-->
उद्योगपती सुटले, शेतकरी कर्जाच्या सापळ्यात

उद्योगपती सुटले, शेतकरी कर्जाच्या सापळ्यात

संपादकीय पान शुक्रवार दि. 18 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उद्योगपती सुटले, शेतकरी कर्जाच्या सापळ्यात
सध्या सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. कष्टाने कमविलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी सध्या लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातून देशात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. मात्र अशा प्रकारे देशातील जनतेची एकप्रकारे छळणूक सुरु असताना केंद्र सरकारने 63 बड्या उद्योगपतींची सुमारे 50 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बड्या उद्योगपतींमध्ये देशाला बुडवून पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या कर्जाचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यासंबंधी सरकार एक बोलते आहे व कर्ज देणार्‍या बँकांच्यावतीने दुसरेच विधान केले जाते अशी स्थिती आहे. त्यामुळे यात नेमके काय गौडबंगाल आहे? देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 63 बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. या सर्व उद्योगपतींनी जाणून बुजून ही कर्जे थकविली होती. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने अ‍ॅडव्हान्स अंडर कलेक्शन अकाऊंट सुविधेअंतर्गत कर्ज माफी करण्यात आली आहे. ही वस्तुस्थीती असताना सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत निवेदन कतरताना मात्र सांगितले की, आम्ही या उद्योगपतींचे कर्ज माफ केले नसून हे थकबाकीदार आहेत व त्यांच्या कर्ज वसुलीचे प्रयत्न सुरु आहेत. मग नेमके यात खरे कोण, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मोदी सरकारने नोटा रद्द केल्यावर लगेचच उद्योगपतींची कर्जे माफ केल्याची माहिती आता उघड झाली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता आपल्या कष्टाच्या पैशाच्या नोटा बदलून मिळाव्यात यासाठी रांगेत उभी असताना बड्या उद्योगपतींवर सरकारने कर्ज माफीची सवलत बरसली आहे. कर्झ मिळालेले हे उद्योगपती आघाडीचे 100 थकबाकीदार म्हणून नोंद झालेले होते. यातील 63 उद्योगपतींना बँकेने संपूर्ण कर्जमाफी दिली आहे. तर 31 उद्योगपतींना अंश:त कर्जमाफी दिली आहे. एकीकडे पैसेवाल्यांनाच कर्जमाफी दिली जात असताना विदर्भातील सावकारांच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकर्‍याला मात्र कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. जर या शेतकर्‍यांना कर्जाची माफी दिली तर निदान हजारो आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे जीव तरी वाचतील. मात्र असे करण्यास सरकार तयार नाही. मात्र हे सरकार आम जनतेचे नाही, तर ते बड्या भांडवलदारांचे हित सांभाळणारे आहे, हे पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून देशातून पलायन करणारा विजय मल्ल्या याच्या नावावरील कर्जे आता माफ झाल्याने तो कर्जमुक्त झाला आहे. मात्र शेतकरी कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे. शेतकर्‍यांची बिचार्‍यांची कर्जे ही काही हजारातील आहेत, मात्र बड्या भांडवलदारांची कर्जे ही काही हजार कोटी रुपयांची आहेत. यामुळे सरकारचे खरे रुप उघड झाले आहे.

0 Response to "उद्योगपती सुटले, शेतकरी कर्जाच्या सापळ्यात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel