-->
गंगा खरोखरीच स्वच्छ होईल?

गंगा खरोखरीच स्वच्छ होईल?

संपादकीय पान गुरुवार दि. २९ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
गंगा खरोखरीच स्वच्छ होईल?
आपण जिला गंगा माता म्हणतो, ती गंगा नदी कधी तरी स्वच्छ होईला का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. गंगेला आपण माता म्हणून तिचे उदात्तीकरण जरुर करतो. मात्र, तिला मातेप्रामाणे वागवत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. सध्या गंगा नदी एवढी प्रदूषित झाली आहे की, तिचे शुद्धीकरण होण्याची शक्यताच कमी दिसते. कारण, यात आपण मेलेल्या माणसांपासून ते काहीही टाकत आहोत. त्यामुळे येथील पाण्यात सर्व संसर्गजन्य रोगांचे जंतू आढळतात. अर्थात, या पाण्यात जे कुणी भाविक उतरतात त्यांना यातील कोणतातरी एक रोग हा होणारच, हे नक्की असते. त्यामुळे जर गंगेला शुद्ध करायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्याचे जे गंगेचे अशुद्धीकरण सुरू आहे ते तातडीने थांबविण्याची आवश्यकता आहे. परंतु, अनेक भाविक आपल्या मृत आप्तांना स्वर्गात जाता यावे यासाठी गंगेत सोडतात. कालांतराने ही सडलेली प्रेते कुठेतरी किनारी लागतात. यामागे जी श्रद्धा आहे ती कशी संपविणार, हा प्रश्‍न आहे. ही प्रथा जर थांबविली, तर गंगेचे शुद्धीकरण होण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्यानंतर आता शुद्धीकरण मोहिमेंतर्गत या पाण्यात विविध प्रकारचे बॅक्टेरिया सोडले जाणार आहेत. हे बॅक्टेरिया पाणी शुद्ध करण्याचे काम करतील. याची चाचणी नुकतीच झाली असून, यशस्वी झाली आहे. त्यामुळे गंगा शुद्ध करण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. मात्र, एकीकडे शुद्धीकरण, तर दुसरीकडे पुन्हा अशुद्धीकरण सुरुच राहिल्यास गंगा कधीच शुद्ध होणार नाही. त्यामुळे यासाठी प्रबोधन करण्याची जरुरी आहे. धार्मिक श्रद्धा यात आड येता कामा नये, हे पाहावे लागेल.

Related Posts

0 Response to "गंगा खरोखरीच स्वच्छ होईल?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel