-->
पुन्हा निवडणुकांचे वेध

पुन्हा निवडणुकांचे वेध

रविवार दि. 25 डिसेंबर 2016 च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
पुन्हा निवडणुकांचे वेध
------------------------------------
एन्ट्रो- सहाराचे प्रकरण सर्वच पक्षांना जसे त्रासदायक ठरु शकते तसेच ते भाजपाला व मोदींनाही डोकेदुखी ठरणार आहे. सध्याच्या निवडणुकींच्या काळात अशा प्रकारे एकमेकांवर शिंतोंडे उडविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत भाजपाला एक हाती सत्ता पाहिजे आहे. त्यासाठी त्यांना अचानक मुंबईच्या विकासाचा उमाळा आला आहे. मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी सद्या सुरु असलेली भूमीपुजने, श्रीराम मंदिर या नवीन उपनगरी रेल्वे स्टेशनचे उद्दघाटन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन, यापूर्वी झालेले डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन, मात्र त्याच्या उभारणीत पुढे काहीच ऩ झालेली प्रगती, हे सर्व पाहता भाजपाने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही सर्व आघाडी उघडली आहे...
-------------------------------------------
सध्या राज्य सरकारला महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागू लागले आहेत. यात राज्यातील आठ महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यात नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेतही निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका असेल. या महानगरपालिकांवर आपला झेंडा फडकावा अशी भाजपाची इच्छा आहे व त्यात ते शिवसेनेलाही सहभागी करु इच्छित नाहीत. सत्ता ही युतीची असली तरीही आपल्या पदरात यश घेऊन महानगरपालिकेतील निवडणुकांत विजयश्री खेचून आणण्याचा डाव भाजपाचा आहे. राज्यात जसे निवडणुकीचे वातावरण आहे तसेट उत्तरप्रदेशात निवडणुका आता रंगू लागली आहे. कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना सहारा समूहाने 50 कोटी रुपयांची लाट दिल्यचा आरोप करुन एक मोठा बॉम्ब टाकला होता. मात्र सध्या कॉग्रेस पक्षाला अजूनही वाईट दिवस आहेत, त्यामुळे राहूल गांधी यांनी केलेले कोणतेही विधान गंभीरतेने घ्यायचे नाही व त्याची टिंगली उडवायची, ही भाजपाची कूट निती यावेळीही त्यांनी वापरली. मागच्या निवडणुकांत जो भाजपाचा मतदार होतात त्यातील अनेक मतदार सध्या त्यांच्यापासून दुरावला असला तरीही अजून कॉग्रेसवर तो नाराज आहे. त्यामुळे आजही भाजपाचे नेते खोटे बोलले तरी ते त्यांना खरे वाटत आहे. अर्थात भाजपाचा हा खोटारडेपणा उघड होण्यासाठी अजूनही काही काळ जाण्याची आवश्यकता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला असतानाच राहुल गांधींनीही मोदींवर पलटवार केला आहे. माझी हवी तेवढी खिल्ली उडवा, पण आधी देशातील तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या असे आव्हान राहुल गांधींनी दिले आहे. बँकेच्या रांगेत चोर नव्हे तर देशातील प्रामाणिक जनता उभी आहे असे त्यांनी म्हटले. उत्तरप्रदेशमध्ये राहुल गांधी यांनी जनआक्रोश सभा घेतली व या सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला आहे. बँकेसमोर रांगेत उभे असलेल्या सर्वसामान्यांकडे काळा पैसा नाही. काळा पैसा तर जे तुमच्यासोबत विमानातून प्रवास करतात त्यांच्याकडे आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले. तुम्ही काळा पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला नाही, तुम्ही देशातील सर्वसामान्य जनतेवर हल्ला केला असा आरोप त्यांनी केला. शेतकरी जेव्हा कृषी सामानाची खरेदी करतो त्याचे पैसे तो चेकने देतो की रोख स्वरुपात देतो असा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्‍न योग्यच आहे. राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप पूर्वग्रह दुषित आहेत असे आपण गृहीत धरले तरी भाजपाने त्याबाबत योग्य तो खुलासा करुन राहूल यांना खोटे पाडले पाहिजे तसे न करता त्यांनी राहूल गांधीचे वाभाडे काढण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे मूळ मुद्दा डावलण्याचा प्रकार आहे. अर्थात सहारा डायरीत ज्यांना त्यांनी पैसे दिले त्यांचा उल्लेख आहे. अर्थातच यात सर्वपक्षीय लोक आहेत व त्यात भाजपाही आहे. त्यामुळे भाजपा आपण त्यातले नाही, धुतल्या तांंदळासारखे आहोत हा दावा खोटा ठरतो. या डायरीच्या 11 पानांमध्ये कोणाला किती पैसे देण्यात आले, याचा तपशील आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त राजकारण्यांचा समावेश आहे. भाजप, काँग्रेस, जदयु, राजद, सपा, एनसीपी, जेएमएम, जेव्हीएम, टिएमसी, बीजेडी, बीकेयू, शिवसेना आणि एलजेपीसह 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावे या डायरीत असल्याची माहिती समोर येते आहे. या डायरीत राजकीय नेत्यांची नावे असलेली दोन प्रिंटेड पानांची यादी आहे. यामध्ये 54 नावांची नोंद आहे. तर दोन पानांवरील मजूकर हस्ताक्षर स्वरुपात आहे. याशिवाय आणखी दोन प्रिंटेड पानांवर निवडणूक लढणार्‍या 62 जणांची यादी आहे. हाताने लिहिण्यात आलेल्या पानांवर 2010 मध्ये करण्यात आलेल्या व्यवहारांचा तपशील आहे. 2010 मध्ये कोणाला किती रुपये देण्यात आले, याची माहिती आहे. या डायरीतील पाच पानांमध्ये 2013 आणि 2014 साली मिळालेल्या पैशांची संपूर्ण माहिती आहे. अगदी तपशीलवार ही सर्व माहिती या डायरीतील पानांवर नमूद करण्यात आली आहे. 2013-14 च्या 10 महिन्यांच्या कालावधीत 100 कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याची नोंद आहे. मात्र विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांनी यामधील काही माहिती खोटी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. इतर कंपन्यांच्या अधिकार्‍यांना अडचणीत आणण्यासाठी ही माहिती डायरीमध्ये नोंद करुन ठेवण्यात आल्याची माहिती सहाराच्या एका अधिकार्‍याने विशेष तपास पथकाच्या अधिकार्‍यांना दिली आहे. 2013 आणि 2014 मध्ये आयकर विभागाने बिर्ला आणि सहारा समूहाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यामध्ये आयकर विभागाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. या प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तपासाची मागणी केली होती. 25 ऑक्टोबर 2016 रोजी प्रशांत भूषण यांनी सर्व तपास यंत्रणांना आणि काळ्या पैशांचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाच्या प्रमुखांना दिली होती. सहाराचे प्रकरण सर्वच पक्षांना जसे त्रासदायक ठरु शकते तसेच ते भाजपाला व मोदींनाही डोकेदुखी ठरणार आहे. सध्याच्या निवडणुकींच्या काळात अशा प्रकारे एकमेकांवर शिंतोंडे उडविण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत भाजपाला एक हाती सत्ता पाहिजे आहे. त्यासाठी त्यांना अचानक मुंबईच्या विकासाचा उमाळा आला आहे. मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी सद्या सुरु असलेली भूमीपुजने, श्रीराम मंदिर या नवीन उपनगरी रेल्वे स्टेशनचे उद्दघाटन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन, यापूर्वी झालेले डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन, मात्र त्याच्या उभारणीत पुढे काहीच ऩ झालेली प्रगती, हे सर्व पाहता भाजपाने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही सर्व आघाडी उघडली आहे.
-----------------------------------------------------------
 

0 Response to "पुन्हा निवडणुकांचे वेध"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel