-->
डोंगर पोखरुन उंदीर

डोंगर पोखरुन उंदीर

संपादकीय पान सोमवार दि. ०३ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
डोंगर पोखरुन उंदीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने काळा पैसा जाहीर करण्याच्या केलेल्या योजनेला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला असून जेमतेम ६५ हजार कोटी रुपयाच्या आसपास रक्कम जमा झाली आहे. काळा पैसा जाहीर करण्यासाठी चालू वर्षात ३० सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ही मुदत संपली. तोपर्यंत प्राप्तीकर विभागाकडे ६५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती प्राप्त झाली आहे. नेमका आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आतापर्यंत प्राप्तिकर विभागकडे जाहीर करण्यात आलेल्या अघोषित संपत्तीमधून ४५ टक्के दराने किमान ३० हजार कोटी रुपयांचा कर जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काळा पैसा जाहीर करण्यामध्ये आंध्रप्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दुसर्‍या क्रमांकावर राहिली आहे. शेवटच्या काही तासांमध्ये हैदराबादमधील एका व्यक्तीने १० हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे आंध्रप्रदेशमधून १३ हजार कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर झाला आहे. मुंबईमधून तब्बल ८ हजार ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा जाहीर झाला आहे तर दिल्लीमधून ६ हजार कोटी आणि कोलकाता येथून ४ हजार कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला आहे. काळा पैसा जाहीर करण्यासाठी गेले दोन महिने सरकारने विविध जाहिरांव्दारे आवाहन केले होते. मात्र सुरुवातीला त्याला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र शेवटच्या आठवड्यात काळा पैसा जाहीर करण्यासाठी हळूहळू कल वाढू लागला होता. सरकारने मात्र यातून फारसे काही कमविलेले नाही. काळा पैसा अंदाजे अब्जावधी रुपयांचा आहे, याचा नेमका आकडा ठावूक नसला तरी त्या तुलनेत जमा झालेली रक्कम पाहता सरकारने या योजनेव्दारे डोंगर पोखरुन उंदीरच बाहेर काढला असे म्हणावे लागेल. निवडणुकीच्या काळात देशातील काळा पैसा हुडगून काढण्याचे तसेच विदेशातील काळा पैसा देशात आणण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी मतदारांना दिले होते. मात्र त्यादृष्टीने फारशी सकारात्मक पावले सरकारकडून पडत नव्हती. सरकारने काळा पैसा जाहीर करण्यासाठी आणलेली योजनाही काही नवीन नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या योजना जाहीर झाल्या होत्या व त्यांना अल्प प्रतिसादच मिळाला होता. आता देखील तसेच झाले आहे.
---------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "डोंगर पोखरुन उंदीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel