-->
गणेशोत्सव पर्यटन जोरात

गणेशोत्सव पर्यटन जोरात

संपादकीय पान सोमवार दि. १२ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गणेशोत्सव पर्यटन जोरात
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सव सुट्टीत पर्यटनात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, पतेती, दहीहंडी आणि त्यापाठोपाठ आलेला गणेशोत्सव या सणासुदीच्या दिनी आलेली एकही सुट्टी पर्यटकांनी सोडलेली नाही. शनिवार-रविवार व त्याला जोडून एखादी सुट्टी आली तरी पर्यटनासाठी हल्ली लोक बाहेर पडतात. गेल्या काही वर्षात हा कल प्रामुख्याने मध्यमवर्गीयात हा कल वाढला आहे. अशा छोट्या सुट्यांमध्ये लोक दीड-दोनशे कि.मी. अंतरावरील एखादे पर्यटन स्थळ निवडतात व तेथे पर्यटनाला जाणे पसंत करतात. अनेकदा अशा छोट्या सुट्या या पर्यटकांसाठी मोठ्या खर्चिक नसतात. त्यामुळे आता हा कल वाढत चालला आहे. या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जवळपास सगळेच सण हे वीकेंडला लागून आले आहेत. महाबळेश्वर, माथेरान, कार्ला, भंडारदरा, चिखलदरा, मोझारी पॉइंट, वेळणेश्वर, गणपतीपुळे, शिर्डी येथील सगळ्याच रिसॉर्ट्सनी अनपेक्षित अशी प्रचंड गर्दी अनुभवली आहे. ही सगळी रिसॉर्ट्स ९० ते १०० टक्के भरली. देशभरात महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, ओडिसा, पॉंडिचेरी, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगढ आणि राजस्थान सगळीकडे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र गणेशोत्सवाच्या काळातही घरी बसून न राहता देशांतर्गत पर्यटन करणार्‍यांची संख्या वाढली आहे. अनेकांकडे घरी गणपती नसतो. त्यामुळे यात जोडून आलेल्या सुट्टीचा फायदा घेण्यासाठी अनेक पर्यटक घराबाहेर पडतात. गोवा, कुर्ग, उटी, द गोल्डन ट्रँगल, उदयपूर आणि केरळ बॅकवॉटर्स इत्यादी ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात देशाटन करणार्‍यांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातही आता ताडोबा अभयारण्य, पेंचचे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात झाले आहे. याशिवाय, कास पठारावर फुलणारी रंगीबेरंगी फुले हेही या महिन्यात पर्यटकांसाठी खास आकर्षण असते. कोकणात आंबोली घाट याच काळात पर्यटकांना खुणावतो, त्यामुळे तिथेही गर्दी वाढते. ऑनलाइन बुकिंगच्या सुविधा असल्याने अनेक पर्यटक आधीच बुकिंग करतात. महिन्याभरातील दीर्घकालीन सुट्टयांमध्ये शंभर टक्के आणि चतुर्थीतही सगळी बुकिंग्ज झाली. या काळात विदेशातील क्रूझ भ्रमंतीलाही मोठी मागणी होती. थायलंड, हॉंगकॉंग, बँकॉक इथे क्रूझने फिरणार्‍यांची संख्या जास्त होती. एकूणच पाहता आपल्याकडे पर्यटन उद्योग चांगलाच तेजीत येऊ लागला आहे. केवळ विदेशी पर्यटकांचेचे पर्यटन नव्हे तर देशातील लोकांचे पर्यटनही देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावते.

0 Response to "गणेशोत्सव पर्यटन जोरात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel