माथेरानची नवी ओळख
संपादकीय पान बुधवार दि. २७ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
माथेरानची नवी ओळख
थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे एक आकर्षण असलेल्या माथेरानची आणखी एक नवी ओळख निर्माण झाली आहे. प्रख्यात खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांच्या मार्गदर्शनातून माथेरानमध्ये आकाशगंगा प्रकल्प उभारण्यात आला आहे. देशातील हा पहिलाच अभिनव उपक्रम असून माथेरानच्या पर्यटनात भर घालणार्या आकाशगंगा प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. थंड हवेचे ठिकाणी म्हणून ब्रिटीशांनी विकसीत केलेल्या माथेरानमध्ये पहिली रेल्वे आणली ती देखील त्यांनीच. स्वातंत्र्यानंतर सरकारने फारसे माथेरानसाठी काही विशेष केले नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. परंतु नव्याने स्थापन झालेला आकाशगंगा हा प्रकल्प पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण ठरेल यात काही शंका नाही. माथेरानमधील सर्वात उंच ठिकाण असलेल्या पेमास्टर गार्डन येथे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजनेसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी माथेरान नगरपरिषदेला ७५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पात एक प्रदर्शन केंद्र असून त्यामध्ये ग्रह, तार्यांची माहिती देणारी चित्रे आहेत. याशिवाय एक डॉल्बर डिजिटल थ्रीडी थिएटर असून त्यामध्ये आकाश गंगेची माहिती देणार्या शॉर्ट फिल्म्स दाखविण्यात येणार आहे. याशिवाय रात्री अवकाश निरीक्षण करता यावे म्हणून खास दुर्बिण आणि अद्ययावत डोम बसविण्यात आला असून येथून आकाशातील तार्यांची पाहणी करता येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी माथेरान ही पहिली नगरपरिषद असून शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, खगोल अभ्यासक अशा सर्वांना हा प्रकल्प मार्गदर्शक आहे. आपल्याकडे मुंबईत नेहरु सेंटरमध्ये अशा प्रकारच्या आकाशदर्शनाची सोय आहे. त्याशिवाय संपूर्ण राज्यात अशा प्रकारची उत्कृष्ट सुविधा असलेली संस्था नाही. खगोलशास्त्राविषयी आकर्षण निर्माण व्हावे व त्यातून मुलांनाही चांगले मार्गदर्शन लाभावे यासाठी अशा प्रकारचे आकाशगंगा प्रकल्प ठिकठिकाणी उभारण्याची आवश्यकता आहे. माथेरानला आकाशगंगा प्रकल्प उभारण्यागे एक फायदा असा आहे की, जे लोक पर्यटनासाठी येतात त्यांना एक वेगळा विरंगुळा याव्दारे अनुभवता येईल. यातून तरुणांना या विषयाची आवडही निर्माण होऊ शकेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. माथेरानमधील या नवीन प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्याच्या शिरोपात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "माथेरानची नवी ओळख"
टिप्पणी पोस्ट करा