-->
पर्रिकरांची दर्पोक्ती

पर्रिकरांची दर्पोक्ती

संपादकीय पान बुधवार दि. ०३ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पर्रिकरांची दर्पोक्ती
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी केलेल्या भाषणात अभिनेता आमिर खानचा नामोल्लेख न करता त्याला चांगलेच फटकारले आहे. देशात राहून देशविरोधात बोलणार्‍यांना चांगला धडा शिकवायला हवा, असे पर्रिकरांनी म्हटले. तसेच देशात राहून देशाविरोधात वक्तव्य करण्याची लोकांची हिंमतच कशी होते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एका अभिनेत्याने (आमिर खान) त्याची पत्नी देश सोडून विदेशात जाणार असल्याचे म्हटले  होते. त्याचे वक्तव्य अत्यंत खेदजनक होते. पण, त्याला देशातील नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्याच्या जाहिरातींवर बहिष्कार टाकला. तर काही कंपन्यांनी त्याच्यासोबत केलेले करारही तोडले. देशविरोधी बोलणार्‍या लोकांना चांगला धडा शिकवायला हवा, असेही पर्रिकर यांनी यावेळी म्हटले. संरक्षणमंत्र्यासारख्या जबाबदार पद सांभाळणार्‍या पर्रिकरांनी अशा प्रकारे असे विधान करणे चुकीचे आहे. कारण काश्मिरमधील अतिरेक्यांना पाठिंबा देणारे नागरिक व अभिनेता अमिर खान या दोघांनाही एकाच पारड्यात टाकणे चुकीचे ठरेल. एखाद्या अभिनेत्याने किंवा कोणत्याही नागरिकाने त्याचे एखाद्या विषयावर असलेले मत व्यक्त करणे म्हणजे तो लगेचच देशद्रोही ठरत नाही. त्याला त्याची मते स्पष्टपणे मांडण्याचा अधिकार या देशातील घटनेने बहाल केला आहे. आज काश्मिरमधील नागरिक उघडपणाने अतिरेक्यांना आसरा देतात किंवा त्यांना पाठिंबा देतात हे देश विघातक कृत्य निश्‍चितच आहे. मात्र अमीर खानने केलेल्या वक्तव्याची तुलना त्याच्या करणे चुकीचे आहे. यावेळी प्रकाशित झालेले पुस्तक हे संरक्षण या विषयावरील असल्याने त्यांनी देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. यावेळी त् म्हणाले की, देशातील लष्कराला थेट गोळ्या झाडण्याचे दिलेले अधिकार काढून घेता येणार नाहीत तसेच त्यांच्याकडे काठी दिली जाऊ शकत नाही. पर्रिकर अशा प्रकारे अर्धसत्य मांडत आहेत. कारण लष्कराला गोळ्या घालण्याचे आदेश जरुर असतात, परंतु ते देशातील जनतेवर नाही तर आपल्या शत्रूच्या सैन्यावर त्याने गोळ्या चालवायच्या असतात. पर्रिकरांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

0 Response to "पर्रिकरांची दर्पोक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel