-->
स्वागतार्ह, पण...

स्वागतार्ह, पण...

गुरुवार 10 नोव्हेंबरच्या अंकासाठी अग्रलेख
------------------------------------------------------------------
स्वागतार्ह, पण...
---------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून भाषण करताना मंगळवारी रात्री चलनातील 500 व 1000 रुपयांचा नोटा रद्द केल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. देशातील अनेकांसाठी हा राजकीय भूकंपच होता. कारण ज्यांनी बेकायदशीररित्या काळा पैसा हजार रुपयांच्या चलनात दडवून ठेवला होता त्यांना एक मोठा धसकाच होता. कारण या दोन प्रकारातील नोटांची किंमत आता कागदासमान झाली होती. पंतप्रधानांच्या या धाडसी पावलाचे स्वागतच झाले पाहिजे. अर्थात हे स्वागत करीत असताना यामुळे देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येईल व काळा पैशाला अटकाव होईल हा दावा फसवा व जनतेची दिशाभूल करणारा आहे, हे देखील तेवढेच खरे. ज्या नागरिकांकडे 500 व 1000 रुपयांच्या चलनातील नोटा आहेत त्या त्यांना बँकेतून येत्या 50 दिवसात बदलून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना आपल्याकडील पैसे सर्वात प्रथम बँकेत जमा करावे लागतील व त्यानंतर आठवड्याला केवळ 20 हजार रुपये एवढेच पैसे काढावे लागतील. आता सरकारने दोन हजार रुपयांची नवी नोट बाजारात आणली आहे. सध्याच्या नोटा बँकांमध्ये टाकून त्यासंबंधी पैसे कोठून आले त्याचा पुरावा दिल्यास किंवा ती र क्कम किरकोळ स्वरुपाची असल्यास सहजरित्या त्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्याकडील नोटा बदलून कशा मिळणार अशी त्यांना चिंता आहे. लोकांनी हा निर्णय जाहीर होताच आपल्याकडील हजारांच्या
नोटा संपविण्यासाठी पेट ्रोल पंपाकडे धाव घेतली तर काहींनी ए.टी.एम.मध्ये जाऊन आपल्या खात्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात अशा प्रकारची घबराट निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्याच्याकडील पैसा कष्टाने कमविलेला आहे त्याला नोटा बदलताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. प्रश्‍न फे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांचाच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरुन गेल्यास हा प्रश्‍न आणखी गंभीर होईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न यातून निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, क्रेडिट व डेबिट कार्डवरील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत. त्यामुळे शहरात व निमशहरी भागातही कार्डाव्दारे व्यवहार करण्यास फारशी अडचण येणार नाही. 1977 साली पंतप्रधानपदी मोरारजी देसाई असताना त्यांनी एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी जे काही काळे धन होते ते या निर्णयानंतर बर्‍यापैकी बाहेर आले. मात्र त्यानंतर पुन्हा काळा पैसा जोर धरु लागलाच. काळ्या पैशाची निर्मिती व्हायला पुन्हा चार-पाच वर्षे लागतील व अर्थातच पुन्हा तीच स्थिती येणार आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केलेली ही थातूरमातूर उपाययोजना आहे, हे काळाने सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे देशातील काळा पैसा संपेल ही भाजपाची अध्यक्षांनी केलेली घोषणा पोकळ आहे. काळ्या पैशाच्या बाबतीत एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे काळा पैसा हा केवळ घरात थप्या लावून फार कमी प्रमाणात ठेवला जातो. अनेक जण जमीन-जुमला, सोने या स्वरुपात आपल्याकडे ठेवून देतात. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे ते राजकारणी, नोकरशाह, उद्योगपती हे आपल्याकडील काळा पैसा हा विदेशात किंवा स्वीस बँकेत ठेवतात. त्यामुळे सर्वच पैसा केवळ रोखीत घरी ठेवला जातो ही चुकीची समजूत आहे. त्यामुळे या कृतीमुळे आता सर्वच काळा पैसा बाहेर आला असे समजण्याची गरज नाही. आपल्याकडे काळा पैसा विदेशात जाऊन मॉरिसस मार्गे थेट विदेशी गुंतवणूक म्हणून पुन्हा देशात गुंतविला जातो. या पैशाला कोणतेही भय नाही किंवा हा पैसा सरकारच्या मंगळवारच्या निर्णयामुळे बाहेर येणार नाही. त्याचबरोबर आजवर स्वीस बँकेत गुंतविण्यात आलेल्या काळ्या पैशाचे काय? हा पैसा या निर्णयामुळे कुठेही हलणार नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येणार या म्हणण्यात काहीच तथ्य नाही. त्याचबरोबर यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल यातही काही तथ्य नाही. पूर्वी 500 व 1000 रुपयाच्या जुन्या नोटा घेतल्या जात होत्या, त्याऐवजी आता नवीन नोटा भ्रष्टाचाराच्या मार्गात येतील हे देखील वास्तव नाकारता येणार नाही. जागतिक पातळीवर अनेक देशात एक मतप्रवाह आहे की, चलनात श3यतो मोठ्या नोटा ठेवल्या जाऊ नयेत. अगदी युरोप, अमेरिकेतही 100 युरो किंवा डॉलरच्या वरच्या नोटा नाहीत. अर्थात तेथे अनेक व्यवहार हे कार्डाने होतात. आपल्याकडे त्यातुलनेत कार्डाने व्यवहार होण्याचे प्रमाण कमी आहे. आपल्याकडील 70 ट क्के जनतेचा विचार केल्यास त्यांना शंभर रुपयांच्या नोटा असल्या तरी फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आपल्याकडे 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा या फे पैसेवाल्यांच्या सोयीसाठीच आहेत, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आता तर सरकारने नव्या नोटा आणताना दोन हजाराची नोट आणण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकार यासंबंधी फे पैसेवाल्यांचाच विचार करते आहे. सर्वसामान्यांचा
 नाही. आता सध्या आपल्याकडे रद्द झालेल्या सुमारे आठ लाख कोटी नोटा बदलल्या जाणार आहेत. त्यासाठी आपल्या तिजोरीवर मोठा भार पडणार हे न क्की. तिजोरीवर भार पडूनही यातून आपणे नेमके काय कमविणार आहोत, याचा देखील अभ्यास झाला पाहिजे. कदाचित त्यामुळे यापूर्वीच्या अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे अशा नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव असूनही त्यांनी हा निर्णय घेतला नाही. असो, या
निर्णयाच्या नकारात्मक बाजू आपण काही काळ मागे ठेवू व सध्यातरी पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत करु.

--------------------------------------------------------------------------

0 Response to "स्वागतार्ह, पण..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel