारे शांतपणे ते मोदी ब्रँडची हवा काढत आहेत. यावेळी कॉग्रेसला कितपत यश लाभेल हे आत्ताच सांगता येत नाही. परंतु राहूल गांधींचे नेतृत्व एक पर्याय म्हणून धीमेगतीने का होईना उभे राहात आहे ही चांगली बाब म्हटली पाहिजे.
-----------------------------------------------------------

0 Response to "राहूल- इन अ‍ॅक्शन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel