-->
आता अतिवृष्टीचा धोका

आता अतिवृष्टीचा धोका

संपादकीय पान शुक्रवार दि. २९ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आता अतिवृष्टीचा धोका
यंदा पाऊस चांगलाच पडणार व सर्वांचे समाधान यातून होणार असा हवामानखात्याचा अंदाज खरा ठरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सूनने जवळजवळ संपूर्ण देश व्यापला होता. त्यामुळे दुष्काळाचे सावट आता संपले याचे समाधान शेतकर्‍याला लाभले. मात्र आता अतिवृष्टी व पूरस्थितीची स्थिती निर्माण झाल्याने वेगळीच चींता वाटू लागली आहे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम या राज्यांत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने हाहाकार उडविला. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि पूर्वोत्तर राज्यांत जोरदार पावसाने नद्यांना आलेल्या पुराने सर्वत्र थैमान घातले. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. रस्ते, पूल वाहून गेल्याने, तर काही ठिकाणी भूस्खलनाने अनेक गावांचा संपर्क तुटला. यातून लोकांचे जनजीवन विस्कळित झाले. राज्याचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यालाही पुराचा मोठा तडाखा बसला आहे. तसेच कोकणातील चिपळूणमध्ये पाणीच पाणी झाले. सध्या आलेले हे पूर निसर्गाची देण आहेत की, मानवनिर्मित आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. अनेक ठिकाणी आपण नद्यांचे प्रवाह संकुचित केले आहेत, प्रामुख्याने नदी, नाल्यांच्या काठावर आपण आक्रमणे केली आहेत. त्यामुळे नद्यांची पात्रे आकुंचित झाल्याची आपल्याला दिसतात. याचा परिणाम म्हणून अनेक शहरात पुराचे पाणी घुसते व त्याचा आपल्यावर परिणाम होतो. निसर्गावर आपण अशा प्रकारे आक्रमण करण्याचा जो पवित्रा घेतला आहे तो आपल्यालाच धोकादायक ठरणारा आहे. जमिनीच्या वाढत्या धुपामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पाणी मुरण्याची क्षमता खूपच कमी झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दुष्काळाची तीव्रता आणि महापुरांचे रौद्र रूप वारंवार पाहावयास मिळत आहे. अशा प्रकारचे आक्रमण आपण थांबविणार किवा नाही, असा सवाल आहे. नदी-नालाकाठच्या वृक्षतोडीने परिसरातील गाळ मोठ्या प्रमाणात वाहून येऊन नद्या आणि धरणांचीही पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. शेवटी या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून थोडा पाऊस जास्त झाला तरीही आपल्याकडे लगेच पुरस्थिती दिसते. निसर्गावरील हे आघात आपण थांबविले पाहिजेत. त्यामुळे अनेकदा पूरसदृश्य स्थिती ही निसर्गनिर्मित नाही तर मनुष्यनिर्मित आहे. हे थाबंविले पाहिजे. अन्यथा आपल्यावर निसर्ग सूड उगवेल, याबाबत काही शंका नाही.

Related Posts

0 Response to "आता अतिवृष्टीचा धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel