-->
अमेरिकेचे वाढते आकर्षण

अमेरिकेचे वाढते आकर्षण

संपादकीय पान गुरुवार दि. 15 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमेरिकेचे वाढते आकर्षण
भारतीय पर्यटक नेमका जगात कोठे जातो, याचा जर अभ्यास केला तर त्याला सर्वात जास्त आकर्षण हे अमेरिकेचे आहे. आशियाई देशातील पर्यटनाला जाणार्‍यात भारतीयांची मोठी संख्या असते. मलेशिया, सिंगापूर, थायलंड हा देशांच्या सफरी आता मध्यमवर्गीयांच्याही दृष्टीने सहज झाल्या आहेत. आता मात्र जगात मंदी असतानाही अमेरिकेला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामध्ये भारतीय पर्यटकांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत 42 टक्क्यांनी वाढल्याचे अमेरिकेच्या व्यापार विभागाने प्रसिध्द केलेल्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कोलंबियातील पर्यटकांची संख्या 54 टक्क्यांनी, तर भारतातील पर्यटकांची संख्या 42 टक्क्यांनी वाढल्याचे यात म्हटले आहे. अमेरिका हे प्रमुख पर्यटन केंद्र असून, 2020 पर्यंत येथील पर्यटकांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होईल, असा विश्‍वास अमेरिकेच्या व्यापार सचिवांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत येणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या यादीत भारताचे स्थान पहिल्या 10मध्ये असावे, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने वर्षाला दहा लाख भारतीय पर्यटक आकर्षित करण्याचे लक्ष्य अमेरिकेने ठेवले आहे. अमेरिकेचे मुंबईतील कौन्सिल जनरल पीटर हास यांच्या संगण्यानुसार, सध्या एका वर्षात सुमारे 6 लाख 60 हजार भारतीय पर्यटक अमेरिकेत येतात. हे प्रमाण वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीने काही पावलेही उचलली आहेत. एकदा अमेरिकेला जाऊन आलेल्या पर्यटकांना पुढच्या वेळी अमेरिकेत जाण्यासाठी मुलाखत देण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा व्हिसाची मुदत संपल्यानंतर 48 महिन्यांच्या आत पुन्हा व्हिसासाठी अर्ज करणार्‍यांनाही उपलब्ध असेल. एकीकडे नवर्निवाचीत अध्यक्ष ट्रम विदेशी लोकांना अमेरिकेतून हकलावून देण्याचे आखाडे बांधत असताना दुसरीकडे अमेरिका पर्यटक येण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "अमेरिकेचे वाढते आकर्षण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel