-->
गाव गाता... राण्यांचो गजाली!

गाव गाता... राण्यांचो गजाली!

सोमवार दि. 11 सप्टेंबर 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
गाव गाता...
राण्यांचो गजाली!
चतुर्थीक आयल्ली माणसां खड्यातसून मुंबईक सुखरुप पोचल्यानी आणी हयसर धुमशान सुरु झाल्यानी. आता तुमी म्हणश्यात आता कसला धुमशान? अहो ह्या राजकारणातला धुमशान. आमचे नेते नारायणराव आता भाजपाच्या दरवाज्यात जावन् बसलेसत, पण त्यांका काय गेले चार म्हयने झाले प्रवेश मिळणासा नाय. जुने निष्ठावान कॉग्रेसवाले आणी राण्यांच्या बरोबर आयल्ले शीवशैनीक यांच्यात चार दीसापूर्वी सावंतवाडीत झालल्ला, ता धुमशान सध्या गावागावात चर्चेचो विषय हा. खरा तर आपलो जिल्ह्यार कंट्रोल आसा ह्या दाखवच्यासाठीच ह्या धुमशान राण्यांच्या समर्थकांनी केल्यानी. म्हणजे तेचा असा झाला, राण्यांच्या निष्ठावानांनी ओरसाक बोलयली जिल्हा कॉग्रेसची मिटींग. बरा तिकडे कॉग्रसचे नेते राहूल गांधी मराठवाडयाच्या दौर्‍यात आले असताना नेमकी त्याच दिवशी ही मिटींग राणे समर्थकांनी बोलवल्यानी. हो काय योगायोग नव्हतो, राण्यांक तिकडे जावचा नव्हता म्हणान त्यांनी ही मिटींग बोलावल्यांनी, ह्या सांगूक कोण मेलो ज्योतिषी नको. या मिटींगाक ही गर्दी आणी निष्ठावान कॉग्रेसवाल्यांनी ओसरगावाक बोलायल्या मिटींगाक कुत्रोय नव्हतो. मी तुमका म्हणान सांगतय, राण्यांचा बाकी सगळा तुमी सोडून द्या, अजून तेंच्या मागे लोका आसत. निष्ठावान कॉग्रेसवाले आता हाताच्या बोटार रवलेत. उद्या राणे पक्षातून गेल्यार ते काँग्रेस जिल्ह्यात जीवंत ठेवतीत पण त्यात काय मजा नाय हां. कोणच सभेक नाय म्हटल्यार निष्टावानांनी आपली सभा सावंतवाडीक हलयली. आजच्या घडीक वाडीक शे-दोनशे कॉग्रेसवाले आसत. ह्या राण्यांच्या लोकांक समजल्यार त्यांनी सावंतवाडीक आपलो मोर्चो नेल्यानी. निष्ठावानांचा नेतृत्व होता, खासदार हुसेन दलवाईंकडे. हो बाबडो सज्जन, देव माणूस. राष्ट्रसेवा दलातसून समाजवादी पंथ आणि कॉग्रेस व्हाया जनता दल अशी त्येंची राजकीय वाटचाल. एक तर त्येंचो मूळ जन्मगाव रत्नागिरीत, त्यामुळे त्यांका तळकोकणात फारशी डिमांड नाय. पण तरी कॉग्रेसचो कोकणातलो खासदार म्हटल्यार त्येंचो वावार आता संपूर्ण कोकणात असता. गजालीच्या नादात बघा मी व्हावन् गेलय. आता मूळ मुद्दयार येतय. ते दिवशी सावंतवाडीच्या जिल्हा कॉग्रेसच्या बैठकीत राणेंच्या समर्थकांनी त्या मिटींगचो कंट्रोल घेतल्यांनी आणी मगे काय? ह्या धुमशान. आता मागा तुमी सांगा, तुमका आता काँग्रेस सोडूचीच आसा ना मग हया धुमशान कित्याक घालतात? सध्या काय ते गप रवा आणी भाजपातसून सिग्नल मिळाल्यार काय ते गपचूप कॉग्रेस सोडून जाया ना भाजपात. तुमका कोण अडवतलो? आता माका तुमी सांगा अशी धुमशाना घातल्यात ते भाजप आणी संघवाले ह्यांका पक्षात घेतीत काय? कडी लावा आतली, मी नाय बाय त्यातली, अशी म्हण त्येंच्यासाठी फिट आसा. त्येंच्याकडे आता एवढो फ्लो सुरु आसा की त्यांनी आता पक्षप्रवेशासाटी हाऊसफूल्ल चो बोर्डच लावण्याचो शिल्लक ठेवल्यानी. बरा, राण्यांक पक्षात घेवक् भाजपातल्याच किती लोकांचो विरोध आसा ह्या तुमका म्हायत आसा ना? काय आसा, हे सगळे मूळचे निष्ठावान शीवशैैनीक आणि त्यातल्या त्यात मुंबयचे शैनीक. त्यामुळे त्यांच्यात जरा जास्तच रग. आता तुमका कॉग्रसेमध्ये येवन् झाली अकरा वर्षा. पण असून हे कॉग्रेसच्या संस्कृतीत काय रमूक नाय. थंडा करके पीयो, श्रध्दा आणी सबुरी हे कॉग्रेसचे मूलमंत्र ह्येंनी जर गेल्या काही वर्षात आत्मसात केले असते तर हे मुख्यमंत्री झाले नसते काय? पण ह्येंका सांगीत कोण? सांगात तो मूर्ख ठरात. काय मी म्हणतय ता तुमका पटता ना? पण काय सांगू गाववाल्यांनो, शीवशेनत असलेले राणे मी बघलेसत. त्येंंचा मुख्यमंत्री म्हणान काम मी ह्या डोळ्यांन् बघलासा. माका आपला नेहमी वाटा, हो माणूस जर पुना मुख्यमंत्री जायत तर कोकणाक बरे दीस येतीत. पण आता भाजपात गेल्यार मुख्यमंत्री होण्याचा सोडा मंत्रीपद मॅळता की नाय असाच माका वाटता. जेंका मुख्यमंत्री होवचा आसा किंवा राजकिय वावर वाढवचो आसा तेंका सर्व पक्षात मित्र जपान ठेवक् होये. आमचे पवार बघा, तेंचे सगळ्या पक्षात मित्र. राण्यांचे मित्र जेवढे त्यापेक्षा शत्रूच जास्त. माका तरी वाटता, सध्याच्या काळात कॉग्रेस सोडण्याची काय गरजच नव्हती. कारण आता मोदीसायबांचे सर्व प्रयोग फेल होत चललेसत. नोटाबंदी फेल गेली, काळो पैसो विदेशातून येवचो होतो तो खय गेलो, तेचा त्येंकाच म्हायत. प्रत्येकाच्या खात्यार पंधरा लाख जमा होतले म्हणान सांगलला, तेचा काय झाला? कोणच काय बोलणासा नाय. मोदींची फक्त घोषणाबाजी आणि जाहीरातबाजीच हो. काम काय नाय. आता ह्या लोकांक पटू लागलासा. त्यामुळे दोन वर्षान येणारी निवडणूक सोशल मिडीया आणि चॅनलांक खिशात घालून त्येंका जींकूक मदतकारक ठरुची नाय, असा माका तरी वाटता. आणी आयुश्यात एकदा पक्ष बदल लोका सहन करतीत, पण अशे तुमी जर दर धा वर्षान पक्ष बदलल्यान तर तुमची पत रवची नाय. बरा, कॉग्रेसान तुमका बराच काय दिला. दोन नंबरचा मंत्रीपद दिल्यांनी, पराभव झाल्यार विधानपरिषद दिल्यानी. एका झिलाक खासदार आणी दुसर्‍याक आमदार केल्यानी. आणखी काय ह्योया? नारायणराव एक लक्षात ठेवा, आता लोका शाणी झालीसत. त्येंच्या मनाक पटला तरच मत दितले. नाय तर तुमी मागच्या विधानसभेत पडले नसत्यात. आता भाजपात गेल्यार जर लोकांक ह्या पसंत नाय पडला तर शीवशेना आणि कॉग्रेस एकत्र येवन तुमचो आणि तुमच्या झीलाचो पराभव करतले. दोन वर्षांन जर भाजपाची सत्ता गेली तर तुमी काय करतल्यात? गावात सध्या काय गजाली चल्लसत ता मी तुमका संगल्यांनी, बाकी तुमका ह्योया ता करा.
------------------------------------------------------------------  

0 Response to "गाव गाता... राण्यांचो गजाली!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel