-->
दुपदरीकरण कधी?

दुपदरीकरण कधी?

संपादकीय पान गुरुवार दि. 9 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
दुपदरीकरण कधी?
मुंबई-गोवा महामार्गाचे दुपरीकरण सध्या कुर्मगतीने का होईना सुरु झाले आहे. सध्याच्या सरकारच्या अंदाजानुसार, 2018 सालच्या अखेरपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात सध्याचा कामाचा वेग पाहता हे संपूर्ण काम 18च्या अखेरपर्ंयत होणे कठीणच दिसते. बुधवारी पहाटे या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात होऊन यात सात जणांनी आपले प्राण गमावले आहेत. हा अपघात पाहता हा महामार्ग लवकरच पुर्णत्वास जावा असे वाटते. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठ येथे बुधवारी सकाळी 7.30 वाजण्याचा सुमारास मुंबईकडून जाणारी झायलो एका झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. यातील मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण मुंबईतील पार्ले येथील आहेत. पार्ले येथे राहणारे प्रशांत गुरव यांची बहीण सावंतवाडी येथे राहत असून, तिच्याकडे जाण्यासाठी रात्री 1 वाजण्याचा सुमारास प्रशांत आपल्या सात मित्रांसोबत निघाला. सकाळी 7.30 च्या सुमारास खानू मठ येथे त्यांची भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, या गाडीचा टप पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे झाडावर आदळण्यापूर्वी गाडी उलटी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर दरवर्षी हजारो लोक अपघातामुळे आपले प्राण सोडतात. सध्याचा रस्ता हा अतिशय अरुंद तर आहेच शिवाय दुहेरी नाही. तसेच येथील वळणे ही अवघड आहेत. अनेक मोठे घाट या मार्गात आहेत. त्यात अनेकदा लवकर जाण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्यास प्रवाशांची केवळ मृत्यूशीच गाठ पडते. या अपघातांचे प्रमाण जर कमी करावयाचे असेल तर या माहामार्गाचे दुपदरीकरण करणे हाच एकमेव उपाय आहे. केंद्रीय भूपृष्ठवाहन मंत्रीपदी नितीन गडकरी आल्यापासून या माहामार्गाचे दुपरकीकरण लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. अर्थात हे काम नेमके कधी होते ते पहायचे.
---------------------------------------------------------

0 Response to "दुपदरीकरण कधी?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel