आता तरी पूर्ण क्षमतेने चालवा
संपादकीय पान बुधवार दि. २१ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता तरी पूर्ण क्षमतेने चालवा
राज्य सरकारने अखेर रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रकल्पाचे दोन कंपन्यात विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ज्यांनी कर्जे दिली आहेत त्यांची तशी मागणी होती. आता ही मागणी पूर्ण झाल्यावर तरी नजिकच्या काळात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. सुमारे तीन दशकांपूर्वी हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळपासून या प्रकल्पाच्या मागे काही ना काही तरी विघ्ने लागली आहेत. हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंजूर केला होता. वीज निर्मिती क्षेत्रातली ही देशातली पहिली मोठी थेट विदेशी गुंतवणूक होती. जर हा प्रकल्प सुरळीत सुरु झाला असता तर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक या उद्योगात आली असती व राज्याला वीज तुटवडा कधीच भासला नसता. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच त्यावेळी शिवसेना-भाजपाने याला कडाडून विरोध केला. हा प्रकल्प आम्ही अरबी समुद्रात बुडवू अशी घोषणा त्यावेळी युतीने केली होती. मात्र हीच युती सत्तेत आल्यावर त्यांनी हा बुडविण्याची घोषणा केलेला प्रकल्प अरबी समुद्रातून बाहेर काढला व या प्रकल्पाला जीवदान मिळाले. अर्थातच वीजेचे दर वाढवून घेण्यात आले होते. त्यावेळच्या एन्रॉन कंपनीने यानंतर काम जोरात सुरु केले असले तरी ही मूळ कंपनीच प्रकल्प पूर्ण होण्याच्या संधीवर दिवाळ्यात निघाली. कधी गॅसची कमतरता तर कधी नॅप्थाचा तुटवडा यात हा प्रकल्प हेलखावे खात राहिला. जवळपास दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरु झाला खरा परंतु पूर्ण क्षमता त्याने कधीच गाठली नाही. सध्या जेमतेम ६०० मेगावॅटची वीज निर्मिती यातून होते आहे. आता देखील या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला एल.एन.जी.चा पुरवठा कितपत सुरळात होईल याची शंका आहेच. कृष्णा गोदावरी खोर्यातून होणार्या वायू पुरवठ्याबाबत अंबांनी बंधू व सरकार यांच्यात असलेले वाद पाहता यातून याला कसा वायू मिळणार ही चिंता आहेच. कर्जदारांच्या मागण्या आता सरकारने पूर्ण केल्याने आता यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही.
-------------------------------------------------------

0 Response to "आता तरी पूर्ण क्षमतेने चालवा"
टिप्पणी पोस्ट करा