काही अपेक्षित, काही धक्कादायक!
संपादकीय पान मंगळवार दि. 29 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
काही अपेक्षित, काही धक्कादायक!
नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत अशा सुमारे 25 जिल्ह्यातील 164 ठिकाणी झालेल्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागत असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग या जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेतील शेतकरी कामगार पक्षाची चार दशकाहून जास्त काळ असलेली सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. अर्थातच हा निकाल अपेक्षितच होता. अलिबागच्या नगराध्यक्षपदाचे शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक यांना तब्बल आठ हजारहून जास्त मते पडली व त्यांच्या विरोधकाला केवळ दोन हजारच मते पडावीत यावरुन प्रशांत नाईक यांची लोकप्रियता लक्षात येते. अर्थात शेकापने अलिबागमध्ये केलेली विकास कामे लक्षात घेता येथे त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यामुळे आजचा अलिबागचा निकाल हा केवळ एक उपचारच होता. शेकापने अशा प्रकारे सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागा जिंकणे हा एक नवा विक्रमच ठरणार आहे. यातील प्रत्येक उमेदवाराचा विजय हा लक्षणीय आहे. विरोधकांना पडलेली मतांची आकडेवारी पाहता त्यांचे जनतेच्या मनात असलेले आदराचे स्थान आपल्याला ठळकपणे जाणवते. गेल्या काही वर्षात विरोधात राहूनही शेकापने अलिबागच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला व या शहराचा चेहरामोहरा बदलला. त्याचीच पावती अलिबागकरांनी शेकापला भरघोस मते देऊन दिली आहे. गेल्यावेळी विरोधी पक्षाचा एक तरी सदस्य अलिबागच्या नगरपरिषदेत होता. आता तर जनतेने सर्वच शेकापच्या उमेदवारांना विजयी करुन एकहाती सत्ता बहाल केली आहे. अर्थातच लोकांचा हा विश्वास दृढ होईल व अलिबाग नगरीचे रुप पालटले जाईल यात काही शंका नाही. संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले होते ते, रोह्यातील निकालाकडे. कारण इथे लढत होती, काका-पुतण्याची. रोहा नगरपालिकेवर प्रदीर्घ काळ वर्चस्व असणार्या व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या घरातूनच त्यांना आव्हान निर्माण झाले होते. त्यांच्या पुतण्याने बंडखोरी करुन शिवसेनेत प्रवेश केल्याने या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यात काका सुनिल तटकरे यांचा अखेर विजय झाला व राष्ट्रवादीचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष पोटफोडे हे विजयी झाले. अर्थात संदीप तटकरे हे तिसर्या नंबरवर फेकले गेले असले तरी पोटफोडे यांचा विजय केवळ सात मतांनी झाला. त्यामुळे रोह्यात राष्ट्रवादीचा विजय झाला असला तरीही तो निसटता झाला याची सल सुनिल तटकरेंच्या मनात राहाणारच. मात्र श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी-शेकाप आगाडीने आपली सत्ता राखण्यात यश मिळविले. माथेरानमध्ये मात्र सत्ताबदल झाला व शिवसेनेने तेथे राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेतली. खोपोलीमध्ये राष्ट्रवादी-शेकापने आपली सत्ता कायम राखली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या रत्नागिरीनगरपालिकेत शिवसेनेने भाजपला धोबी पछाड देत सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राहुल पंडीत हे विराजमान झाले आहेत, तर पालिकेची सत्ताही शिवसेनेच्या हाती आली आहे. त्याचप्रमाणे लक्षवेधी ठरलेल्या चिपळूणच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सुरेखा खेराडे यांना जनतेने कौल दिला असून पालिकेत शिवसेनेला सत्ता मिळविण्यासाठी अजून तिघांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीतील रमेश कदम व भास्कर जाधव यांच्या भांडणाचा अखेर पक्षाला फटका सहन करावा लागला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार संजय कदम यांच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या खेड नगरपालिकेतील लढतीत अखेर मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे मात्र नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे वैभव खेडेकर यांची वर्णी लागली आहे. तर राजापूरमध्ये शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना जबर धक्का बसला असून याठिकाणी काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळवला असला तरी सत्तेसाठी काँग्रेसला आणखी दोन सदस्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दापोलीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना धक्का देत शिवसेनेने बाजी मारली असली तरी नगरपंचायतीत मात्र त्रिशंकू अवस्था राहणार आहे. राजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असून आमदार राजन साळवी यांनी आपली सर्व ताकद याठिकाणी पणाला लावली होती. मात्र शिवसेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसलाही आठ जागा मिळाल्या आहेत. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले असून नगराध्यक्षपदी काँग्रेसचे हनिफ काझी विजयी झाले आहेत. तळकोकणातील एकूण सर्वच निकाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिलासा देणार आहेत. देवगडमध्ये काँग्रेसने भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. देवगड हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र सर्वच्या सर्व 17 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. देवगड नगरपालिका कणकवली विधानसभा मतदारसंघात येते. येथे नितेश राणे आमदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयात मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपालिकेसाठी तर देवगड नगरपंचायतीसाठी यंदा प्रथमच निवडणूक झाली. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, काँग्रेस नेते नारायण राणे आणि भाजपा आमदार प्रमोद जठार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मागील काही निवडणुकांमध्ये राणे कुटुंबियांना बॅकफूटवर जावे लागले होते. मात्र देवगडच्या विजयानंतर लगेचच सावंतवाडीचा निकाल जाहीर झाला आणि राणेंचे कमबॅक काँग्रेसला सुखावणारे ठरले. या विजयानंतर नारायण राणे यांनी पक्षातील राज्यातील नेत्यांवर तोंडसुख घेतले आहे. राणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात सर्व विरोधक एकवटे गेले असताना त्यांना पक्षाकडून म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नव्हता, त्यामुळे राणेंनी ही खंत व्यक्त करणे स्वाभाविकच आहे.
--------------------------------------------------------

0 Response to "काही अपेक्षित, काही धक्कादायक!"
टिप्पणी पोस्ट करा