-->
शेड्युल्ड बँकांच्या अडचणी वाढल्या

शेड्युल्ड बँकांच्या अडचणी वाढल्या

संपादकीय पान शुक्रवार दि. 02 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शेड्युल्ड बँकांच्या अडचणी वाढल्या
रिझर्व्ह बँकेने देशातील शेड्युल्ड बँकांना वाढलेल्या ठेवींवर 100 टक्के रोख तरलता निधी (सी.आर.आर.) राखण्याचा आदेश जारी केल्यामुळे 89 शेड्युल्ड बँकांना 625 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेने हा आदेश शनिवारी सुट्टीच्या दिवशी काढला. बँकांमध्ये 16 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर या दरम्यान ज्या ठेवी जमा झाल्या, त्यावर 100 टक्के रोख तरलता निधी ठेवण्याचा हा आदेश आहे. देशातील 26 राष्ट्रीयीकृत बँका, 18 शेड्युल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका व 45 खासगी बँका अशा 89 बँकांना लागू राहणार आहे. या बँकांना 26 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या दोन आठवड्यांसाठी 100 टक्के सीआरआर ठेवायचा आहे व 9 डिसेंबरला आदेशाचा पुनर्विचार केला जाणार आहे. नोटाबंदीचा निर्णय  फुटला होता व काही नागरिकांनी सप्टेंबर महिन्यातच आपला काळा पैसा बँकेत भरून पांढरा करून घेतला होता, अशी चर्चा जोरात आहे. म्हणून 16 सप्टेंबर ते 11 नोव्हेंबर म्हणजे नोटाबंदी लागू झाल्याचा पहिला दिवस असा कालखंड रिझर्व्ह बँकेने निवडला आहे. 16 सप्टेंबरला या बँकांच्या ठेवी 93.38 लाख कोटी होत्या. त्यात 15 दिवसांत तब्बल 3.55 लाख कोटींची वाढ होऊन, 30 सप्टेंबर रोजी ठेवी 100.93 लाख कोटींवर गेल्या होत्या. 11 नोव्हेंबरला ठेवी 101.14 लाख कोटी झाल्या होत्या. या आकडेवारीमुळे संशयाचे धुके वाढले आहे. देशातील 89 बँकांना वाढलेल्या ठेवी म्हणजे, 3.75 लाख कोटी रुपये सी.आर.आर. म्हणून रिझर्व्ह बँकेकडे रोख ठेवाव्या लागणार आहेत. सी.आर.आर.वर रिझर्व्ह बँक कुठलेही व्याज देत नाही, परंतु बँका मात्र, ग्राहकांना सेव्हिंग खात्यावरसुद्धा चार टक्के व्याज देतात. त्यामुळे बँकांना हे व्याज ग्राहकांना स्वत:च्या खिशातून द्यावे लागेल. वाढलेल्या ठेवी म्हणजे 3.75 लाख कोटींवर चार टक्क्यांप्रमाणे दरवर्षी 15.000 कोटी व्याज होते म्हणजे दरमहा 1250 कोटी रुपये, म्हणजेच 15 दिवसांचे 625 कोटी रुपये व्याज होते. रिझर्व्ह बँकेने 9 डिसेंबरला हा आदेश मागे घेतला, तरी बँकांना 625 कोटींचा फटका बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेने 9 डिसेंबरला निर्णय कायम ठेवला, तर बँकांजवळ कर्जवाटप करण्यासाठी अतिरिक्त तरलता राहणार नाही व परिणामी व्याजदर कमी होणार नाहीत, अशी भीती आहेच.
--------------------------------------------------

Related Posts

0 Response to "शेड्युल्ड बँकांच्या अडचणी वाढल्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel