-->
अर्थव्यवस्थेची गाडी घसरणार

अर्थव्यवस्थेची गाडी घसरणार

संपादकीय पान शनिवार दि. 24 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अर्थव्यवस्थेची गाडी घसरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस आणखीनच घसरत चालली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील घाला पूर्वअनुमानित अंदाजांपेक्षा तीव्र स्वरूपाचा असेल, असे दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांचे कयास नुकतेच पुढे आले. मुख्यत: ग्रामीण भागातील मंदावलेल्या मागणीच्या परिणामी जपानच्या नोमुराच्या अर्थवृद्धी निर्देशांकाने 1996 सालच्या पातळीइतका नीचांक गाठल्याचे म्हटले आहे, तर गोल्डमॅन सॅसने आर्थिक मंदीच्या दिशेने प्रवास स्पष्ट करणारे निर्देश गहिरे बनत असल्याचे स्पष्ट केले आहे. नोव्हेंबरमधील उपलब्ध आकडेवारीतून आर्थिक मंदीचे आंशिक स्वरूपात संकेत दिले आहेत. डिसेंबरची आकडेवारी पुढे आल्यावर निश्‍चलनीकरणाचे अर्थव्यवस्थेवर साधलेल्या परिणामांची परिपूर्ण कल्पना येईल, असे नोमुराने आपल्या अहवालात नमूद केले आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन सहा टक्क्यांच्याही खालची पातळी गाठेल, असा अंदाज आहे. नोमुराने यापूर्वी 6.9 टक्के या दराने तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ असेल, असे अंदाजले होते. प्रत्यक्षात वाढीचा दर यापेक्षा खूप खाली असेल, असे नोमुराचा अहवाल सांगतो. गोल्डमन सॅसचया अंदाजानुसार, अलीकडच्या वर्षांत जागतिक स्तरावर वेगाने वाढ साधणारी भारतीय अर्थव्यवस्थेवर नोटबंदीमुळे काळोखी साधली आहे. अर्थव्यवस्थेचा सध्याचा वेग कमालीचा मंदावला असून, नजीकच्या भविष्यात तो आणखी खालावत जाण्याचेच संकेत आहेत. सरकारकडून नव्या चलनी नोटांची उपलब्धता किती तत्परतेने केली जाईल आणि रोकडचणचण संपुष्टात येईल, यावर अर्थव्यवस्था पुन्हा ताळ्यावर येणे अवलंबून आहे. नोमुराच्या मते चलनाची अडचण फेब्रुवारी अखेपर्यंत सुरू राहील आणि वृद्धीपथ पुन्हा रूळावर येण्याला जून 2017 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात फेब्रुवारीमधील पतधोरणांत रिझर्व्ह बँकेकडून किमान 0.25 टक्क्यांची व्याजदर कपात केली जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मोदींच्या या नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरणच होत आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "अर्थव्यवस्थेची गाडी घसरणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel