-->
विभीषणाचा दुदैवी अंत

विभीषणाचा दुदैवी अंत

संपादकीय पान शुक्रवार दि. 18 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विभीषणाचा दुदैवी अंत
गुजराथी नाट्यसृष्टीतील आघाडीचा कलावंत व एकेकाळी दूरचित्रवाणीवर गाजलेल्या रामायण मालिकेतील विभीषणाची भूमिका करणारे मुकेश रावल यांचा कांदिवली रेल्वे रुळावर दुदैवी अंत झाला. त्यांच्या निधनामुळे एक गुणी कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचा हा अपघात होता की आत्महत्या हे मात्र अद्याप गूढच आहे. ज्या रेल्वेने त्यांना धक्का दिला त्याच्या मोटरमनच्या सांगण्यानुसार, एक माणूस रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात झाला. कांदिवली रेल्वे स्थानकातील सी.सी.टी.व्ही. फूटेजमध्ये याचे चित्रण स्पष्ट दिसत नाही. अपघात झाला त्यावेळी त्यांच्या खिशात कसलेही ओळखपत्र नव्हते. तसेच खिशात काहीच नव्हते. मोबाईल ते घरी विसरुन आले होते. ते बहुतांशी वेळा प्रवास हा दुचाकी किंवा चार चाकी वाहानानेच करीत. मग ते त्या दिवशी रेल्वेने का गेले असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे त्यांचा हा अपघात की आत्महत्या असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच 2001 साली त्यांच्या 18 वर्षीय मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यापासून मुकेश रावल हे निराश झाले होते. मात्र यातून त्यांनी स्वत:ला सावरले व पुन्हा नाटकातून कामे करण्यास प्रारंभ केला होता. परंतु मुलाच्या निधनानंतर ते मानसिकदृष्ट्या खचले होते असे त्यांच्या समवेत काम करणारे सांगतात. मुकेश रावल हे सुरुवातीपासून गुजराती नाटकात लहान-मोठी कामे होशी कलाकार म्हणून करीत होते. रामायण या मालिकेत त्यांना विभीषणाची भूमिका मिळाली आणि त्यांचे करिअर शिगेला पोहोचले. एका रात्रीत ते स्टार झाले. विभीषणाच्या भूमिकेत ते एकदम चपखल बसले होते. यातून त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. कुठेही ते घराच्या बाहेर पडले की त्यांच्याकडे रामायणाच्या मालिकेत काम करणारा विबीषण यानेच त्यांना सर्व जनता ओळखू लागली. त्याकाळी दूरदर्शन हेच एकमेव चॅनेल होते. त्यानंतर खासगी चॅनेल्स आली. त्यावेळी 80च्या दशकात रामायण ही मालिका जबरदस्त लोकप्रिय झाली. रविवारी सकाळी याचे प्रसारण होई त्यावेळी रस्ते ओस पडत असत. अशा या लोकप्रिय मालिकेत रावल ायंची विभीषमाची बूमिका लोकांना फारच भावली होती. त्यानंतर रावल यांनी हिंदी, गुजराती चित्रपटातून लहान मोठ्या अनेक भूमिका केल्या. मात्र त्यांची खरी आवड ही नाटकातून कामे करण्याची होती. नाट्यक्षेत्र त्यांनी कधीही सोडले नाही. अगदी शेवटपर्यंत. त्यांचा अपघात होण्याच्या आदल्यच दिवशी त्यांनी एका गुजराती नाटकाचा प्रयोग केला होता. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला गुजराती रंगभूमी मुकली आहे.
--------------------------------------------------------

0 Response to "विभीषणाचा दुदैवी अंत"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel