-->
वेलकम 2017

वेलकम 2017

रविवार दि. 01 जानेवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
वेलकम 2017
----------------------------------------
एन्ट्रो- देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेशात विधानसभेच्या तसेच पंजाब, गोवा या लहान राज्यात निवडणुका होत आहेत. तामीळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी शशिकला भरुन काढणार का, असा प्रश्‍न आहे. सध्या अण्णाद्रमुक गोंधळलेल्या स्थितीत आहे, यातून हा पक्ष कसा बाहेर पडणार?, पक्षात उभी फूट पडणार का? याची उत्तरे लगेचच मिळणार नाहीत. परंतु तामीळनाडूत जयललितांच्या मृत्यूच्या धक्यानंतर एक मोठा राजकीय उत्पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामा राव हे एक राज्यातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहे. सध्या त्यांच्याकडे सहा मंत्रालयांचा कारभार आहे व नजिकच्या काळात जनता त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहाते. गुजरातमधील पाटीदार चळवळाचे नेते हार्दीक पटेल व अ.बी.सी.चे नेते अल्पेश ठाकूर हे पुढील वर्षी गुजरातमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. मुस्लिमांचे नेते म्हणून गेल्या वर्षात पुढे आलेले अवेसी यांच्या भोवती मुस्लिम समाज एकवटू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीत हे चित्र आणखी स्पष्ट होईल. उत्तरप्रदेशात काका शिवपाल यादव व पुतण्या अखिलेश यादव यांच्यातील यादवी उत्तरप्रदेशातील राजकारण कोणत्या टोकाला नेते ते लवकरच दिसणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आपल्या देशात अर्थकारण व राजकारण हे जोमात असेल...
---------------------------------------------------
यंदा 2016 साल कधी संपले आणि आज नवीन वर्ष कधी सुरु झाले हे समजलेच नाही. जागात एकूणच घडामोडी वेगात झाल्या. काही घडामोडी अनपेक्षितच होत्या. अगदी आपल्याकडील नोटाबंदीचा विचार केला तर गेले दोन महिने जनता केवळ रांगेमध्येच होती. आपण रांगा लावतो आहोत याचा अर्थ आपण देशप्रेम व्यक्त करीत आहोत असेच या जनतेला वाटत आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे लोकसंख्या जास्त होती आणि प्रत्येक बाबींचे उत्पादन कमी होते. त्यामुळे अन्नधान्यापासून ते स्कूटर खरेदीपर्यंत वेटिंग लिस्ट असायची. अगदी दुधाचेही रेशनिंग होते, हे आत्ताच्या पिढीला सांगून पटायचे नाही. आता प्रत्येकाच्या हाती आपल्याला मोबाईल दिसतो. परंतु तीन दशकांपूर्वी घरातील साधा फोन मिळायला देखील दहा वर्षांची प्रतिक्षा यादी होती. नवीन तंत्रज्ञान, वाढलेले उत्पादन यामुळे सर्वांचे जीवन अत्यंत सुकर झाले आहे. मात्र नोटाबंदीमुळे नवीन पिढीला तुटवडा काय असतो व त्याचे परिणाम काय असतात हे पहिल्यांदाच पहायला मिळाले. जागतिक पातळीवरील विचार करता, गेल्या वर्षीचा आढावा घेताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली डोनाल्ड ट्रम्प यांची निवड म्हणजेच त्यांच्या विचारांची झालेली झालेली सरशी हा सर्वात मोठा धोका ठरणार आहे. कारण अमेरिकन भांडवलशाही ही अतिशय मुक्त आहे. अमेरिकेने आजवर जगातील प्रत्येकाला समावून घेतले आहे. मात्र हेच बाहेरचे लोक आपल्या मुळावर येतात व त्यामुळे आम्ही बेकार होतो. त्यामुळे त्यांना हाकलून दिले पाहिजे असा प्रथमच विचार ट्रम्प यांनी मांडला आणि त्यांच्या विचारांचे स्वागत झाले. खरे तर अमेरिकन लोकांच्या मनात जी गेल्या काही वर्षात खदखद होती तिला ट्रम्प यांनी मोकळी वाट करुन दिले असे म्हणणे योग्य ठरेल. अर्थात प्रत्यक्षात ट्रम्प आता अमेरिकेत नेमके काय करतात हे पहाणे गरजेचे आहे. मात्र अशा प्रकारे दुसर्‍या टोकाचा विचार मांडणार्‍यांचा विजय आता जागतिक पातळीवर होऊ लागला आहे. आपल्याकडेही मोदी यांचा झालेला विजयही त्याच अंगाने पहावा लागेल. आजवर उघडपणे हिंदुत्वाची भूमिका मांडणार्‍यांना बहुमताच्या आधारे सत्तास्थानी कधीच पोहोचता आले नव्हते. अटलबिहारी वाजपेयी यांनी हिंदुत्वाचा विचार मांडत सत्ता काबीज केली असली तरीही त्यांचा चेहरा, स्वभाव मवाळ व सर्वसमावेशक  होता. तसेच त्यांना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापावे लागले होते. आता मात्र विकासाच्या नावाखाली हिंदुत्वाचे बहुमताचे सरकार सत्तेवर आणण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. भारतीय राजकारणात विचाराने उजवे असलेले सरकार केंद्रात सत्तेत येण्याची ही पहिलीच वेळ. भारतातही झालेला हा बदल जागतिक राजकारणाशी मिळता जुळताच आहे. जगातून लिबरल डेमोक्रॅटसचा विचारांचा पराभव होताना दिसत आहे. दुसरे महायुध्द सुरु होण्याअगोदर जसा अतिरेकी विचार मांडणारी सरकार जन्माला युरोपात आली व त्यांनी जगाला युद्दाच्या खाईत लोटले. आज जग अशाच अतिरेकी विचारांना थारा देत आहे. ट्रम्प यांचा जसा अमेरिकेत विजय झाला तसाच ग्रेट ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटच्या बाजूने अनपेक्षित निकाल लागला. ब्रिटनमध्येसुध्दा आता बाहेरुन आलेल्या लोकांचा भार नकोसा होऊ लागला आहे. आपल्याकडे शिवसेना, मनसे यांनी जसे दक्षिण भारतीय व भैयांच्या विरोधात आंदोलने उभारली तशीच चळवळ आता ब्रिटनमध्ये आकार घेत आहे. स्वीडन, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, ऑस्ट्रीया, सोल्व्हाकिया, ग्रीस या देशात अतिरेकी उजव्या विचारांना कधी नव्हे तेवढा थारा मिळू लागला आहे. गेल्या दोन दशकात आशियाई लोकांनी आपली बुध्दीमत्ता, कतृर्त्व सिध्द करुन या देशात आपले पार रोवले. चीन व भारत या दोन आशियाई देशांनी आपण विकसीत देशांच्या तुलनेत काही कमी नाही, हे जगाला दाखवून दिले आहे. तसेच कमी मजुरीत आपली चांगली उत्पादन क्षमता दाखविली आहे. त्यातून हे देश भविष्यात झपाट्याने वाढणार आहेत. भारतात सध्या संघटीत क्षेत्रात 22 टक्के स्त्रिया काम करतात, मात्र ही संख्या वेगात वाढत आहे. मात्र आपल्याकडे असलेला भ्रष्टाचार, जम्मू-काश्मिरमधील अतिरेकी कारवाया, देशभक्तीच्या खुळ्या कल्पना पुढे येत आहेत. यातून आपले नुकसानच होईल. 2017 साली आपल्याकडे नेमके काय येऊ घातले आहे? राजकीय विचार करता महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेशात विधानसभेच्या तसेच पंजाब, गोवा या लहान राज्यात निवडणुका होत आहेत. तामीळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी शशिकला भरुन काढणार का, असा प्रश्‍न आहे. सध्या अण्णाद्रमुक गोंधळलेल्या स्थितीत आहे, यातून हा पक्ष कसा बाहेर पडणार?, पक्षात उभी फूट पडणार का? याची उत्तरे लगेचच मिळणार नाहीत. परंतु तामीळनाडूत जयललितांच्या मृत्यूच्या धक्यानंतर एक मोठा राजकीय उत्पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पुत्र के.टी. रामा राव हे एक राज्यातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत आहे. सध्या त्यांच्याकडे सहा मंत्रालयांचा कारभार आहे व नजिकच्या काळात जनता त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहाते. गुजरातमधील पाटीदार चळवळाचे नेते हार्दीक पटेल व अ.बी.सी.चे नेते अल्पेश ठाकूर हे पुढील वर्षी गुजरातमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. मुस्लिमांचे नेते म्हणून गेल्या वर्षात पुढे आलेले अवेसी यांच्या भोवती मुस्लिम समाज एकवटू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीत हे चित्र आणखी स्पष्ट होईल. उत्तरप्रदेशात काका शिवपाल यादव व पुतण्या अखिलेश यादव यांच्यातील यादवी उत्तरप्रदेशातील राजकारण कोणत्या टोकाला नेते ते लवकरच दिसणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आपल्या देशात अर्थकारण व राजकारण हे जोमात असेल. यंदा जी.एस.टी. लागू होत असल्यामुळे देशात समान कर प्रणाली लागू होईल. तसेच यंदाच्या वर्षापासून रेल्वेचा अर्थसंकल्प संपुष्टात आणला गेला आहे. केवळ अर्थसंकल्प सादर होईल. नोटबंदीमुळे सरकारने नेमके काय साध्य केले हे नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच स्पष्ट दिसेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी यात लागणार आहे. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार, खोट्या नोटा व काळापैसा संपुष्टात येईल हे सरकारचे म्हणणे खरे होत आहे का ते समजेलच. यातूनच केंद्रातील सरकारची खरी कसोटी लागेल. 2017 साल तरी सर्वांना सुखाचे, समृध्दीचे व शांततेचे जावो हीच इच्छा.
-----------------------------------------------------------------------------

1 Response to "वेलकम 2017"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel