-->
बाजारपेठ बच्चे कंपनीची!

बाजारपेठ बच्चे कंपनीची!

रविवार दि. २४ एप्रिल २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
बाजारपेठ बच्चे कंपनीची!
------------------------------------------
एन्ट्रो- आज आपल्या देशातील १२० कोटी लोकंख्येत सुमारे पाच टक्के जनता ही गर्भश्रीमंत, नवश्रीमंत या वर्गात मोडते. यांचे उत्पन्न हे कोटींच्यावर असते. मात्र त्यांच्या खालोखाल असलेल्या सुमारे ३० कोटी मध्यमवर्गीय लोकंसख्या ही यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करीत असते. अर्थात त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्नही वीस-पंचवीस लाख रुपयांच्या वर असते. आपल्याकडील ही बाजारपेठ अनेकांना खउणावत आहे. प्रामुख्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांना याच बाजारपेठेच आकर्षण आहे. आपल्या देशातील हे मिनी युरोप किंवा अमेरिकाच आहे, असे म्हटल्यास काही वावगे वाटू नये. जंगल बुकच्या निमित्ताने ही बाजारपेठे आपल्याला ठळकपणे जाणवली आहे. अर्थात अशी बाजारपेठ असण्यात काहीच अयोग्य नाही. फक्त आपण दशातील ६० टक्के जनतेचा विचार करीत नाही व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा ४० टक्के मध्यमवर्गीयांचाच विचार करतो हे वाईट आहे...
-------------------------------------------
गेल्या काही वर्षात आपल्याकडे बच्चे कंपनीची एक नवी बाजारपेठ विकसीत झाली आहे. सुट्या सुरु झाल्या की ही बाजारपेठ अजून विस्तारते. आपल्याकडे मध्यमवर्गीच्या हातात गेल्या दोन दशकात पैसे खुखुळू लागल्यापासून अनेक नवीन बाजरपेठा निर्माण झाल्या आहेत. यातील एक सर्वात महत्वाची बाजरपेठ म्हणजे सौंदर्यप्रसाधनांची. अर्थात पूर्वीच्या काळी ही बाजारपेठ अस्तित्वात नव्हती असे नाही, मात्र गेल्या काही वर्षात या बाजारपेठेच महत्व विकसीत झाले. लग्नाची बाजारपेठ म्हटली तर कुणास चुकीचे वाटेल. मात्र ही देखील आपल्याकडील जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या बहुतांशी लग्नात किमान दहा लाख रुपये खर्च केले जातात. दरवर्षी हजारो लग्ने होतात, याचा हिशेब पाहता लग्नाच्या बाजारपेठेचा अंदाज काढता येतो. लग्न म्हटले की, सोनार, हॉल, कपडेलत्ते, कॅटरर, ब्युटी पार्लर, डीजे-इलेट्रीशीयन, सजावट करणारे अशा अनेकांना रोजगार उपलब्ध होतात. केवळ रोजगारच नव्हे तर लाखो रुपयांच्या उलाढाली यातून केरण्यात येतात आणि अनेकांच्या घरच्या चुली पेटतात. परंतु अशा प्रकारच्या अनेक बाजारपेठा नव्याने विकसीत झाल्या आहेत. यातील एक सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे बच्चे कंपनींची बाजारपेठ! सध्या या बाजारपेठेची आठवण होण्याचे कारण म्हणजे, सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुहूर्त काढून आलेल्या जंगल बुक या सिनेमाने आपल्या देशात तब्बल १०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अर्थात हा सिनेमा केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांसाठी देखील आहेच. परंतु मुले हे त्याचे सर्वाधीक प्रेक्षक आहेत. या चित्रपटाने केवळ दहा दिवसात १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करावा यावरुन आपल्याला बच्चे कंपनीच्या बाजारपेठेचे महत्व लक्षात येते. मोगली आणि त्याचे जंगलातील मित्र यांची थ्री-डी धमाल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने जंगलबुक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली गल्ला जमवत आहे. हा चित्रपट भारतासह जगभरात प्रदर्शित झाला. आपल्याकडे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये तो प्रदर्शित करण्यात आला आहे. हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरो दिग्दर्शित द जंगल बुक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आह, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे. परिक्षा संपल्याने मुलांना सुट्‌ट्या लागल्या आहेत. याचा फायदा चित्रपटाला मिळालेला असून येत्या काही दिवसांत चित्रपट कमाईचे अजून विक्रम उभारेल अशी चर्चा आहे. या चित्रपटात १० वर्षांचा भारतीय वंशाचा नील सेठी मोगलीची भुमिका साकारत आहेत. या चित्रपटात नील सेठी एकमेव मानवी पात्र असून इतर सर्व पात्र ऍनिमेटेड आहेत. हिंदी चित्रपटासाठी बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांना आपला आवाज दिला आहे. ज्यात इरफान खान, प्रियांका चोप्रा, नाना पाटेकर, ओम पुरी आणि शेफाली शाह यांचा समावेश आहे. मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किपलिंग यांचा जंगल बुक हा जंगलकथांचा संग्रह १२० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यावर आधारित झोल्तान कोर्डा यांनी काढलेला त्याच  नावाचा माहितीपट जगप्रसिद्ध असून गेल्या किमान दोन पिढ्यांच्या हृदयावर त्यातील पात्रे कोरली गेलेली आहेत. बच्चे कंपनीची ही बाजारपेठ त्यांच्या अगदी जन्मापासून सुरु होते. अगदी जन्मल्यावर त्यांचे कपडे, डायपर, पावडर यांची एक स्वतंत्र बाजारपेठ आहे. त्यानंतर अनेक प्रकारची वयोमानानुसार खेळणी ही देखील आपल्याकडे एक मोठी बाजारपेठ आहे. लहान मुलींसाठी असलेल्या बीर्बी डॉल ब्रँडने तर जग जिंकले आहे. अमेरिकेतल्या वॉल्ट डिस्नेने तर मुलांच्या बाजारपेठेवर आपले साम्राज्य उभे केले. त्यातील अनेक काटुर्न आज मुलांच्या बाल मनावर छाप पाडून असतात. यातूनच मुलांसाठी स्वतंत्र कार्टुन चॅनेल्सचे एक स्वतंत्र जग निर्माण झाले. आता आपल्या देशात केवळ मुलांसाठी असलेल्या कार्टुन चित्रपटांची अब्जावधींची उलाढाल आहे व त्यासाठी असलेल्या कार्टुन चॅनेल्स ही तर  अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत. सध्या जशी जंगल बुकने धमाल उडवून दिली आहे तसेच यापूर्वी हनुमानाने अशीच मुलांवर छाप पाडली होती. मुलांची करमणुकीची ही बाजारपेठ जशी गेल्या काही वर्षात वाढली आहे तसेच अन्य क्षेत्रातही मुलांच्या बाजारपेठा प्रभावी झाल्या आहेत. यात शिक्षणाची असलेली बाजारपेठ ही फार महत्वाची आहे. शिक्षणाची बाजारपेठ असे म्हटल्यास जुन्या पिढीतील लोकांना काही खटकल्यासारखे वाटेलही. परंतु मुलांच्या शिक्षणाची एक स्वंतत्र बाजारपेठ आहे. प्रामुख्याने शहरी भागात ही बाजारपेठ सध्या जोरदार धुमाकूळ घालीत आहे. अगदी नर्सरी पासूनच या उद्योगात ब्रँडेड शाळा सुरु झाल्या आहेत. या शाळातील एकूण खर्च पाहता अवास्तव वाटतो परंतु आज आपल्याकडील मध्यमवर्गीयांना हे परवडते आहे. सध्याच्या काळात बहुतांशी जोडप्यांना एकच मुल असल्याने त्यावर आपण जास्तीत जास्त खर्च करावा असे पालकांना वाटत असते. अनेकदा ते यावरच धन्यता मानीत असतात. अर्थात हे सर्व जनतेला परवडणारे नाही. सध्या मध्यमवर्गाला ही बाजारपेठ खुणावते आहे कारण त्यांच्याकडे पैसा खुळखुळत आहे. आज आपल्या देशातील १२० कोटी लोकंख्येत सुमारे पाच टक्के जनता ही गर्भश्रीमंत, नवश्रीमंत या वर्गात मोडते. यांचे उत्पन्न हे कोटींच्यावर असते. मात्र त्यांच्या खालोखाल असलेल्या सुमारे ३० कोटी मध्यमवर्गीय लोकंसख्या ही यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करीत असते. अर्थात त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्नही वीस-पंचवीस लाख रुपयांच्या वर असते. आपल्याकडील ही बाजारपेठ अनेकांना खउणावत आहे. प्रामुख्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांना याच बाजारपेठेच आकर्षण आहे. आपल्या देशातील हे मिनी युरोप किंवा अमेरिकाच आहे, असे म्हटल्यास काही वावगे वाटू नये. जंगल बुकच्या निमित्ताने ही बाजारपेठे आपल्याला ठळकपणे जाणवली आहे. अर्थात अशी बाजारपेठ असण्यात काहीच अयोग्य नाही. फक्त आपण दशातील ६० टक्के जनतेचा विचार करीत नाही व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा ४० टक्के मध्यमवर्गीयांचाच विचार करतो हे वाईट आहे. गरीबा घरच्या लहान मुलांना आपल्याला हे जग अनुभवता येत नाही याची खंत आहे. त्यासाठी खालच्या थरात असलेल्यालाही या बाजारपेठेचा अनुभव कसा चाखता येईल हे पाहिले गेले पाहिजे. अन्यथा आपल्यातील समाजमन बिघडण्याचा धोका आहे.
-------------------------------------------------------------      

Related Posts

0 Response to "बाजारपेठ बच्चे कंपनीची!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel