-->
कोण आहेत हत्यारे?

कोण आहेत हत्यारे?

रविवार दि. 10 सप्टेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
कोण आहेत हत्यारे?
-----------------------------------------
एन्ट्रो- डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या चारही हत्या या वैचारिक हत्या असून त्यांचा विचार संपविण्यासाठी केलेला तो भ्याड हल्ला होता. अर्थाच अशा प्रकारे हत्या करुन कोणताच विचार संपत नसतो, हे हल्लेखोरांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. विचारांचा मुकाबला हा विचारानेच करावयाचा असतो. विचारांचा मुकाबला करीत असताना हत्येचे अस्त्र उगारले तर त्यतून चिडचीड व वैचारिक अगतिकता व्यक्त होते. देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात म्हणजे सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलणार्‍या आणि लिहिणार्‍या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अर्थातच हे हल्लेखोर उजव्या विचारांचे समर्थन करणारे आहेत, यात काहीच शंका नाही...
-------------------------------------------------
महाराष्ट्र हा विचारवंतांचा व मुक्त विचारसारणीचा असल्याचे नेहमीच सांगितले जात होते. परंतु आता महाराष्ट्र पुन्हा एकदा पुरोगामित्वापासून दूर ढकलला गेला आहे. पत्रकार व सर्वधर्मसमभाव मानणार्‍या गौरी लंकेश यांची हत्या कुणी केली असा सवाल उपस्थित होतो. पोलीस आपल्य परीने त्याची चौकशी करतील. गुन्हेगार पकडले जातीलही. कदाचित त्यांना शिक्षाही होईल. परंतु ज्या उद्देशाने लंकेश यांची हत्या केली गेली, ती मानसिकता त्यामुळे संपणार नाही. आपलाच विचार हा पक्का आहे. दुसर्‍याचा विचार हा विष आहे असे मानणार्‍यांनी ही हत्या केली आहे. प्रत्येकाला आपला विचार जपण्याचे स्वातंत्र्य हे देशाच्या घटनेने दिले आहे. आपला विचार अन्य कुणावर लादणे म्हणजे तो गुन्हा आहे. विचारांचा मुकाबला करायचा असेल तर तो बंदुकीने नाही तर विचारानेच केला पाहिजे, असे मानणारी एक पिढी होती. आता ही पिढी संपली आहे. माझा विचार हाच खरा आहे, सर्व जनतेने तोच विचार अंगिकारला पाहिजे असे समजणारी हुकूमशाही आपल्याकडे जन्माला आली आहे. याच प्रवृत्तीने गेल्या काही वर्षात अनेक हत्या केल्या आहेतच. आता ही मानसिकता बदलण्याचे आव्हान आहे. गौरी लंकेशंना कुणी मारलं? नरेंद्र दाभोलकरांना कुणी मारलं? महात्मा गांधींना कुणी मारलं? बाबासाहेबांना काळाराम मंदिरात दगड कुणी मारला? स्री शिक्षणासाठी झटणार्‍या सावित्रीबाईंवर शेण कुणी फेकून मारलं? शिवाजी महारांजांचा क्षात्रधर्म कुणी नाकारला? तुकोबांच्या विचारांना कुणी मारलं? चोखोबाला गाडून कुणी मारलं? संभाजी महाराजांना वेदप्रमाणित शिक्षेने कुणी मारलं? फादर ग्राहम स्टेन्संना लहान मुलांसह कुणी जाळून मारलं? इराणमध्ये गाडी चालवण्याचा गुन्हा करणार्‍या महिलेला कुणी मारलं? पत्रकार डँनियल पर्लला कुणी मारलं? बांग्लादेशात हिंदूंना कुणी मारलं? गुजराथेत मुस्लिमांना कुणी मारलं? गँलिलीओला कुणी मारलं? धर्मचिकित्सा करणार्‍या साँक्रेटिसला कुणी मारलं? सत्य, समता, बंधुता, एकता, न्याय आणि नैतिकता या सर्व मुल्यांना कुणी मारलं? आपल्या समाजबदलाच्या प्रक्रियेत असे अनेकांचे प्राण गेले. आपण आता पुढारलेले म्हणू लागल्याने आता देशात समता, सर्वधर्मसमभाव नांदेल अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली. सर्व विरोधी पक्षांनी, समाजसेवी संस्थांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. मात्र पंतप्रधानांना यासंबंधी साधे व्टिट करावेसेही वाटले नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असून देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या चारही हत्या या वैचारिक हत्या असून त्यांचा विचार संपविण्यासाठी केलेला तो भ्याड हल्ला होता. अर्थाच अशा प्रकारे हत्या करुन कोणताच विचार संपत नसतो, हे हल्लेखोरांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. विचारांचा मुकाबला हा विचारानेच करावयाचा असतो, त्यात विचारांचा मुकाबला करीत असताना हत्येचे अस्त्र उगारले तर त्यतून चिडचीड व वैचारिक अगतिकता व्यक्त होते. देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात म्हणजे सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलणार्‍या आणि लिहिणार्‍या विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अर्थातच हे हल्लेखोर उजव्या विचारांचे समर्थन करणारे आहेत, यात काहीच शंका नाही. कारण गौरी लंकेश या उजवी विचारसरणी व हिंदुत्ववादी राजकारणाच्या कडव्या समीक्षक म्हणुन ओळखल्या जातात. कन्नडमध्ये प्रकाशित होणार्‍या आपल्य साप्ताहिकातून त्या उजव्या विचारसारणीवर कडाडून हल्ला करीत होत्या. गौरी लंकेश प्रस्थापित व्यवस्थेविरोधात, धर्माच्या सकुंचित राजकारणाची कठोर समीक्षा करणारे लेख लिहित असत. विशेष म्हणजे या पत्रिकेद्वारे शासन किंवा इतर कोणाकडूनही जाहिरात घेतली जात नाही. एकुण 50 जण या पत्रिकेत काम करतात. त्यांचा शेवटचा लेख, कशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून समाजात धार्मिक तणाव निर्माण केला जातो, याविषयी होता. माध्यम स्वांतत्र्यांवर येणार्‍या निर्बंधाविरोधातही त्या सातत्याने आपला आवाज उठवत असत. केंद्रातील मोदी सरकारच्या त्या कडव्या विरोधक म्हणून ओळखल्या जात होत्या. गौरी लंकेश या विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणार्‍या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्राजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे खटले सीबीआयकडे चालवण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. कर्नाटकात कॉग्रेसचे सरकार आहे व कायदा व्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असल्यामुळे गौरी यांच्या मारेकर्‍यांना लवकरच गजाअड करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रा. कलबुर्गी यांच्या देखील मारेकर्‍यांना अटक करण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे लंकेश यांचे देखील मारेकरी देखील खुले आम फिरतील अशी व्यक्त होणारी भीती काही खोटी नाही. आजवर ज्यांचे वैचारिक खून झाले त्या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे मारेकरी देखील मोकाट आहेत. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी देखील आता जामीनावर सुटले आहेत. तर कॉ. पानसरे यांचे हत्यारे देखील मोकाट आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या हत्या होणे व त्यांचे मारेकरीही मोकाट सुटणे ही शरमेची बाब आहे. वैचारिक हत्या करणे ही गेल्या काही वर्षात बदललेली मानसिकता आहे. विचारांचा विरोध हा विचारानेच झाला आहे, हे सूत्र यातून इतिहासजमा होत आहे, हे धोकादायक ठरावे.
----------------------------------------------------------------

0 Response to "कोण आहेत हत्यारे?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel