-->
वाढती बालगुन्हेगारी

वाढती बालगुन्हेगारी

संपादकीय पान मंगळवार दि. २६ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वाढती बालगुन्हेगारी
गेल्या दोन वर्षात मुंबईसारख्या महानगरात बाल गुन्हेगारी झपाट्याने वाढत चालली असून ही गंभीर बाब आहे. २०१२-१४ या दोन वर्षांच्या काळात एकूण २१९४ बाल गुन्हेगारीचे प्रकार झाले. तसेच एकूण गुन्हेगारीचा विचार करता १४ टक्के वाटा बाल गुन्हेगारांचा होता. सर्वात वाईट बाब म्हणजे बाल गुन्हेगारी वाढत चालली आहे. देशातील गुन्हेगारीचा विचार करता मध्यप्रदेशाचा क्रमांक पहिला होता, त्याखालोखाल महाराष्ट्र व बिहार या राज्यात बाल गुन्हेगारीचे प्रमाण आहे. काही बाल गुन्हेगारीचे प्रकार हे केवळ किरकोळ गुन्हेगारीचे नसून गंभीर स्वरुपाचेही होते. काहींच्या हातून गुन्हे हे झटपट पैसे कमविण्यासाठी झाले होते. त्यंाना ते कृत्य करताना त्याना होणार्‍या परिणामांची कल्पना नव्हती. नुकतेच कल्याणमध्ये एका बाल गुन्हेगारांची चार जणांची टोळी पकडण्यात आली, त्यातील त्यांचा म्होरक्या हा १६ वर्षाचा होता. त्यांचे गुन्हे हे मोठ्या अट्टल गुन्हेगारांंसारखे होते. हल्ली अनेकदा बाल गुन्हेगार बलात्काराच्या प्रकरणात पकडले जातात. बाल गुन्हेगारीचे हे प्रकार लक्षात घेता आपण याचा गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वात प्रथम सरकारने यासंबंधी अनेक बाबतीत विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. अनेकदा या मुलांना चांगले शिक्षण मिळत नाही, अनेकदा झोपडपट्टीतले जीवन जगणार्‍या या मुलांना संगतही वाईट लागते. अर्थात झोपडपट्टीतीलच मुले वाईट संगतीत येतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेली मुलेही गुन्हेगारीकडे वळल्याचे अलिकडे दिसते. लहान वयात मुलांची जी योग्य जडणघडण व्हायला पाहिजे तशी होत नाही. त्यांना जसे  चांगले शिक्षक मिळण्याची गरज असते तसेच त्यांच्या पालकांनीही त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. एखाद्याने जर गुन्हा केला तर त्याला बास सुधारगृहात ठेवले जाते. तेथे एवढी वाईट परिस्थिती असते की, तेथून त्यात सुधारणा होण्याऐवजी अट्टल गुन्हेगार म्हणून बाहेर पडण्याचा धोका असतो. बाल गुन्हेगारांकडे केवळ काणाडोळा करुन चालणार नाही तर त्या समस्येच्या मुळाशी जाऊन ही समस्या सोडविण्याची वेळ आता आली आहे.
---------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "वाढती बालगुन्हेगारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel