-->
धुम्रपानाचा वाढता धोका

धुम्रपानाचा वाढता धोका

शुक्रवार दि. 07 एप्रिल 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
धुम्रपानाचा वाढता धोका
धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे, ही धोक्याची सूचना सिगारेटच्या पाकिटावरच छापूनसुध्दा त्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. धुम्रपान करणं आरोग्यास कितीही हानिकारक असंल आणि त्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असले तरी धुम्रपान करणार्‍यांच्या संख्येत काही घट होत नाही हे दुर्दैवाची बाब म्हटली पाहिजे. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धुम्रपानामुळे 11 टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडतात आणि त्यातले 50% लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले होते. या चार देशांमध्ये धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडणार्‍याांची संख्या अधिक आहे. चीनमध्ये धुम्रपान करणार्‍यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे व यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहे. 2015 मध्ये आरोग्याच्या समस्येमुळे 64 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात 11% मृत्यू हे केवळ धुम्रपानामुळे झाले होते. भारतात धुम्रपान करणार्‍यांची संख्या अधिक आहे. जगातील एकूण धुम्रपान करणार्‍यांपैकी दुर्दैवाने 11 % ध्रुम्रपान करणारे लोक हे भारतात आहे. त्यातही पुरूषांची संख्या जास्त आहे. आपल्याकडे आता महिलांमध्येही ध्रुम्रपानाची क्रेझ वाढत चालली आहे. प्रामुख्याने महानगरातील महिलांमध्ये ध्रुम्रपानाचे प्रमाण जास्त आहे. धुम्रपानाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. भारतात धुम्रपानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून तंबाखूजन्य पदार्थावरही वैधानिक इशारा देणे बंधनकारक आहे. जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत असा एक देश आहे जिथे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी नियमावली आहे. तरीदेखील भारतात धुम्रपान करणार्‍यांची आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. या यादीत भारताचे स्थान दुसर्‍या क्रमांकावर असणे ही मोठ्या धोक्याची सुचना आहे. बदलती जीवनशैली, ताण तणाव यातून सुटका करण्यासाठी अनेक तरूण धुम्रपानाच्या आहारी जात आहे. जगातील दर चार व्यक्तींपैकी 1 व्यक्ती ही नियमित धुम्रपान करते. धुम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशातच भारताचे नाव या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असणे ही बाब गंभीर आहे.
---------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "धुम्रपानाचा वाढता धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel