-->
स्वयंपाकघरातून धूर हद्दपार

स्वयंपाकघरातून धूर हद्दपार

संपादकीय पान सोमवार दि. 26 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वयंपाकघरातून धूर हद्दपार
गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 4.15 लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने हा धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्ररेषेखाली राहणार्‍या पाच कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक अर्ज पुणे येथून आले, पण कनेक्शन मिळण्यात लातूर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील 14 लाख गरीब कुटुंबांनी अर्ज केले. पैकी 10.86 लाख अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी 4 लाख 15 हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन पोहोचवून देण्यात आले. सर्वाधिक अर्ज पुणे (78,757), सोलापूर (76,744), नांदेड (72,859), नाशिक (71,373) आणि अहमदनगर (70,052) या जिल्ह्यातील लोकांनी केले. अर्जाच्या तुलनेत सर्वाधिक गॅस कनेक्शन लातूर (29,443), सांगली (17,787), अहमदनगर (17,466), धुळे (17,632) आणि पुणे (17466) या जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले. तसेच नागपूर येथे 31,726 लोकांनी अर्ज भरले. पण 12,218 कुटुंबाला कनेक्शन देण्यात आले तर औरंगाबाद येथे 37,188 अर्जापैकी 11,807 लोकांना कनेक्शन मिळाले. मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार आहे. घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत 81 टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण 2.38 कोटी कुटुंबांपैकी 2.09 कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात. सरकारच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत त्यांचे स्वागतच झाले पाहिजे. सरकारने पहिल्या टप्प्यात ज्यांना गरज नाही त्यांनी गॅसची सबसीडी सोडावी असे आवाहन केले होते. त्यानंतर गरीबांना गॅस कनेक्शन देण्यास सुरुवात केली होती. सरकारच्या या योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व लाखो गरीबांच्या घरातून धूर हद्दपार झाला.
---------------------------------------------------------

0 Response to "स्वयंपाकघरातून धूर हद्दपार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel