-->
रेल्वे प्रवाशांसाठी काळ रात्र

रेल्वे प्रवाशांसाठी काळ रात्र

संपादकीय पान मंगळवार दि. 22 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रेल्वे प्रवाशांसाठी काळ रात्र
उत्तर प्रदेशातील पुखराया रेल्वे स्थानकाजवळ रविवारी पहाटे पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डबे घसरून झालेल्या अपघातात भीषण प्राणहानी झाली. आत्तापर्यंत सुमारे 133 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर दीडशेहून जास्त जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटेच्या थंडीत झालेला अपघात म्हणजे या रेल्वेतील प्रवाशांसाठी काळ रात्रच ठरली. आत्तापर्यंत या अपघाताच्या बातम्या येत आहेत त्या पाहता अंगावर शहारा उभे राहातील अशी घटना घडील आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल येईल, मात्र प्राथमिकदृष्ट्या विचार करता हा अपघात हा रुळाला तडे गेल्यामुळे झाला आहे. अर्थात रुळाला तडे जाणे यात रेल्वेची बेफिकीरच जबाबदार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना बुलेट ट्रेन सुरु करण्याचे अनावश्यक स्वप्न दाखवित आहेत तर दुसरीकडे आपल्या सध्या असलेल्या रेल्वेच्या जाळ्याकडे व तेथील सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात आहे. एक लाख कोटी रुपये खर्च करुन एकच बुलेट ट्रेन उभारण्यापेक्षा सध्याचे रेल्वेचे जाळे चांगले अत्याधुनिक करुन प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे असे वाटते. गेल्या जुलै महिन्यापासून रेल्वेच्या झालेल्या पाच मोठ्या अपघातात, प्रवासी किंवा मालवाहतूक करणार्‍या रेल्वेंचे डबे एक तर रुळावरून घसरले किंवा रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळल्याने तसेच मानवी चुकांमुळे हे अपघात झाले. उत्तर प्रदेशमध्येच रखवालदार तैनात नसलेले रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने आठ मुलांचा मृत्यू झाला होता. गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान चार रेल्वे अपघातांत दोनहून अधिक प्रवासी ठार व 27 जखमी झाले होते. भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे. त्यामुळे रेल्वेने आपल्या सर्व लाईन्स सुरक्षित ठेवणे व अपघातमुक्त रेल्वे कशी राहिला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. देशात रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडणार्‍याची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आणि मग तामिळनाडू, पश्‍चिम बंगालमध्ये आहे. सध्याचे अपघात कसे होतात व त्यातून मार्ग कसे काढावयाचे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वे या दृष्टीने प्रयत्न करीतही असले मात्र त्यांच्याकडील मनुष्यबळ कमी पडत असे असे दिसते. पुखराया येथील अपघात हा केवळ रेल्वेच्या नकर्तेपणामुळे झाला आहे. कारण रेल्वेने आपल्या ट्रकची वेळेवर दुरुस्ती करणे, त्यात आधुनिकीकरण करणे, आवश्यकता पडल्यास ट्रकमध्ये बदल करणे या बाबी नित्याने करण्याची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षात रेल्वेच्या झालेल्या एकूण अपघातापैकी 50 टक्के अपघात हे गाड्या रुळावरुन घसरल्याने झाल्या आहेत. तर 29 टक्के अपघात हे ट्रॅकची निगा योग्य न राखल्यामुळे झाली आहे. रेल्वेच्या ट्रॅकची सुरक्षितता राखण्याकडे रेल्वे पुरेसे लक्ष देत नाही हेच यावरुन सिध्द होते. या असुरक्षिततेमुळे रेल्वेचे एकूण अपघातांचे प्रमाण आता 80 टक्क्यांवर गेले आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅकची योग्य निगा राखाणे हे प्राधान्यतेने झाले पाहिजे. लिंक हॉफमन बुश प्रकारचे डबे या रेल्वेत वापरले गेले नसल्यानेही या अपघातात मृतांची संख्या व भीषणता वाढली आहे. हे डबे जर स्टेनलेस स्टीलचे एलएचबी डबे असते तर हानी कमी झाली असती, कारण या डब्यांची धक्का सहन करण्याची क्षमता जास्त असते. हे डबे धक्क्यानंतरही कोसळत नाहीत. रेल्वेची कामकाज पद्धती सुधारण्यासाठी नवीन कल्पनांचा शोध घेण्याचा कार्यक्रम सुरू असताना हा अपघात झाला आहे. रेल्वे अपघातांवर स्थापन केलेल्या अनिल काकोडकर समितीने लिंक हॉफमन बुश प्रकारचे डबे वापरण्याची सूचना केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले. जर लिंक हॉफमन बुश प्रकारचे डबे असते तर मनुष्यहानी कमी झाली असते, हे वास्तव आहे. परंतु आपल्याकडे याचा विचार होत नाही. कारण मुळातच मानवतेची हानी आपल्याकडे फार गंभीरतेने विचारात घेतली जात नाही, हे मोठे दुदैव आहे. या आपघातातील आणखी एक दुदैवी बाब म्हणजे यातील केवळ 30 टक्के प्रवासांनीच रेल्वे इन्शुरन्सचा पर्याय स्वीकारला होता. रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी.च्या वेबसाईटवर ई तिकीटांचा पर्याय येतो, मात्र तो पर्याय सर्वच जण स्वीकारतात असे नव्हे. त्यामुळे या अपघातग्रस्त रेल्वेतील प्रवाशांपैकी केवळ 30 टक्के जमांनीच हा पर्याय स्वीकारला होता. अलिकडेच रेल्वेने ही 92 पैशात विमा सुवधा उपलब्ध केली असून हा विमा घेणार्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये दिले जातात. तसेच अपघातात अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयापासून ते साडे सात लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. रेल्वेची ही योजना खरे तर उत्तम असून ही प्रत्येक प्रवाशांसाठी सक्तीची केली पाहिजे. आता जगात रेल्वेच्या बाबतीत सुरक्षा व्यवस्ता अत्यंत चोख पाळली जाते. केवळ नैसर्गिक आपत्तीने होणारे अपघात नव्हे तर अतिरेकी हल्ल्यासारखे धोके लक्षात घेऊन त्याची आकमी केली जाते. विकसीत देशात रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित मानला जातो. लंडनमध्ये तुम्ही रेल्वेने प्रवास करताना जर विलंब झाला आणि त्यामुळे तुमचे विमान चुकले तर तीही नुकसानभरपाई दिली जाते. आपल्याकडे आपण याबाबत फारच मागे आहोत. ही वस्तुस्थिती मान्य करीत असताना आपण आपल्याकडेहोणारे अपघात कमी कसे होतील यासाठी विचार केला पाहिजे. पुखराया रेल्वे अपघातातून तरी आपण बोध घेऊन कमीत कमी कसे अपघात होतील ते पाहू अशी अपेक्षा करावयास हरकत नाही.
------------------------------------------------------


0 Response to "रेल्वे प्रवाशांसाठी काळ रात्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel