-->
व्याजदरांची घसरण

व्याजदरांची घसरण

संपादकीय पान मंगळवार दि. 03 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
व्याजदरांची घसरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याज दराच्या घसरणीचे संकेत दिल्यानंतर आता एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या आधारभूत दरात 0.90 टक्के कपात करण्यात आली आहे. याचे अनुकरण अन्य बँकांकडूनही केली शक्यता आहे. 2008 नंतरच्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदर कपात समजली जातेे. नवे दर 1 जानेवारीपासून लागू झाले आहेत. आता आधारभूत दर 8.65 टक्क्यांवरुन आता 7.75 टक्के झाले आहेत. एका वर्षाच्या कर्जासाठी हे दर 8.90 टक्क्यांवरुन 8 टक्के झाले आहेत. दोन वर्षांच्या कर्जासाठी हे दर 8.10 टक्के तर तीन वर्षांच्या कर्जासाठी 8.15 टक्के झाले आहेत. विविध बँकांकडून कर्जाच्या आधारभूत दरात कपातीस सुरुवात केली जाईल असे दिसतेे. आयडीबीआय आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर यांनी आधारभूत दरामध्ये 15 ते 40 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. अन्य बँकांकडूनही असे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात जे गृह कर्ज किंवा अन्य कर्ज घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे शुभ संकेत आहेत. एसबीआयचे गृह कर्ज आता महिलांसाठी 8.20 टक्क्यांनी तर, इतरांसाठी 8.25 टक्क्यांनी उपलब्ध होणार आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या आधारभूत दरात 65 बेसिस पॉइंटने कपात केली आहे. हे दर आता 8.65 टक्के असतील. आयडीबीआय आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोरने कर्ज दरात कपात केली असून हे दर आता 8.90 ते 9.30 टक्के असणार आहेत. नोटाबंदीनंतर बँकांकडे 14.9 लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट आले आहे. कर्जाचा दर घटवल्यामुळे आता गृह कर्ज, रिक्षा कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज स्वस्त होणार आहे. अर्थात यामुळेे ठेवींवरील व्याज दर कमी होणार आहेत. याचा सर्वात जास्त पटका ज्येष्ठांना बसणार आहे. मात्र मोदींनी आपल्या भाषणात जी योजना ज्येष्टांसाठी जाहीर केलेली आहे त्यामुळे कोणाचेच समाधान होणार नाही. व्याज दर वाढले की जास्त गुंतवणूक होते व त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळते हे सर्वमान्य सूत्र असले तरीही अर्थतज्ज्ञांमध्ये याबाबत मतभेद आहेत. त्यामुळे याचे होणारे परिणाम पुढील दोन वर्षात स्पष्ट दिसतील.
-------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "व्याजदरांची घसरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel