-->
पुन्हा डाळ महागली

पुन्हा डाळ महागली

संपादकीय पान गुरुवार दि. २७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा डाळ महागली
डाळ पुन्हा एकदा किंमतींची उसळी घेऊ लागली आहे. आता दसरा झाला, दिवाळी तोंडावर आली अशा वेळी डाळ ही अनेक वस्तूंसाठी आवश्यक असते. नेमका हाच मुहूर्त साधून डाळींच्या किंमती वाढविल्या जातात. यामागे सर्वार्थाने सट्टेबाज व साठेबाज जबाबदार आहेत. सरकार मग कोणत्याही पक्षाचे असो, पूर्वीचे कॉँग्रेसचे असो किंवा सध्याचे भाजपाचे सरकार प्रत्येकाला डाळीने हैराण केले आहे. देशात स्वस्ताई आणून अच्छे दिनाचा वादा करणार्‍या भाजपालाही आता डाळीने पुरते नाकी नऊ आणले आहेत. गेल्या काही महिन्यापासून या डाळीचे भाव गगनाला भिडल्याने डाळीचे राजकारण राज्यात गाजू लागले आहेे. विरोधकांनी बोबाबोंब करुनही डाळीचे दर काही उतरेनात. भाजपला तर डाळ नेहमीच पिडादायक ठरली आहेे. हीच डाळ भाजपच्या प्रतिमेला नेहमीच धक्का देत आली आहे. १९९५ साली सत्तेत असलेल्या युतीला याच डाळीने बदनाम केले होते. आताही हीच डाळ पुन्हा एकदा भाजपाला बदनाम करु पाहात आहे. गेली वर्षभर भाव खाणारी डाळ ऐन दिवाळीत थोडा कमी भाव खाईल असे वाटत होते. पण नाही; तिचा तोरा तोच आहे. याच डाळीने साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी भाजपला अशीच डोकेदुखी केली होती. १९९५ ते १९९९ दरम्यान राज्यात कॉंग्रेसचे सत्तांतर होऊन युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी फरक इतकाच होता, की मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि उपमुख्यमंत्री भाजपचा होता. म्हणजे मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे ही जोडी. आज भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेकडे चार-पाच मंत्रिपदे. तरीही डाळीवरून भाजपच्या वाटेला बदनामीच आली. यापूर्वीच्या युती काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांच्याकडे अन्न आणि पुरवठा खाते होते. या खात्यावर डाळीवरून भ्रष्टाचाराचे चौफेर आरोप झाले. त्यावेळी विधानपरिषदेत छगन भुजबळ तर विधानसभेत आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, दिलीप सोपल आदी धडधडणार्‍या तोफा होता. डाळीवरून सरकारला विरोधकांनी घेरले. इकडे विरोधक शक्तिशाली होते. जोशी-मुंडे यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी असतानाही विरोधकांनी डाळीवरून युती सरकारच्या अब्रूचे पार धिंडवडे काढले होते. विशेषत: भाजपच्या तत्कालीन मंत्री शोभाताईंना टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर याच युती सरकारच्या पराभवाला डाळ हे एक कारण होते. याच डाळीने अशा प्रकारे भाजपाला नेहमीच बदनाम केले आहे. कॉँग्रसेच्या राज्यातही डाळींच्या किंमती वाढल्या परंतु सध्याच्या किंमती पाहता त्यावेळी डाळींच्या किंमती एवढ्या प्रमाणात वाढल्या नव्हत्या. आता देखील राज्यात १५ वर्षानंतर सत्तांतर झाले, भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली. केवळ सहाच महिन्यात डाळींची ही महागाई सुरु झाली.

0 Response to "पुन्हा डाळ महागली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel