-->
ई-कॉमर्सची धूम

ई-कॉमर्सची धूम

संपादकीय पान सोमवार दि. १० ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
ई-कॉमर्सची धूम
आता सणासुदीची धूम सुरु झाली आहे. या काळात प्रामुख्याने खरेदी जोरात होते. यावेळी पाऊसही चांगला पडल्याने खरेदीचा आोघ वाढणार हे नक्की आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात यावेळी जास्त कऱेदी होईल असा अंदाज आहे. याचा फायदा घ्यायला नव्याने विकसीत झालेल्या ई-कॉमर्सच्या विविध कंपन्यांनी आपल्या सवलतीच्या दरातील योजना जाहीर केल्या आहेत. ई कॉमर्स कंपन्यांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भरघोस सवलत योजनांना सुरुवात झाली आहे. यंदाच्या  दिवाळीला देशात सुमारे १७०० कोटी डॉलरची खरेदी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या क्षेत्रात आता अमेरिकन कंपनी ऍॅमेझॉनने भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या कंपनीच्या ऑनलाईन व्यासपीठावर एक लाख २० हजारांपेक्षा जास्त विक्रेते उपलब्ध आहेत. शिवाय, कंपनीकडे दोन डझनपेक्षा जास्त गोदामे आहेत. भारतातील पहिल्या क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी होण्याचे ऍमेझॉनचे उद्दिष्ट आहे. येत्या २०२० पर्यंत वार्षिक ऑनलाईन विक्रीचा आकडा ८० अब्ज डॉलरवर जाईल, असा अंदाज आहे. सध्या ही उलाढाल १३ अब्ज डॉलरएवढी आहे. येत्या २०२५ पर्यंत ऍॅमेझॉनमार्फत एकुण ८१ अब्ज डॉलरच्या उत्पादनांची विक्री होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी कंपनीमार्फत सुमारे ३.७ अब्ज डॉलरची विक्री करण्यात आली होती. मेट्रो शहरांशिवाय इतर शहरांमध्ये विस्तार करण्याचे मोठे आव्हान ई-कॉमर्स कंपन्यांसमोर आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसाठीदेखील ही दिवाळी निर्णायक ठरणार आहे. गेल्या दिवाळीत भरभरुन जाहीराती करणार्‍या अनेक लहान कंपन्या यावर्षी बंद पडल्या. ऍॅमेझॉनची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या फ्लिपकार्टने आपली हिस्सेदारी वॉलमार्टला विकण्यासाठी बोलणी सुरु केली आहे. याशिवाय, शेवटच्या टप्प्यातील लॉजिस्टिक्स सेवांसाठी कंपनीतर्फे १०,००० तात्पुरत्या नोकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍॅमेझॉनदेखील उत्पादनांचा साठा वाढविण्यासाठी झपाट्याने नव्या विक्रेत्यांची भरती सुरु केली आहे. स्नॅपडीलनेदेखील आपली प्रतिमा बदलण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करीत आपला नवा लोगो सादर केला आहे. स्नॅपडील आता नवीन रुपात विक्री वाढीवर लक्ष केंद्रीत करीत आहे. एकूणच पाहता ई-कॉमर्सचे हे दालन आता झपाट्याने विस्तारुन आपली एक नवीन स्पेस तयार करीत आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "ई-कॉमर्सची धूम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel