जयललितांचा वारसदार
संपादकीय पान मंगळवार दि. 7 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख
--------------------------------------------
जयललितांचा वारसदार
तामीळनाडूच्या मुक्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षावर कोणाचे असेल व मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर खरा वारसदार कोण असेल हा प्रश्न अम्मांच्या निधनानंतर पडत होता. आता मात्र या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. अपेक्षेप्रमाणे जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन यांच्याकडे पक्षाची आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली. अम्मांच्या निधनानंतर ओ.पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. तथापि, शशिकला यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरूच ठेवली होती. शशिकल यांनी पन्नीरसेल्वम यांना स्वस्थपणे काम करणे कसे शक्य होणार नाही हे पाहिले होते. त्यांची छुपी इच्छाशक्ती त्यातून स्पष्ट होत होती.
तामीळनाडूच्या राजकारणात जयललिता यांची जी छबी उमटली होती व त्यांनी जी आपल्या हाती सर्व सुत्रे ठेवून एकहाती कारभार केला होता, तशाच साच्यातला वारस अपेक्षित होता. कारण जनतेलाही असाच नेता हवा आहे. जयललितांचा कारभार हा अनिर्बंध आणि एकाधिकारशाहीने संपन्न असाच होता, भारतीय राजकारणातील अन्य नेतेदेखील सत्ता तसेच अधिकाराच्या केंद्रिकरणासाठीच झटत असतात. जयललिता बनायला का नाही आवडणार? मात्र संयम, क्षमता आणि कौशल्य जे जयललितांच्या व्यक्तित्त्वात ठासून भरलेलं होतं ते अन्य नेत्यांमध्ये अभावानेच आढळते. मग ममता बॅनर्जी असो की मायावती, करूणानिधी, लालूप्रसाद, मुलायमसिंग असोत की चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंग बादल, फारूक अब्दुल्ला ही मंडळी याच रांगेतील नेते मंडळी आहेत. आता शशिकला यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. जयललिता यांनी सत्ता राबवित असताना कल्याणकारी राजकारण आणि थेट लोकसंपर्कातून घडवलेली स्वत:ची राजकीय कार्यशैली यांचा मिलाफ घडविला होता. शशिकला यांच्या पक्षातील विरोधकांनी राजकीय तलवारी तूर्त म्यान केल्या आहेत. तसे केल्याने पक्षातील असंतोष काही काळ थंडावला आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात शशिकला यांनी पक्षावर व प्रशासनावर आपला वचक बसविल्यास त्या दुसर्या जयललिता होऊ शकतात. शशिकला यांच्या दृष्टीने विचार करता आगामी वर्षाचा काळा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
---------------------------------------------------

0 Response to "जयललितांचा वारसदार"
टिप्पणी पोस्ट करा