-->
पुणेरी उच्चशिक्षण

पुणेरी उच्चशिक्षण

शुक्रवार दि. 08 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पुणेरी उच्चशिक्षण
शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करणार्‍या एका संस्थेने जाहीर केलेल्या क्रमवारीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ अव्वल ठरले आहे. हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही.         देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. आपल्यासाठी शरमेची बाब म्हणजे, जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. टाइम्स या संस्थेकडून दरवर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. यावर्षी संस्थेने 77 देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून मंगळवारी जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर 27 देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या 200मध्ये आहे. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ 42 संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या 300 संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.  देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संयुक्तपणे सातवा क्रमांक पटकावला असून पारंपारिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर होते. यंदा विद्यापीठाने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाला मागे टाकले आहे. पुणे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही पारंपरिक विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा जगातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून नेहमीच ओळखले गेले आहे. आता पुण्याच्या विद्यापीठाचे आपला शैक्षणिक दर्जा चांगला टिकवून ठेवला आहे त्याचे प्रमाणपत्रच मिळाले आहे. दुदैवाची बाब म्हणजे देशात जी पहिली विद्यापीठ स्थापन झाली त्यातील मुंबई विद्यापीठाचा आता मात्र दर्जा पूर्णपणे ढासळला आहे.
------------------------------------------------------

0 Response to "पुणेरी उच्चशिक्षण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel